Skip to content

१६ मे पासून अचानक चमकून उठेन या राशींचे नशीब पुढील ९ वर्ष राज योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या योगाबद्दल सांगितले गेले आहे. आणि त्या पैकीच एक योग म्हणजे राजयोग. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राजयोग असतो. तो आपले जीवन आरामाने अभिमानाने जगत असतो. अशा लोकांची आर्थिक स्थिती त्यामानाने भक्कम असते. त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी कायम राहते.

ज्योतिष शास्त्रामध्ये असे राजयोगाचे ३२ प्रकार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात  मे महिन्यात अशा कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. ज्यांच्यासाठी हा काळ राजयोग असणार आहे. सुरुवात करुया तुळ राशीपासून.

तूळ राशी- तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचे योग आहेत. मे महिन्यात तूळ राशीच्या लोकांना अतिशय मजबूत असा राजयोग आहे. या राशीच्या करियर मध्ये हा महिना शुभ परिणाम देईल. या महिन्यात तुम्ही कोणतेही काम कठोर परिश्रमाने कराल. आणि त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. 

तसेच या काळात तुम्ही काही मालमत्तेसंबंधी विचार करणार असाल तर त्यातही तुम्हाला लाभ होईल. तूळ राशीचे जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांना मे महिन्यात खूप फायदा होणार आहे. एवढेच नाही तर वडिलोपार्जित संपत्तीतही त्यांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

याशिवाय जर तुम्ही कोणाकडून पैसे येण्याची जर वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा मे महिन्यामध्ये संपणार आहे. १६ मेपासून व्यवसायाच्या दृष्टीने ग्रहांची स्थिती चांगली राहील. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. पगार वाढ लोकांना त्यांच्या कार्यालयात वरिष्ठ लोकांचा साक्षेप जाणवेल. त्यामुळे तुमच्यावरील कामाचा भारही कमी होईल.

तुम्ही तुमच्या कामाच्या आघाडीवरील लक्ष केंद्रित कराल. आणि तुमच्या कामात चांगली कामगिरी करू शकाल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे सकारात्मक संबंध विकसित होतील. तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला काही मोठ्या जबाबदारीही मिळतील. तसेच पदोन्नती ही चालू राहील.

तुमचा नवीन नोकरीचा शोध आता पूर्ण होईल. तुमच करिअर सुधारण्यासाठी तुम्ही उच्च शिक्षणाची योजना करत असाल तर ती सुद्धा उत्तम राहील. पगारदार लोकं त्यांच्या कामाशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी काही सेमिनार इत्यादींना उपस्थित राहण्याची योजनाही आखतील.

मकर राशी- मकर राशीच्या लोकांना कामात यश मिळेल. मे महिन्यात मकर राशीच्या लोकांचे नशीब राजयोगात आणि उजळणार आहे. त्यादरम्यान नोकरदार लोकांना त्यांच्या कामात भरपूर यश मिळेल. त्याच वेळी बॉस देखील त्यांच्या कामावर खुश असतील.

त्यांचं कौतुक करतील. तुम्हाला आवडते मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. एवढंच नाहीतर नोकरदार लोकांना कामानिमित्त परदेशातही जावं लागू शकतं.याचाही त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मकर राशीची जी लोकं व्यवसायात काही कामांमध्ये आहेत त्यांना प्रभावशाली व्यक्ती भेटू शकतात.

ज्या त्यांच्या व्यवसायामध्ये उपयुक्त ठरतील. तुम्हाला व्यवसायात सकारात्मक वाढ मिळेल. तुम्ही एखाद्या सामायिक गटामध्ये सुद्धा सामिल होऊ शकता. ज्यामुळे तुमच्या नेटवर्क मध्ये सकारात्मक वाढ होईल. मकर राशीच्या नोकरदार लोकांचा त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद मात्र होऊ शकतो. 

फक्त थोडं सावध राहा. परंतु तुमचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असेल. तुमच्या आत्मविश्वासाच्या मदतीने तुम्ही सध्या तो प्रकल्प वेळेत आणि यशस्वी पूर्ण कराल‌. तुमच्या निर्णयात तुमचे वरिष्ठ तुमचे समर्थन करतील. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात वाढ  झालेली दिसेल आणि उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही सक्षम असाल. ज्यामुळे तुमचे आर्थिक संतुलन राहील.

कुंभ रास- कुंभ राशीचे सुद्धा भाग्य या मे महिन्यात उजळणार आहे. या कुंभ राशीच्या लोकांच नशिबीही राजयोगाने चमकणार आहे. या राशीच्या लोकांना या महिन्यात करियर व्यवसाय आणि गुंतवणुकीचा माध्यमातून शुभ परिणाम मिळतील. जर तुम्हाला दीर्घ काळ परदेशात नोकरी किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा मे महिना तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकतो. 

या काळात जे नोकरी करत आहेत त्यांना हवं ते प्रमोशनही मिळू शकतात. या काळात नोकरीच्या शोधात असलेल्यांना यशही मिळू शकतं. या महिन्यात व्यवसायिकांना मोठा नफा होणार आहे. तसेच तुमचे कर्मचारीसुद्धा तुम्हाला साथ देतील त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा तुमचा अभिमान वाढेल.

कुंभ राशीचे लोक जे व्यवसाय करतात. व्यवसायिक कार्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पण काळ चांगला असेल. ऑनलाइन कोर्सेस करण्याची योजना तुम्ही आखत असाल तर त्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. भविष्यात व्यवसाय नक्कीच वाढेल. 

व्यवसायात नवीन भागीदारी किंवा संयुक्त व्यवसाय उपक्रमाची योजना करा. संयुक्त व्यवसायात वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. व्यवसायात भागीदारी किंवा उपक्रमात सुरु असणारा वादआता सुटण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आवाजही खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या आर्थिक स्थितीत बदल होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात चांगली कामगिरी करता येईल.

मीन रास- मीन राशि साठी सुद्धा हा महिना शुभ राहील. मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना विशेष शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या पूर्ण कामांमध्ये पूर्ण यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीने शुभ फळ मिळू शकतात. त्याचबरोबर नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉस सोबत चे नाते सुद्धा घट्ट होईल. जे लोक या महिन्यात प्रमोशन किंवा प्रमोशन च्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मे महिना चांगली बातमी घेऊन येणार आहे.

याव्यतिरिक्त या राशीचे लोक व्यवसाय करत आहेत त्यामुळे मे महिन्यामध्ये नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या स्वभावात संयम जाणवेल. शेवटच्या दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळात टाकलेल्या परिस्थितीतून सुधारणा होईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामावर चांगला परिणाम होईल. तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. 

कठोर परिश्रम आणि  प्रामाणिकपणा या वळणावर तुम्ही यश मिळवू शकाल. टीम शी संपर्क साधू शकाल. आणि सध्याचे प्रकल्प वेळेत यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कोणालाही पैसे देण्यापूर्वी मात्र तुम्ही थोडा विचार करा. आणि विवेक बुद्धीने निर्णय घ्या. तुम्हाला जुगार सट्टा आणि जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे. 

असा सल्ला दिला जातो आहे. ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही कामाच्या संदर्भात एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास काही दिवस पुढे ढकलण्याचा संकेत दिला जात आहे. विद्यार्थी शिक्षणात नक्कीच चांगली प्रगती करतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *