उधोग-व्यवसाय

BS6 च्या इंधन वर BS4 गाडी चालवल्यास काय परिणाम होणार..

गेल्या काही दिवसांपासून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मरगळ आलेली आहे. इलेक्ट्रिकल्स आणि इतर बदलांमुळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, ही प्रचंड प्रमाणात मंदी आल्याचे कळत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातीलच नव्हे तर प्रत्येक प्रगतिशील देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार येत्या काही वर्षांमध्ये Bs6 हे इंजिन भारतात लागू करण्यात येईल त्याबाबत तयारीदेखील सुरू झाल्याचे बोलले जात आहे. आता भारतात एवढा मोठा बदल झाल्यानंतर त्यानुसार इंधनाची गरज देखील बदलेल असे सांगण्यात येत आहे. तर मग येत्या काही महिन्यांमध्ये भारतात काय आणि कसे बदल होऊ शकतात याबद्दल जाणून घ्याव्यात.

परिवर्तन हा जगाचा नियम आहे त्यानुसारच आपल्या ऑटोमोबाइल इंडस्ट्री लाही काही अपरिहार्य बदलांमधून जावं लागेल. आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत ऑटोमोबाईल सेक्टर थोडं मागं पडलं होतं आणि त्याला चालना देण्यासाठी भारत सरकारने bs6 नवीन इंजिन भारतात आणण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 1 एप्रिल 2020 पासून भारतामध्ये बरेच बदल घडायला सुरुवात होईल कारण नवीन इंजिना सोबत इंधनाचा दर्जा मध्ये देखील बदल करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

सुप्रीम कोर्टाने याबाबत एका याचिकेला उत्तर देताना या तारखेत देखील बदल करण्यास नकार दिलेला आहे, असे सांगितले जाते आहे. याआधी देशामध्ये 2010 ला Bs3 लागू करण्यास परवानगी देण्यात आली होती आणि 2017 मध्ये मोदी सरकारने Bs4 लागू करण्यासाठी मान्यता दिली आता Bs5 च्याजागी सरकारने Bs6 आणायचा मानस आखलेला आहे.

सध्यातरी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या इंटरनल कंबशन या प्रणालीवर काम करत आहेत, आता सरकारने ही प्रणाली देखील बदलायचं ठरवलं आहे कारण या प्रणालीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचं सांगितलं जात आहे. नवीन प्रणालीमुळे हवामानात कार्बन डाय-ऑक्साइड कमी प्रमाणात फेकले जाईल आणि पर्यावरणाला देखील हानी पोहोचणार नाही. मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की इंधन व्यवस्था बदलेल्यानंतरही आम्ही नवीन इंधन आमच्या जुन्या बनावटीच्या गाडीमध्ये टाकू शकू का?

तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या जुन्या बनावटीच्या गाडीमध्ये हे इंधन निश्चिंतपणे टाकू शकता. या इंधनामुळे तुमच्या गाडीला काहीही अपाय होणार नाही याउलट तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स वाढेल प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल, त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन सरकारच्या या बदलांमध्ये आपण सहभागी होऊ या आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी असे बदल अपेक्षित आहेत हे जाणून घेऊया.

Comment here