Skip to content

जगातील सर्वात श्रीमंत मंदिर पद्मनाभ स्वामी, सोन्याने भरलेल्या गुफांचे गूढ काय आहे?

  • by

केरळमधील तिरुवनंतपुरम, पद्मनाभ स्वामी मंदिर जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. या मंदिरातील 7 दरवाजांपैकी 6 दरवाजे उघडले असून 7 व्या दरवाजाचे गूढ अजून कायम आहे.

हाय कोर्टाच्या आदेशानुसार 7 वा दरवाजा उघडण्याचे प्रयत्न करण्यात आले परंतु त्यात यश आले नाही. ब्राह्मण आणि इतिहासकारांच्या मते हा दरवाजा फक्त कोणी सिद्ध पुरुष मंत्रोउचारणा द्वारेच उघडू शकेल. कुठल्याहि आधुनिक साहित्याने हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यात मंदिराचा नाश होऊ शकतो आणि हि गोष्ट मोठ्या महाप्रलयाला कारणीभूत ठरू शकते.

असे म्हटले जाते कि या दरवाज्या च्या आतल्या भागात मोठ्या प्रमाणात विषारी सापांचा निवास आहे, तसेच या दरवाजावरही मोठ्या सापांच्या प्रतिकृती आहे. 

6 दरवाजांमधून निघालेल्या खजिन्यामध्ये 2 लाख कोटींचा खजिना आहे. पण इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात त्याची किंमत दहा पट अधिक आहे. सोने आणि चांदी अशा अनेक मौल्यवान गोष्टी आहेत ज्यात मौल्यवान चेन, हिरे, नीलम, माणके, इतर मौल्यवान रत्ने, सोन्याचे शिल्पे, मोती, ज्याच्या मूळ किमतीचा अंदाज लावणे कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *