Skip to content

अमरनाथ गुहेची १० अद्भुत रहस्ये. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

हिंदू मान्यतेनुसार अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. असे म्हणतात की ज्याने अमरनाथ याची यात्रा केली त्याचे जीवन सफल होत. जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेली अमरनाथ गुहा ही जगभरात भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. त्याचा विश्वास इतका आहे की दरवर्षी लाखो लोक आव्हानांना तोंड देत हा प्रवास पूर्ण करतात. ४८ तासाचा प्रवास दरवर्षी जुलैमध्ये सुरू होतो.

येथील मुख्य आकर्षण म्हणजे अमरनाथ गुहा वर्षभर ही गुहा प्रचंड बर्फामुळे झाकलेली राहते उन्हाळ्यात हा बर्फ वितळायला लागल्यावर काही काळ भाविकांसाठी खुला केला जातो. तसे अमरनाथला तीर्थक्षेत्र देखील म्हटले जाते. कारण येथेच भगवान शिवानी आपल्या दिव्य पत्नी पार्वतीला जीवन आणि अनन्य काळाची रहस्य सांगितले आहेत. चला तर या रहस्य गुफेबद्दलची १० रहस्य जाणून घेऊयात.

१) जम्मू काश्मीरमधील असलेल्या अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीच शिवलिंग प्रकट झालाय जून महिन्याच्या सुरुवातीला शिवलिंग हळूहळू पूर्ण रूप घेत. अमरनाथ येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होत. हे शिवलिंग साधारणपणे आठ ते दहा फूट उंचीचा असत. शिवलिंगाचा आकार हवामान प्रमाणे कमी जास्त होत असतो. शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो असही मानल जात. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक अमरनाथ यात्रा करतात.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच यात्रेला सुरुवात झालेली असते आणि ही ऑगस्ट महिन्यापर्यंत चालते. नैसर्गिक बर्फापासून निर्माण झालेले असल्यामुळे त्याला स्वयंभू शिवलिंग असेही म्हणतात. अमरनाथ गुहा श्रीनगर पासून १४१ किलोमीटर अंतरावर असून ३८८८ मीटर उंचीवर आहे. गुहेची लांबी लांबी १९ मीटर आणि रुंदी १६ मीटर आहे. अमरनाथ गुहे बद्दल अनेक रहस्य सांगितली जातात. त्याची उकल अद्याप कोणालाही करता आली नाही.

२) अमरनाथचे नाव कसे पडले? तर असे म्हणतात की भगवान शंकरांनी देवी पार्वतीला अमरत्वच रहस्य सांगण्यासाठी निर्जन ठिकाणी असणाऱ्या गुहेत नेल . तिथे कोणीही येणार नाही याची दक्षता घेतली. या ठिकाणी असणाऱ्या गुहेतच शिवशंकरांकडून अमृतवाच रहस्य सांगितला गेल. म्हणून या गुहेला अमरनाथ गुहा असे म्हटले जाते. त्याचबरोबर या गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होत असल्यामुळे त्याला बाबा बर्फानी या नावाने देखील संबोधल जात.

३) शिवाय अमर गुहेत प्रकट होणाऱ्या शिवलिंगाबाबत अनेक रहस्य दडलेली आहेत. हे शिवलिंग तयार होण्यासाठी पाझरत पाणी हे नेमक कुठून येत याचा शोध अद्याप लागलेला नाही.

४) जुलै महिन्यापूर्वी हे शिवलिंग संपूर्ण रूपात प्रकट होत अशी मान्यता आहे. इथे बनलेला शिवलिंग घन बर्फाचे आहे. तर गुहेच्या आत असलेल्या बर्फ कच्चा आहे. जो स्पर्श करताच विरघळतो अस म्हटल जात. याबरोबर या गुहेमध्ये लहान हिमखंड आहेत. त्यांना श्री गणेश आणि माता-पार्वतीचे रूप समजले जात. मात्र शिवलिंगाच्या बाजूला असलेला बर्फ मऊ आणि ठिसूळ आहे. मात्र प्रकटणारे शिवलिंग एकदम कणखर असत. त्यामुळे हे कस शक्य होत याबाबत ठोस माहिती हाती लागू शकली नाही.

५) अनेक किलोमीटर पायी चालत आल्यावर अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर माणसाला एकदम उत्साही झाल्यासारख वाटत असही सांगितल जात. त्यामुळे सर्व थकवा दूर होऊन शरीरात चैतन्य संचार करत. अस का होत याबाबतही काही गुड कायम आहेत.

६) महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला अमरत्व रहस्य सांगण्यासाठी निर्जन ठिकाणी असलेल्या गुहेत नेल आणि तेथे कोणीही येणार नाही याची दक्षता घेतली. यावेळी आपल्या गळ्यातील शेषनाग अनंत नाग यांना दूरवर सोडल अस म्हणतात की ते ठिकाण शेषनागजी आनंदनाथ त्रिशूल टॉप या नावाने ओळखले जातात. नीलमतपुरानात या संदर्भातील उल्लेख आढळतो.

७) धार्मिक पौराणिक कथेनुसार गुहेत उपस्थित असलेल्या दोन कबुतरांची कथा देखील भगवान शिव आणि माता पर्वती यांच्याशी संबंधित आहे अस म्हंटल जात. महादेव शिवशंकर जेव्हा माता-पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगत असतात तेव्हा त्या गुहेच्या बाहेर एक कबुतराची जोडी येऊन बसली आणि यामुळे या कबुतराची जोडी अमर झाली.

कारण कबुतराच्या या जोडीने महादेवांच्या वाणीतून निघणाऱ्या अमरत्वाचे रहस्य ऐकले. तेव्हापासून गुहेतील दोन कबुतरांची कथा लोकप्रिय झाली. अमरनाथ गुहेजवळ आजच्या काळातही एक कबुतराची जोडी उपस्थित असते. मात्र ती सर्वांना दिसत नाही. ज्या व्यक्तीला ती जोडी दिसते त्याला मोक्ष प्राप्त होतो अस सांगितल जात.

८) पौराणिक कथेनुसार अमरनाथ गुहेचा शोध कोणी लावला पौराणिक कथेनुसार अमरनाथ गुहेचा शोध भुगृमुनी लावला होता असे म्हटले जाते. असं म्हणतात की फार पूर्वी काश्मीर खोर पाण्यात बुडाला होत. कशप्त मुलींनी नद्यांच्या मालिकेतून हे पाण्या बाहेर काढल. त्यानंतर भुगृमुनी हे अमरनाथ गुहेला भेट देणारे पहिले व्यक्ती होते असे सांगितले जाते.

९) त्याबरोबरच रहस्यमय साधूची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे वास्तविकता बोधा मलिक नामक मुस्लिम इसामाना या गुहेचा शोध लावला असेही म्हटल जात. या परिसरात तो शेळ्या मेंढ्या चरायला नेत असेल. एखादा पर्वतावर साधू या मलिकाला भेटला. त्यांनी त्याला कोळशाने हात शिकण्याचे पात्र दिल. बोदा मलिकाने ते घरी येऊन पहिल तर त्यात खूप सोन्याची नाणी असल्याचा दिसल.

साधू महाराजांना धन्यवाद करण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी गेला असता त्याचा कुठेच पत्ता नव्हता. मात्र त्याला एक गुफा तिथे दिसली ती गुफा अमरनाथांची गुफा असल्याचे सांगितले जात. बुठा मलिक गुहेमध्ये गेले असता त्यांना बर्फाचे शिवलिंग दिसले. त्यांनीही बाब गावकऱ्यांना येऊन सांगितल. सर्व गावकरी त्या ठिकाणी गेले सर्वांनी बाबा बर्फानी या घटनेच्या तीन वर्षानंतर अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली अस सांगितल जात.

तेव्हापासूनच बुठा मलिक यांनी त्यांचे वंशज या अमरनाथ गुहेची सेवा देखरिक करतात अस सांगितल जात. अमरनाथ यात्रा सुमारे वर्षाची ४५ दिवसांची असते. असे म्हणतात मुख्यतः जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या भावा बहिणीच्या पवित्र आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन पर्यंत लाखो प्रवासी हिमखंड दर्शनासाठी येथे येतात.

१०) तर ही अमरनाथ यात्रा कशी करावी दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त अमरनाथ यात्रेला येतात. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जम्मू काश्मीर पर्यटन स्थळातून पलहाकाला जाण्यासाठी सरकारी बस उपलब्ध आहे. इथून अमरनाथ यात्रा सुरू होते असे सांगितलं जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *