उधोग-व्यवसाय

सध्या शहरांमध्ये प्रचंड मागणी असलेले ऑरगॅनिक फूड स्टोअर कसे सुरु करावे, उपयुक्त माहिती, वाचा सविस्तर

भारतामध्ये विविध प्रकारच्या भाज्या मोठ्या प्रमाणावर ते उत्पादित केल्या जातात कारण भारतात शाकाहार करणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि याच व्यक्तींमुळे अनेक प्रकारच्या भाज्या आपल्याला मोठ्या प्रमाणात लागतात.

भारतात आज तुम्हाला अनेक प्रकारच्या भाज्या सहजासहजी उपलब्ध होतात परंतु कधी असा विचार केला आहे का की या भाज्या कुठल्या प्रकारच्या पाण्यावरती तयार होतात, त्यांना योग्य प्रकारचं खत दिलं जातं का? वाढत्या आधुनिकीकरणामुळे आता प्रत्येक शेतकरी मोठ्या प्रमाणावर ती पीक घेण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नांमुळेच मग उत्पादनावरती अनेक प्रकारचे रासायनिक प्रयोग केले जातात जे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून ऑरगॅनिक पद्धतीच्या उत्पादनांची मागणी वाढलेली आहे.

आज भारतातील एक मोठा गट असा आहे ज्याला ऑरगॅनिक पद्धतीने भाजीपाला मिळाला तर तो तुम्हाला वाढीव दराने पैसे द्यायला देखील तयार आहे. भारतात आजच्या परिस्थितीत अशा ऑरगॅनिक पद्धतीच्या उत्पादनांची प्रचंड गरज आहे. तर मग आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑर्गनिक पद्धतीने उत्पादन कशाप्रकारे घेता येतील आणि भारतीय बाजारांमध्ये कशा प्रकारे हा व्यवसाय वाढवता येईल.

आपण दैनंदिन आहारामध्ये अशा अनेक गोष्टींचे सेवन करतो ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहेत. या गोष्टींमुळे आपल्या शरीराला अपाय पोहोचू शकतो, पण या परिस्थितीला आपण कारणीभूत नसून वाढतं औद्योगिक या परिस्थितीला कारणीभूत आहे. ऑरगॅनिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने इतर उत्पादनाच्या पेक्षा नक्कीच मानवी शरीराला जास्त प्रमाणात फायदा देतात. आणि याबाबतीत जनमानसामध्ये प्रबोधन झाल्यामुळे मागच्या तीन वर्षांमध्ये जवळपास 25% बाजारपेठ ही ऑरगॅनिक उत्पादनांसाठी ओळखली जात आहे. याच कारणामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये ऑरगॅनिक फूड स्टोअर ची मागणी वेगाने वाढलेली आहे.

भारतात आज देखील अनेक उत्पादन शेतीच्या साह्यानेच घेतले जातात. ही शेती आज-काल प्रामुख्याने दोन पद्धतींमध्ये विभागलेली आहे एक म्हणजे ऑरगॅनिक आणि दुसरी म्हणजे नॉन ऑरगॅनिक. नॉन ऑरगॅनिक शेतीच्या पद्धती मध्ये निर्माण केलेल्या भाज्या, फळं यामध्ये केमिकल चा मोठ्याप्रमाणात वापर केलेला असतो. त्यामुळे अशी धारणा आहे की नॉन ऑरगॅनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली ही उत्पादन मानवी शरीरासाठी प्रचंड घातक आहेत आणि विज्ञानाने देखील या धारणेला पुष्टी दिलेली आहे.आजच्या परिस्थितीत प्रत्येक मनुष्य चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या बाबतीत संपूर्ण देशामध्ये चांगल्या प्रमाणात प्रबोधन झालेलं आहे, याच कारणामुळे संपूर्ण देशात ऑरगॅनिक फूड स्टोर ची मागणी वाढलेली आहे.

खरं पाहता ऑरगॅनिक फूड स्टोअर चा बिजनेस चालू करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागत नाही सुरुवातीच्या काळात अगदी पंधरा-वीस हजारात देखील तुम्ही मोठ्या प्रमाणावर ती हा उद्योग सुरू करू शकता. प्रक्रियादेखील अत्यंत साधी आणि सोपी आहे. तुम्ही नेहमीप्रमाणेच उत्पादन घेऊ शकता फक्त एक काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी म्हणजे तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा जेणेकरून या उत्पादनांमध्ये रासायनिक पदार्थ आढळणार नाहीत.

ऑरगॅनिक फूड प्रॉडक्ट हे नॉन ऑरगॅनिक फूड प्रॉडक्ट पेक्षा नक्कीच महाग असतात कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती उत्पादन घेणे शक्य होत नाही असे जरी असले तरीही आज बाजारामध्ये ऑरगॅनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना खूप मोठ्या प्रमाणावर ती मागणी आहे. तुम्ही फक्त तुमचे उत्पादन बाजारात योग्य पद्धतीने कसे जाईल याचा विचार करा आणि हो यामध्ये जरादेखील खंड न पडू देता तुमच्या ग्राहकांपर्यंत तुमचे उत्पादन अविरतपणे जात राहायला हवं.

अशा प्रकारचं दुकान सुरू करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की बाजारात तुमच्यापेक्षा स्वस्त उत्पादनं सहज उपलब्ध होतात, त्यामुळे हा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला अत्यंत चांगल्या जागेची आवश्यकता भासणार आहे. तुमचा उद्योग अशा ठिकाणी सुरू करा जीथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होईल. शक्यतो अशा ठिकाणी उद्योग सुरू करावा ज्या ठिकाणी या ऑरगॅनिक उत्पादनाबाबत लोकांमध्ये जागृती असेल आणि ही उत्पादनात ते सहजरित्या विकत घेऊ शकतील. यासोबतच जागा निवडताना वीज-पाणी प्रतिस्पर्धा रस्ता या घटकांचा देखील विचार नक्कीच करायला हवा.

अशाप्रकारचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्र पुर्ण करायला हवेत, त्यासोबतच संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊनच तुम्ही उद्योगाला प्रारंभ करायला हवा. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर ती उत्पादन करण्याचा विचार करत असाल तर योग्य प्रकारे पॅकेजिंग करणंदेखील आवश्यक असतं.

जेव्हा तुम्ही उत्पादन घ्यायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून त्याचा खर्च तुमच्याकडे लिहून घ्यायला हवा, ज्यामुळे जेव्हा उत्पादन पूर्णपणे तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला त्यासाठी आलेला सर्व खर्च माहिती असेल आणि या हातात असलेल्या खर्चा वरूनच तुम्ही ग्राहकाला अत्यंत चांगल्या दरात चांगल्या प्रतीचे उत्पादन देऊ शकाल.तुम्हाला आणि ग्राहकाला देखील परवडेल अशा प्रकारे त्याचा बाजार भाव ठरवून घ्यावा. हा बाजार भाव ठरवताना आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या प्रतिस्पर्धी या उत्पादनांचा देखील तर तुम्हाला ठाऊक असायला हवा जेणेकरून तुम्ही त्या दृष्टीने तुमच्या उत्पादनांचा बाजार भाव अत्यंत सहजपणे ठरू शकाल.

Comment here