Skip to content

आज गणेश चतुर्थी या ५ राशींच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री गणेश. बोलाल ते मिळेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भक्तगण मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. मित्रांनो या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. हा सण सर्वात सुंदर सण मानला जातो. शुद्ध अंतकरणाने श्रद्धा भक्तीपूर्वक गजाननाची उपासना केल्याने भक्ती भावाने गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

मित्रांनो भगवान श्री गणेश हे रिद्धी सिद्धीचे दाता मानले जातात. ते सुख समृद्धी आनंद आणि वैभववाचे दाता देखील मानले जातात. श्री गणेशचे प्रथम पूजनी देव आहेत. कोणतेही शुभ कार्यकर्त्यांना भगवान श्री गणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. ते प्रथम पूजनी मानले जातात कोणतेही काम दरी करायचे असेल तरी विघ्नहर्ता श्री गजाननाची गणपती बाप्पाची पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. 

भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी म्हटले जाते. या शुभमुहूर्तावर आणि शुभ संयोगावर श्री गणेश स्थापना केली जाते. मान्यता आहे की गणेश चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक गणेश चतुर्थी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा अर्चना करणे शुभ मानले जाते. 

भगवान गजर गजाननाची पूजा केल्याने बुद्धी सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्त होते. गणेश चतुर्थीचा उत्सव हा संपूर्ण दहा दिवसापर्यंत चालतो. आणि दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच विसर्जन केले जाते. मित्रांनो हे दहा दिवस अतिशय आनंदाचे आणि सुखाचे मानले जातात. बाल तरुणासह सर्वांसाठी भगवान श्री गणेश शेठ आकर्षण आहे. त्यामुळे हे दहा दिवस अतिशय आनंदमय पद्धतीने साजरे केले जातात. 

अतिशय उत्साहाने आणि आनंदाने भगवान गणेशाची भक्ती आराधना केली जाते. मित्रांनो यावेळी गणेश चतुर्थीला ग्रह नक्षत्रांचा अतिशय दुर्मिळ संयोग बनत आहे. त्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांची राशी परिवर्तने आणि गृह युत्या होणार आहेत. 

त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ या पाच राशींच्या जीवनात अतिशय सकारात्मक ठरणार आहे. गणेश चतुर्थीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य. आता यांच्या जीवनामध्ये यांना कशाचीही कमतरता भासणार नाही. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. 

मित्रांनो पंचागानुसार यावर्षी ३१ ऑगस्ट बुधवार रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून चतुर्थीची सुरुवात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ०३:३० मिनिटापासून होणार आहे. आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०३:२२ मिनिटानंतर होणार आहे. भगवान श्री गणेशाच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी ११:२४ मिनिटापासून दुपारी ०१:२४ मिनिटापर्यंत राहणार आहे. 

भगवान श्री गणेशाच्या कृपेने या पाच राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाख प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार असून गजाननच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. श्री गणेश चतुर्थी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य यामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये मोठी संधी चालून आपल्याकडे येऊ शकते. 

त्यामुळे उद्योग व्यापारामध्ये भरघोस प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करिअरच्या दृष्टीने आणि नोकरी करणाऱ्यांसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आपण केलेल्या कामाची प्रशंसा होणार आहे. उद्योग व्यवसायामध्ये वाढ होईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. 

करिअरमध्ये आपण केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पारिवारिक सुखामध्ये वाढ होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर श्री गजाननाचा आशीर्वाद बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहे. जीवनामध्ये वारंवार येणारी संकट दूर होतील. या काळात बनत असलेली ग्रह दिशा देखील आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. 

वैवाहिक जीवन सुरळीत चालणार आहे. श्री गणेशाच्या कृपेने नव्या व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात गोडवा दिसून येईल. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत बनणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुख-समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. 

आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. मानसिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येतील. 

सिंह राशि- गणपती बाप्पाचे आगमन आपल्या जीवनामध्ये होणार आहे. गजाननाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे जीवनामध्ये आनंदाने प्रसन्नतेची बहार येणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. 

आपण केलेल्या कामांचे कौतुक होणार आहेत. बढतीचे योग नोकरीमध्ये येणार आहेत. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची आपली इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने देखील काळ आनंदाचा ठरणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने पती-पत्नी मधील गोडवा कायम राहील. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. 

तूळ राशी- तूळ राशीवर गणेश चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभावाणे गजाननाचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. पत्रकारिता मार्केटिंग किंवा व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. गजाननाच्या कृपेने जीवनात वारंवार येणारी संकटे आता दूर होणार आहेत. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गणेशाच्या आगमनाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. 

व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. नोकरी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नवीन आर्थिक व्यवहार जमुन येणार आहेत. पैशांची आवक वाढणार आहे. 

भगवान श्री गणेशाच्या कृपेने धनलाभाचे योग जमून येतील. जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मागील अनेक दिवसापासून कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. गजाननाच्या कृपेने सुख समृद्धीने जीवन फुलून येणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. 

मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. गजाननाच्या आगमनाने आपल्या जीवनात आर्थिक समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. आता करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

अध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. मागील अनेक दिवसांपासून मनात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. जुन्या व्यापारामध्ये पुन्हा आर्थिक गुंतवणूक करून त्याचा विस्तार घडवून आणू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *