एकाच गोत्रात लग्न करणे योग्य की अयोग्य? | विज्ञान काय सांगत? | शास्रात काय सांगितले आहे | जाणून घ्या सविस्तर

  • by

मित्रांनो लग्न म्हटलं की जात, धर्म, गोत्र, राशीत मंगळ वगैरे आहे का? ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. जुन्या पिढीला हे सर्व माहीत असत परंतु सध्याची पिढी ही या सर्व गोष्टींचा स्वीकार करत नाही.

म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर वरील सर्व गोष्टी ह्या अरेंज मॅरेज मध्ये बघितल्या जातात परंतु लव्ह मॅरेज म्हटलं की, दूरदूर पर्यंत या गोष्टीचा विचार कोणी करत नाही. आणि याच मुळे भविष्यात काही चुकीच्या गोष्टी घडतात. या सर्व गोष्टी आपण शास्त्रीय पद्धतीने सविस्तर बघूया.

गोत्र म्हणजे काय? वैचारिक दृष्ट्या सांगायचे झाले तर ची व्याख्या पुढील प्रमाणे आहे, ‘गो’ म्हणजेच इंद्रिय ‘त्र’ म्हणजेच संरक्षण करणे. म्हणजेच गोत्र म्हणजे इंद्रियांचे वाईट आघातांपासून संरक्षण करणे होय. गोत्र हे मूलतः ४ ऋषींच्या नावावरून उदयास आले. अंगिरा, कश्यप,वरिष्ठ,भृगु तसेच कालांतराने यात जमदग्नी,अत्री,विश्वमित्र आणि अगस्त्य यांची भर देण्यात आली.

विज्ञान काय सांगत? मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का? पुरुषांमध्ये XY गुणसूत्रे असतात तर स्त्रियांमध्ये XX म्हणजेच जर मुलगी जन्मली तर आई कडून X व वडिलांकडून X अशी गुणसूत्र मुलीला मिळतात तसेच जर समजा मुलगा जन्माला तर आईकडून X व वडिलांडून मुलास Y गुणसूत्र प्राप्त होतो.

सांगायचा उद्देश एवढाच गोत्र हे मूलतः वडिलांडून मुलास प्राप्त होतात. आणि म्हणूनच वडील हे मुळीच कन्यादान करतात. अजूनही समजलं नसेल तर एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण प्रत्येक जण हे वरील ७ गोत्रातील एक गोत्रात येतो. म्हणजे च आपल्या प्रत्येकात काही प्रमाणात एकाच गोत्रातील व्यक्तीमध्ये गुणसूत्र हे सारखे असतात.

आणि म्हणूनच समोरचा भलेही वेगळ्या आडनावाचा का असेना त्याच्याशी आपलं काही न काही नात पडतच. म्हणजेच सारख गोत्र असेल तर आपण त्यांना बहीण भाऊ अस म्हणू शकतो.

एकाच गोत्रात लग्न करणे योग्य की अयोग्य? मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं झालं तर हे अयोग्य आहे, कारण यामुळे जन्माला येणारे बाळ हे अपंग जन्मले किंवा त्याला डोळ्याचा आजार होईल किंबहुना बरेच नको ते आजार घेऊन हे बाळ जन्माला येईल. आणि म्हणून च एकाच गोत्रात लग्न करणे हे कुठल्याही परिस्थितीत अवीस्कृत आहे.

अशी एक समज आहे की स्त्री व पुरुष हे जेव्हा लग्न करतात तेव्हा अस म्हटलं जातं की ७ जन्माचा जोडा. आता हे आपण वैज्ञानिक दृष्टीने बघू. आई वडिलांच्या द्वारे गुणसूत्र हे पाल्यास मिळतात. जेव्हा त्याच/तीच लग्न होईल तेव्हा आईकडून मुलीकडे आलेल्या गुणसूत्रांपैकी 20% गुणसूत्र हे तिच्या लेकरात येतील तसच पुन्हा पुढच्या पिढीत हेच 10% प्रमाणात आणि हे अश्याप्रकारे 7 पिढ्यापर्यंत पसरत जातात आणि म्हणुन आपण ७ जन्माचा जोडा अशी प्रतिक्रिया देतो.

आणि म्हणून लग्न करताना या सर्व गोष्टी ह्या आवर्जून बघितल्या जातात शिवाय आजकाल शारीरिक आजार देखील तपासण्याची पद्धत काही ठिकाणी चालू झली याचा फायदा म्हणजे हाच की होणार मूल हे निरोगी जन्माला येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *