रामायणातील सीता दीपिका चिखलीयाचे झाले होते या उद्योजका सोबत लग्न.. बघा लग्नाचे फोटो

  • by

रामानंद सागर यांच्या मालिका ‘रामायण’ चे प्रसारण सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाशी संबंधित सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुसऱ्यांदा प्रसारित केले तरीही या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. रेटिंगच्या बाबतीतहि या मालिकेने बर्‍याच कार्यक्रमांना मागे टाकले आहे. आता पुन्हा एकदा ‘रामायण’ प्रसारित होत आहे, या मालिकेमधील कलाकारांबद्दल चाहत्यांना बरेच काही जाणून घ्यायचे आहे. रामायणात सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलियाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

wikibiodata.com

रामायणात सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया लग्नानंतर दीपिका टोपीवाला बनली आहे. पण आजही तिला सीता म्हणून ओळखले जाते. दीपिकाने बर्‍याच शोमध्ये काम केले असले तरी सीता बनून तिने सर्वांच्या हृदयात बनवलेली जागा आजही अबाधित आहे. चित्रात लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दीपिका चिखलिया आणि तिचा नवरा दिसत आहे.

रामायणाच्या लोकप्रियतेनंतर दीपिकाने 1991 मध्ये गुजराती उद्योगपती हेमंत टोपीवालाशी लग्न केले. दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनला स्वत: राजेश खन्ना उपस्थित होते. त्यावेळी दीपिका इतकी लोकप्रिय होती की तिचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक गर्दी करत असत. सीतेच्या पात्रामुळे तिने तिच्या कपड्यांकडेही विशेष लक्ष दिले होते.

wikibio.in

दीपिका चिखलिया आणि हेमंत टोपीवाला यांना दोन मुली आहेत. तिचा नवरा कॉस्मेटिक कंपनीचा मालक आहे. दीपिका या कंपनीच्या संशोधन आणि विपणन संघाच्या प्रमुख आहेत. ही कंपनी श्रृंगार बिंदी आणि नेलपॉलिश बनवते. लग्नानंतर दीपिकाने केवळ काही चित्रपट केले आहेत. ती अखेर आयुष्मान खुरानाच्या ‘बाला’ चित्रपटात दिसली होती. रामायणामध्ये सीता मातेचा रोल करताना दीपिका फक्त 15-16 वर्षांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published.