Skip to content

यशाचा मंत्र: यशस्वी लोक या चुकांची कधीही पुनरावृत्ती करत नाही, जाणून घ्या येथे त्या चुका.

  • by

असे म्हटले जाते की जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिने कधीही चूक केली नसेल. अशात, एखादी चूक करणे गुन्हा नाही, परंतु आपण आपल्या चुकांमधून काही शिकत नाही आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा करता तेंव्हा आपल्याला अपयश येत राहते. चला तर जाणून घेऊ या अशा चुकांबद्दल ज्याची पुनरावृत्ती करू नयेत. यशस्वी लोक या चुकांची पुनरावृत्ती कधीच करत नाहीत.

आपले ध्येय निश्चित करा: आपल्यातील बर्‍याचजण आपल्या जीवनातील ध्येय किंवा उद्दीष्टांबद्दल स्पष्ट नसतात. त्याचबरोबर आपली प्राधान्यक्रमातील कामे देखील अशी आहेत की ज्यांचा आपल्या ध्येयाशी काहीही संबंध नाही. अशा परिस्थितीत गोंधळात न पडणे आणि आपले प्राधान्यक्रम निवडणे फार महत्वाचे आहे.

वेळेचे व्यवस्थापन करत नाही: आपल्यापैकी बर्‍याच जण वेळेबद्दल तक्रारी करतात की कामासाठी वेळ पुरात नाही. यश मिळवण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. बरेच लोक हे वेळेचे नियोजन करतात परंतु त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करत नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा कामात अपयश येते. त्यामुळे यश मिळवण्यासाठी वेळेच्या नियोजनासोबतच ते अमलात आणणेही तितकेच महत्वाचे असते.

छोट्या छोट्या यशांनी अतिउत्साही होणे: आपल्यातील बरेच लोक असे आहेत, जे लहान यश मिळवल्यानंतर खूप आनंदित होतात व अतिउत्साहात येऊन काहीतरी चुका करतात. तर बऱ्याच लोकांना मिळवलेल्या यशाचा अहंकार येतो. आणि तो अहंकार नंतर त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरतो.

नकारात्मक विचाराने प्रभावित होणे: बर्‍याचदा लोक वेळेच्या वेळेस अशा बर्‍याच गोष्टी करतात ज्याचा आपल्या यशाशी काही संबंध नाही आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे फार महत्वाचे आहे. समाजात वावरताना आपला संबंध बऱ्याच वेळेला नकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत येतो, अशावेळी आपल्या ध्येयसाठी योग्य आणि अयोग्य काय हे आपण स्वतः समजून घेणे फार महत्वाचे ठरते.

एखाद्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणे: कोणत्याही विषयाचा अधिक विचार केल्याने आपल्याला काहीही मिळते नसते. म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. योग्य रणनीती बनवा आणि त्यानुसार कार्य करा. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत अयशस्वी झाले तर जराही विचलित न होता अपयश येण्यामागची कारणे शोधून त्याचे विश्लेषण करणे, आणि पुन्हा नव्याने चांगल्यारीत्या प्रयत्न करणे योग्य ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *