आज काल टेक्नॉलॉजीच हे युग प्रचंड प्रमाणात बदलत आहे. एकीकडे जिथे कुठला स्पीकर आवाज रेकॉर्ड करण्यासाठी चांगला आहे, अशी स्पर्धा लागलेली असते. तिथेच दुसरीकडे काही दिवसांपूर्वी फेसबुकने प्रोनाऊनसिएशन (pronunciation) नावाचा एक प्रोग्राम देखिल लॉन्च केला आहे. हा प्रोग्राम लॉंच केल्यामुळे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये खळबळ माजली आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात.
सध्या आपली टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल करताना जाणवते आहे. आज आपल्याकडे अनेक प्रकारचे स्पीकर्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून आपण अनेक प्रकारची काम लीलया करू शकतो. आपण त्यामध्ये आपला आवाज रेकॉर्ड करू शकतो आणि त्याला व्हॉइस कंट्रोल देखील करू शकतो. अशा टेक्नॉलॉजी च्या काळात फेसबुक देखील एक नवीन प्रयोग करत आहे. सध्या जरी हा पायलेट प्रोजेक्ट असला तरी फेसबुक लवकरच याचा आपलिकेशन मध्ये नक्कीच वापर करेल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.
फेसबुकनेही नुकतंच प्रोनाऊनसिएशन नावाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे. या अंतर्गत फेसबूक युजर्स त्यांचे आवाज रेकॉर्ड करून पैसे देखील कमवू शकतात. यासाठी तुम्हाला व्यु पॉईंट मार्केट या ॲप्लीकेशन बद्दल जाणून घ्यायला लागेल. फेसबुकने हा प्रोग्राम या ॲप्लिकेशन वरती चालू केलेला आहे. या प्रोग्रामच्या अंतर्गत तुम्हाला सहभागी होण्यासाठी एक टेस्ट द्यावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही सहभागी होऊ शकता. प्रोग्राम मध्ये सहभागी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आणि तुमच्या दहा मित्रांचा आवाज रेकॉर्ड करावा लागेल.

रेकॉर्डिंगचा हा असा एक सेट पूर्ण झाल्यानंतर फेसबुक तुम्हाला 200 पॉईंट देते आणि लक्षात ठेवा असे हजार पॉइंट कलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पॉईंट pay pal या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेडीम करू शकता. लक्षात ठेवा हजार पॉइंटचे फेसबुक तुम्हाला $5 डॉलर देत आहे, म्हणजेच 360 भारतीय रुपये तुम्हाला मिळतील. फेसबुक ने सध्या हा प्रोग्राम फक्त अमेरिकेतच चालू केलेला आहे कदाचित काही दिवसांनंतर फेसबूक हा प्रोग्राम भारतातही चालू करेल. या प्रोग्राम मध्ये अठरा वर्षाच्या वरील व्यक्तीच भाग घेऊ शकतात.