Skip to content

‘तुम्बाड’ चित्रपट का होत आहे लोकप्रिय, शूटिंगसाठी लागली होती 6 वर्षे, जाणून घ्या सविस्तर.

  • by

अभिनेता सोहम शाह हा गुलाब गँग, तलवार आणि सिमरन सारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. महाराष्ट्रातील ‘तुम्बाड’ नावाच्या खेड्यातील काल्पनिक कथा ‘तुम्बाड’ मधून त्यांनी पदार्पण केले. याबाबत सोशल मीडियावर आज बरीच चर्चा रंगली आहे.

या चित्रपटाची कथा १९१८ पासून सुरू होते जिथे विनायक राव (सोहम शाह) आपल्या आई आणि भावासोबत महाराष्ट्रातील तुम्बाड गावात राहतात. पण तिथल्या घराच्या खोलीत एक खजिना लपलेला असल्याचे सांगितले जाते. ज्याची आई देखील त्याचा शोध घेत असते. पण अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे त्याची आई त्याला पुण्यात घेऊन जाते. पंधरा वर्षानंतर विनायक पुन्हा तुम्बाडला जाऊन खजिन्याचा शोध घेऊ लागतो.

‘तुम्बाड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटाला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून या चित्रपटाची शूटिंग पूर्ण सहा वर्षात झाली. चित्रपटातील तुम्बाड हे गाव काल्पनिक आहे पण काल्पनिक गावात नेहमीच पाऊस पडताना दिसतो, चित्रपटाचे बहुतेक देखावे पावसात शूट केले आहेत. बनावट पावसाचा अवलंब करुन चित्रपटाचे चित्रीकरण पटकन केले जाऊ शकत होते, परंतु चित्रपटामध्ये सर्व काही वास्तविक दिसावे, म्हणून चित्रपटाच्या सर्व दृश्यांना पावसाळ्यात चित्रित केले गेले, ज्यात चित्रपटाला बराच वेळ लागला असला तरी सर्व देखावे चित्रित करण्यासाठी 4 पावसाळे लागले. पण प्रेक्षकांना चांगला चित्रपट मिळाला आहे.

Youtube

‘तुम्बाड’ देखील नुकताच डिजिटल व्यासपीठावर आला आहे आणि हा चित्रपट भारतात ट्रेंड करत आहे, चित्रपटासाठी लोकांचे फॅनफॉलिंग दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावरील नेटिझन्स या चित्रपटाचे खूप कौतुक करीत आहेत. या ट्रेंडबाबत सोहम शाह म्हणाले की, ‘सकाळी सकाळी किती मोठे सरप्राइज आहे, भारतात #Tumbbad चा ट्रेंडिंग पाहून खूप आनंद झाला आहे, लोक अजूनही आमच्या प्रेमाने केलेल्या श्रमांवर प्रेम करतात’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *