प्रेरणादायी

कॉम्पिटिटिव्ह परीक्षा किंवा एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी, जाणून घ्या इंग्रजीबद्दल या महत्वपूर्ण गोष्टी.

आजच्या स्पर्धेच्या युगात तग धरण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून आपण या स्पर्धेत मागे पडणार नाही. आणि यासाठी चांगल्या शिक्षणासोबतच चांगलं संभाषण देखील गरजेचं आहे.

इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, त्यामुळे इंग्रजी मध्ये संभाषण करणं ही काळाची गरज आहे. जर आपल्याला अनेक संधी उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर आपण काळानुरूप इंग्रजी शिकायलाच हवी म्हणूनच या लेखात तुम्हाला इंग्रजी शिकण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला इंग्रजी बद्दल किती ज्ञान आहे हे ठरवणे कारण तुम्ही तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे ठरवलं तरच तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागणार आहे हे लक्षात येईल. जर आपण ठरवलं तर कुठलीही भाषा शिकणं फार अवघड गोष्ट नाही, महाराष्ट्राची भाषा मराठी असली तरीही आपण हिंदी बोलतोच की! त्याच प्रमाणे इंग्रजी देखील शिकणं फार अवघड नाही.

जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशात जायची इच्छा असेल तर तुम्हाला इंग्रजी हे आलं पाहिजे. त्यासोबतच जर तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा किंवा एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तरीदेखील तुम्हाला इंग्रजी लागणारच आहे. वीदेशातच नव्हे जर तुम्हाला भारतात देखील चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरीदेखील तुम्हाला इंग्रजी बोलता येणं गरजेचं आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

इंग्रजी शिकण्याचे चार टप्पे आहेत. 1.इंग्लिश ग्रामर ( English Grammar ): म्हणजेच इंग्रजी भाषेचे व्याकरण शिकणे. कुठल्याही भाषेचा पाया म्हणजे त्या भाषेचे व्याकरण होय त्यामुळे जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर आधी इंग्रजीचे व्याकरण संपूर्ण समजून घ्या.

उच्चार ( pronunciation ): म्हणजेच उच्चार इंग्रजी भाषेत अनेक शब्दांचे उच्चार हे वेगळ्या प्रकारे केले जातात आणि त्यांना लिहिलं वेगळ्या प्रकारे जाते, त्यामुळे ग्रामर ची तयारी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या शब्दांचे उच्चार आत्मसात करणे होय.

उच्चार शिकण्यासाठी तुम्ही अनेक पर्याय करू शकता तुम्ही तुमच्या मित्रांशी, परिवारातील लोकांशी इंग्रजीतून संवाद केलात तर तुमचे उच्चार नक्कीच सुधारतील आणि अजून चांगल्या उच्चारांसाठी तुम्ही इंग्लिश चित्रपट आणि गाणी ऐकायला हवीत.

शब्द संग्रह ( vocabulary ): कुठल्याही भाषेत प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्हाला त्या भाषेचे जास्तीत जास्त शब्द माहिती असणे गरजेचे आहे. कारण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही नवीन नवीन शब्दांचा प्रयोग तुमच्या बोलण्यामध्ये करता तेव्हाच व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीने बातचीत करण्यासाठी तुम्हाला किमान हजार-बाराशे शब्द माहिती असणे गरजेचे आहे बाकी शब्द तुम्ही हळूहळू शिकू शकता.

शब्दसंग्रह वाढवण्यासाठी तुम्ही इंग्रजी पुस्तक आणि वर्तमान पत्र वाचायला हरकत नाही त्यामध्ये नवीन वाटणारे शब्द तुमच्या कडे लिहून घ्या आणि डिक्शनरी च्या माध्यमातून त्याचा अर्थ जाणून घ्या.

इंग्रजी शिकण्याची पद्धत बदलत राहा: आपल्याकडे कुठली नवीन भाषा शिकायची म्हणजे अनेक वर्षांपासून चालत येणाऱ्या जुन्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतीने तुम्हाला इंग्रजी शिकता येईल परंतु चांगल्या पद्धतीने आणि लवकर इंग्रजी आत्मसात करण्यासाठी तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी नेहमी नवीन प्रयोग करून पाहायला हवेत त्यामुळे तुमची बोलण्याची पद्धत अजून चांगली होईल.

Comment here