प्रेरणादायी

दिवसाची सुरुवात ही अशी करावी म्हणजे दिवस नक्किच चांगला जाईल..

म्हणतात ना उद्याचा दिवस हा आजवर रचलेला असतो. म्हणजे शिस्तबद्ध नियोजन हे हवंच.
प्रत्येक गोष्टीत शिस्त ही हवीच.. नाहीतर आपल्याला जसा हवा तसा दिवस कसा जाणार..एकंदरीत दिवसाची सगळी काम विस्कळतील आणि ताण वाढेल.. तर नक्की काय करावं म्हणजे दिवस चांगला जाईल?

सर्वप्रथम सकाळी लवकर उठायला हवं.. आणि शिवाय उद्या आपल्याला नक्की काय करायचंय ह्याचा एकवेळ विचार करायला हवा.. उदा. तुम्ही जर एक एम्प्लॉयी असाल तर उद्या आपल्याला नक्की कोणते कपडे घालायचे ते नीट काढून ठेवावे तिचे नीट इस्त्री केलेली नसेल तर ते करून ठेवावी शिवाय जी accesories आपण वापरता ती नीट आधीच काढून ठेवावी. शिवाय ज्या काही कामाच्या फाईल्स असतील त्या सुद्धा नीट काढून ठेवाव्या.

हे झालं उद्याच नियोजन.. आता नक्की झोपण्यापूर्वी नक्की काय करावं? तर डिनर झाल्यानंतर एक मस्त पैकी walk घ्यावा.. मस्त पैकी ब्रश करावा आणि शक्य असेल तर शॉवर देखील घ्यावा.
आणि मस्तपैकी आरामदायक कपडे घालून झोपावं. जर तुम्हाला डब्ब्यात काही स्नॅक्स किंवा काही ड्राय फूड्स नेण्याची सवय असेल तर ते आधीच डब्ब्यात भरून ठेवावीत.

तर उद्या नक्की कोणत्या कामाला जास्त महत्व द्यावं हे आधीच ठरवून घ्यावं व त्या हिशोबाने सगळी काम करावीत. आपल्याला रोजच्या जीवनात काही सुखद तर काही दुःखद अनुभव देखील येतात.. त्यापैकी झोपताना चांगला अनुभव आठवून झोपाव म्हणजे पोसिटिव्ह पणा टिकून राहील.. व नक्किच दिवस चांगला जाईल.

Comment here