Skip to content

Netflix आणि Amazon Prime Video या व्यतिरिक्त, फ्रीमध्ये हे OTT प्लॅटफॉर्म ट्राय करा

  • by

Netflix, Amazon Prime Video हे प्लॅटफॉर्म सगळ्यांना अनेक वेबसेरीज मुळे ओळखीचे आहे. OTT प्लॅटफॉर्मनेच भारतातील लोकांना सांगितले कि वेब सीरीज काय असते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कसे काम करते. या दोन मोठ्या नावांशिवाय काही भारतीय नावे आहेत जे हळू हळू वाढत आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांना नवीन संधी मिळाली आहे आणि त्यांचे सब्सक्राइबर्स झपाट्याने वाढत आहेत. जसे कि Alt Balaji ने असा दावा केला आहे की त्यांना मार्चपासून दररोज 17000 सब्सक्रिप्शन मिळत आहेत. तुम्हीदेखील अशा भारतीय स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मला सब्सक्राइब करण्याचा विचार करत असाल तर ही लिस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Sony LIV – Sony LIV 2013 मध्ये लाँच केले गेले होते. येथे अनेक प्रकारचे नेशनल और इंटरनेशनल शो आणि चित्रपट पाहायला मिळतील. त्यावर थेट लाइव मैच देखील तुम्ही पाहू शकता. एक महिन्याचे सब्सक्रिप्शन 299 रुपये, सहा महिन्याचे 699 रुपये आणि एक वर्षाचे फक्त 999 रुपयांमध्ये आहे.

Zee5 – झी 5 2015 मध्ये लाँच केले गेले होते. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तेलगू, मलयाल या प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपटही आहेत. आपण येथे चिन्टू का बर्थडे, मुल्क सारखे सामाजिक चित्रपट पाहू शकता. येथे मुलांसाठी छोटा भीम आणि द जंगल बुक आहे. तुम्हाला जर एका महिन्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यायच असेल तर 299 ला आहे. जर तुम्हाला सहा महिन्याच घ्याच असेल तर  699 रुपये आणि एक वर्षासाठी फक्त 999 रुपयांमध्ये आहे .

Alt Balaji – बालाजी टेलिफिल्म्सने हे एप्रिल 2017 मध्ये लाँच केले गेले होते. त्यात फिल्टी टॉक, एक्सएक्सएक्स सारख्या वेब सीरिज व्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओंची लांबलचक यादी आहे. सब्सक्रिशन खूप स्वस्त आहे. ते फक्त 100 रुपयांमध्ये तीन महिन्यांसाठी सब्सक्राइब भेटते. 300 रुपयांमध्ये हे तुम्ही वर्षभरपाहू शकता.

TVF Play – द व्हायरल फीव्हरने एक रोचक सीरीज तयार केली आहे. द कोटा फॅक्टरी, पिचर्स, परमानेंट रूममेट्स या देखील आहेत. त्याचे कन्टेंट फ्री आहे, यासाठी तुम्हाला अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल .

VOOT- वियाकॉम 18 ने 2016 मध्ये याला लाँच केले गेले होते. बिग बॉस, रोडीजसारखे शो देखील येथे आहेत. त्यांनी मुलांसाठी वूट किड्स नावाचे स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. एका महिन्याचे सब्सक्रिप्शन फक्त 99 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि एक वर्षाचे सब्सक्रिप्शन 499 रुपये आहे.

MX Player – मॅक्स प्लेअर 2011 मध्ये लाँच केले गेले होते. हे भौकाल आणि रक्तांचल या शोसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला येथे वूट आणि हंगामा चे कन्टेंट देखील येथे मिळेल. हिंदी चित्रपटही आहेत. आणि हे विनामूल्य आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला सब्सक्रिप्शन गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *