Skip to content

कसा असतो कन्या राशीचा स्वभाव? गुण, वैशिष्ट्य, जाणून घ्या. कन्या राशी विषयी बरेच काही.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी राशीचक्रातील सिंह राशीनंतर येणारी कन्या राशी म्हणजे सहावी राशी कन्या. कन्या राशि नक्की काय आहे कन्या राशीचे गुणवैशिष्ट्ये आणि स्वभाव याबद्दल आपल्याला जाणून घ्यायच आहे आजच्या या भागामध्ये. कन्या राशि कन्या राशि बद्दल एका शब्दात सांगायच झाल तर अतिशय चिकित्सक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच कन्या राशि.

कन्या ही राशी चक्रातील सहावी राशी मेष, वृषभ मिथुन, कर्क आणि सिंह यानंतर येणारी राशी असून राशीचे स्वामी ग्रह बुध आहे जो अत्यंत व्यवहारी हुशार आणि बुद्धिमान ग्रह मानला जातो. पृथ्वी तत्वाची राशी असून राशीचा वर्ण वैश्य म्हणजे व्यापारी व्यक्तिमत्व आणि स्त्री स्वभावाची कन्या राशि आहे. त्यामुळे ही राशी अत्यंत व्यवहारी स्वभावाची राशी मानली जाते.

बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणारे ही राशी असल्यामुळे त्यांची तर्कबुद्धी ही विलक्षण असते. कोणत्याही ठिकाणी तोल मोल करण्यात अत्यंत वापरतात अशी ही बुध ग्रहाची कन्या राशि आहे. एखाद्या विषयाबद्दल अत्यंत खोलात जाऊन माहिती घेणे त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळे त्यालाच आपण अति चिकित्सापणा म्हणतो यांच्यामध्ये आढळतो. म्हणूनच त्या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास टाकत नाही.

पूर्ण स्वतःच्या बुद्धीने अनुभवाने त्या विषयाची एखाद्या व्यक्तीची माहिती घेऊन खात्री करून मग त्याबरोबर व्यवहार करताना दिसतात. यांची ही मेमोरीकल मेमरी फार उत्तम असते. त्यामुळे अकाउंटिंग फायनान्स शेअर मार्केट अशा क्षेत्रामध्ये यांना चांगले यश सुद्धा मिळत. त्या घरामध्ये काटकसर करायला यांना आवडत असेल आणि गुंतवणुकीची सवय असली तरी यांना वर्तमानात फार जगायला आवडत.

त्यामुळे काही वेळेला भविष्यातील नियोजनामध्ये मात्र कमी पडताना दिसतात. घराची आणि घरातील कामाची जबाबदारी घ्यायला यांना अगदी मनापासून आवडत.घरामध्ये आलेले पाहुणे मंडळी मित्रपरिवार नातेवाई यांची मनापासून काळजी करताना दिसतात. स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा या राशीच्या महिला फार मनस्वी आढळतात लोकांशी संबंध निर्माण करणे आणि ते व्यवस्थित संभाळण या राशीच्या मंडळींना अतिशय सुंदर रीतीने जमत.

नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणे यांच्यामध्ये त्यांचा चांगला गुणधर्म असतो आणि त्यामुळे त्यांचे घर अगदी व्यवस्थितपणे लावलेला दिसून येत. यांना प्रत्येक बाबतीमध्ये स्वच्छता ठेवायला फार मनापासून आवडते. अति चिकित्सक स्वभावामुळे द्विधा मनस्थितीची ही कन्या राशी असल्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या तरी विचारांमध्ये ही मंडळी फार गढून गेलेले दिसतात आणि बऱ्याचदा नकारात्मकतेचा अंमल यांच्यावर जरा लवकर पडताना दिसतो.

जास्त विचार करण्याची यांची सवय त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी स्वतः च्या विशेष करून ती मंडळी गोंधळात पडून चुकीचे निर्णय घेऊन स्वतःच मात्र नुकसान काही वेळेला बऱ्याच वेळेला ही मंडळी करून घेताना दिसतात. मात्र दुसऱ्यांना सल्ला देण्यात मात्र चूक करत नाहीत आणि त्यामुळे यांच्या सल्ल्यामुळे दुसऱ्यांना मात्र नेहमी फायदा लाभ होताना विविध क्षेत्रांची मनापासून आवडत.

सतत कोणत्या विषयाचा अभ्यास यांच नेहमी सुरू असतोच कागदपत्रांच्या पूर्त म्हणजे कागदपत्रांची लिखापटी जी असते व्यवस्थापन जे असत त्यामध्ये ही मंडळी फार काटेकोर असतात आणि त्यामुळेच कार्यालयीन कामामध्ये, ऑफिस वर्कमध्ये यांचे प्रभाव हा ऑफिसच्या ठिकाणी अतिशय उत्तम पडताना दिसतो‌. मधील कागदपत्रांमधील, व्यक्तींमधील चुका शोधण्यामध्ये अतिशय पटाईत असतात. यांच्या नजरेतून चुका फार कमी वेळा सुटतात.

बुध ग्रहाचे राशी असल्यामुळे व्यापारामध्ये यांची बुद्धी उत्तम चालते.तसेच एजंट म्हणून त्याला आपण मध्यस्थ म्हणतो अशा मध्यस्थीची कामे यशस्वीपणे होताना दिसतात. कन्या राशीची मंडळी एलआयसी,म्युचल फंड, शेअर मार्केट अशा निरनिराळ्या बचतीच्या ज्या स्किम असतात. फायनान्स अशा विषयांमध्ये एजंट म्हणून किंवा सल्लागार म्हणून काम करण यांना लाभदायक राहत. करिअरचा हा अतिशय सुंदर पर्याय यांच्यासाठी खुला असतो.

अतिश चिकित्साकपणा असल्यामुळे बऱ्याचदा यांच्यामध्ये मानसिक अस्वास्थ्य सुद्धा बनत असत.जस की एखाद्या शारीरिक व्याधी, आजाराविषयी, संकटाविषयी यांना जर माहिती मिळाली यांना तीच आजाराची लक्षणे आपल्यामध्ये आलेत की काय अस वाटायला लागत आणि मग उगाचच घाबरून जाताना सुद्धा हीच कन्या राशि दिसते. अर्थात असं सर्वच कन्या राशींच्या बाबतीमध्ये होत नाही तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह अशुभ अवस्थेत असतो त्यांना जास्त त्रास होतो.

आशा राशीच्या बाबतीत हा आता आपण जो अनुभव घेतला त्याला सायकोसोमेटिक आजार म्हणतो अशा आजारांची अवश्य यांच्यामध्ये लागत असते. अस बुध बिघडलेला असला तरी काही कन्या राशीचे मंडळींमध्ये लोकांशी संवाद साधण्यांमध्ये सुद्धा अडचणी येतात किंवा अशा कन्या राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा वाद करताना दिसतात किंवा उद्धटपणे बोलून समोरच्याचा अपमान सुद्धा करतात आणि नंतर कुटुंबात समाजामध्ये एकटा पडतात.

कन्या राशीच्या जातकांना या विविध प्रकारच्या भाषा शिकण्यामध्ये त्याच्यामध्ये करिअर करायला सुद्धा खूप सुंदर अस लाभ असतो. यांच्या अति चिकित्सकपणा काही वेळेला यांच्या स्वभावामध्ये संशयपणा सुद्धा वाढवताना दिसतो. संबंधात व्यवहारांमध्ये बिघाड निर्माण होण्याचा सर्वात मोठा धोका याच कन्या राशीच्या बिघडलेल्या बुधामुळे निर्माण होतो. यांच्या कार्यक्षेत्राचा विचार केला तर अकाउंटिंग, बँकिंग, इन्शुरन्स, टीचर शिकवणे यामध्ये यांना चांगले यश मिळत. तसेच ही मंडळी चांगली लेखक सुद्धा असतात.

ज्योतिष सारख्या विषयात सुद्धा करिअर करू शकतात. ज्या विषयांमध्ये संशोधन आहे,रिसर्च आहे अस कार्यक्षेत्र म्हणजे ते कुठल्याही विभागातला असूदेत त्यांच्यासाठी नेहमीच उत्तम राहते. आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत पोटाचे आजार,आतड्यांचे आजार,पचनाच्या तक्रारी, निद्रानाश, पित्त वातविकार, अर्धशिशी अशा आरोग्याच्या तक्रारी मात्र यांना सांभाळावे लागतात.

विशेष करून लो ब्लड प्रेशर आणि मानसिक आजार सुद्धा होण्याचे प्रमाण या राशी मध्ये असत. महा विष्णूंची आणि गणेशाची उपासना वाढवणे यांच्यासाठी उत्तम राहतात. तसेच मेडिटेशन आणि योगा यांच्या मनावर आणि शरीर स्वास्थ्यावर खूप चांगला परिणाम निर्माण करून देऊ शकतात. अशी बहारदार असलेली कन्या या भागामध्ये आपण माहिती घेतली.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *