Skip to content

असे असतात मीन राशीचे लोक, बघा तुमची किंवा तुमच्या घरातील व्यक्तींशी जुळतेय का ही माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज आपण ज्योतिष्यशास्त्रानुसार मीन राशि विषयी माहिती पाहणार आहोत. मीन राशि ही राशि चक्रातील शेवटची म्हणजे बारावी राशी असून या राशीचा स्वामी गुरु आहे. हे जलतत्त्वाची राशी असून दिशा उत्तर आहे. यांच्यासाठी शुभवार मंगळवार गुरुवार आणि रविवार आहेत. शुभरंग लाल गुलाबी पिवळा आणि केशरी असून शुभांक एक तीन चार आणि नऊ आहे. 

मीन राशीचे लोक हे फारच दयावान दयाळू आणि भावनिक स्वभावाचे मानले जातात. हे अतिशय संवेदनशील आणि फारच भाऊक मानले जातात. गुरुचा प्रभाव असल्याने फार बुद्धिमान आणि शारीरिक दृष्ट्या स्वस्त असतात. ते स्वतंत्र विचाराचे असून बंदनात राहणे त्यांना पसंत नसते. हे स्वतःच स्वतःचे निर्णय घेतात.

यांची निर्णय क्षमता फार मजबूत असून हे अनेक प्रतिभेचे धनी असतात. कोणतेही काम करताना फार विचारपूर्वक करतात. हे कल्पनाशील असून सामान्य लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि ज्ञानी मानले जातात. पण बऱ्याच वेळा नकारात्मक मानसिकता आणि निराशावादी दृष्टिकोनामुळे विजयाला देखील पराजयामध्ये बदलू शकतात. यांच्याकडे एकाग्रतेची कमी असते.

 कामांमध्ये सातत्य ठेवणे यांना अवघड जाते. एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतात. किंवा नित्य काही नवे करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्यात विचारांची एक सीमा असते. जेव्हा जेव्हा यांचा निर्णय चुकतो किंवा अपयश त्यांच्या पदरी येते तेव्हा हे फार निराश होतात. हे आध्यात्मिक स्वभावाचे असतात. अध्यात्माची फार आवड असते. पूजा पाठ करण्यावर भर असते. 

एक आदर्शवादी जीवन जगण्यावर भर देतात किंवा विश्वास करतात. हे क्षमाशील वृत्तीचे असून अतिशय रोमँटिक स्वभावाचे मानले जातात. यांचे नुकसान किंवा अजित करणाऱ्यांना सुद्धा हे फार लवकर क्षमा करतात. दुसऱ्यांच्या गोष्टींचा यांच्यावर फार लवकर प्रभाव पडतो. त्यामुळे अनेक वेळा संकटांना घाबरतात.

 पण काही वेळ उलटल्यानंतर स्वतःला सावरून संकटाचा सामना करून त्यातून बाहेर देखील पडतात. कार्यक्षेत्रात अतिशय मन लावून आणि एकाग्रचिताने कामे करतात. नोकरीत अधिकारी वर्ग त्यांच्यावर खुश असतो. हे कधी आशावादी तर कधी निराशावादी पण बनू शकतात. लोकांना समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लावतात. 

हे लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांच्या आधारावर जगणे यांना आवडत नाही. जीवनातील जोडीदारांमध्ये पूर्णपणे समर्पित असतात. त्यांचे अंतकरण अतिशय निर्मळ असते. त्यामुळे यांना भाग्याचे भरपूर सात लाभते प्राप्त होते. 

आणि म्हणून यांची प्रगती आणि उन्नती होत असते. चळकपट करणे यांना आवडत नाही. हे सुंदर मनाचे शुद्ध अंतकरणाचे धन्य असून इमानदार व्यक्तीचे मानले जातात. जीवनात भरपूर प्रगती करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *