नमस्कार मित्रांनो.
मंडळी सिंह राशी ही राशी चक्रातील ५ वी राशी आहे. नक्की काय आहे सिंह या राशीबद्दलचा गुणवैशिष्ट्य आणि स्वभाव याबद्दल आपण या पाचव्या म्हणजे सिंह राशि बद्दल जाणून घेणार आहोत आजच्या या लेखामध्ये. सिंह राशि बद्दल एका शब्दात सांगायच झाल तर नाका समोर चालणारी ही माणस यांची व्यक्तिमत्व आहे. सिंह ही राशीचक्रातील पाचवी राशी असून राशीचा स्वामी ग्रह रवी आहे.
जो सर्वसृष्टीचा पालन आणि सांभाळ करणारा ग्रह आहे. अग्नितत्त्वाची राशी असून राशीचे वर्णन क्षत्रिय म्हणजेच लढवय्या व्यक्तिमत्व व पुरुष स्वभावाचे ही सिंह राशी आहे. मेष, वृषभ, मिथुन,कर्क आणि त्यानंतर इथे ती सिंह त्यामुळे एखाद्या गोष्टीची कायम याची जबाबदारी स्वतःहून घेण्याची प्रवृत्ती तर असे सर्वांच्या आनंदाचा यशाचा विचार सर्वप्रथम करणारी ही सिंह राशी आहे.
या राशीची मंडळी आपल्या संपर्कातील,आपल्या मित्र परिवारातील,आपल्या कुटुंबातील लोकांच्या प्रति अतिशय उदार आणि प्रेमळ अंतकरणाचे असतात. कोणत्याही अडीअडचणी मध्ये सदैव मदत करण्यास या पुढाकार घेणाऱ्या असतात. मात्र यांच्या या स्वभावाचा गैरफायदा कोणी करून घेत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांच्यासारखा क्रोध आणि राग कोणत्याही माणसांना येत नाही.
मंडळी रवी ग्रहाची ही राशी असल्यामुळे खोट्या गोष्टींबद्दल त्यांना प्रचंड तितकारा असतो आणि म्हणूनच कोणत्याही खोट्या ना ही मंडळी कधीच पाठीशी घालताना दिसत नाहीत. उलट अशा खोट्या वागणाऱ्या मंडळींना आपल्यापासून लांबच ठेवतात आणि गरज पडली तर शासन सुद्धा करतात. ही मंडळी आपल्या कामाच्या आणि नात्याच्या प्रति अत्यंत उदारशील असतातच परंतु अत्यंत प्रामाणिकपणे या नात्याला आणि कामाला सांभाळणारी सुद्धा ही मंडळी असतात.
यांच्याशी जो कोणी प्रामाणिकपणे मैत्री करतो त्यांच्याशी ही मंडळी नेहमी त्यांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये अवश्य आपल्या स्वतःच्या परिस्थितीकडे न पाहता सुद्धा ते तिकडे धावून जातात. सिंह राशीच्या मंडळींसाठी नातेसंबंध याला त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच असत. रवी ग्रहाची राशी आणि क्षत्रिय वर्ण असल्यामुळे नेहमीच कोणत्याही चांगल्या आणि समाज हिताच्या कार्याला पुढे नेण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतात.
त्यासाठी अगदी जीवाच रान करतात. अगदी स्वतःच्या पदारचा पैसा वेळ सुद्धा खर्च करायला मागे पुढे पहा नाहीत अशी ही सिंह राशी आहे. नेतृत्व हे यांच्या अंगी निसर्गाताच असते. त्यामुळे समाजाला नवीन दिशा देण्याच कार्य ही मंडळी स्वतःच्या कार्याने दाखवून देतात आणि एक चांगला आदर्श लोकांच्या समोर प्रस्थापित करतात.
स्वतःच्या वागण्यातून, बोलण्यातून, कामातून, लोकातून एक चांगला नेता निर्माण करण्याची संधी सिंह राशीची लोक कधीही सोडत नाहीत. ही मंडळी नेहमी वचनबद्ध असतात. एखाद्याला दिलेले वचन मोडत नाहीत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला शब्द प्राण जाये पर वचन न जाये याप्रमाणे पाळताना दिसतात. त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना असल्यामुळे कोणत्याही कामात शक्यतो स्वतःच्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर निर्णय घेऊन मोकळे होतात.
स्थिर स्वभावाची राशी असल्यामुळे कोणताही कार्य सुरू करण्यापूर्वी त्या कामाचा,त्या कार्याचा, त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून नियोजन करून मगच त्या कामाची आखणी करून सुरुवात करतात. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या यशस्वी होताना दिसतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिरता व संपन्नता प्राप्त करण्यासाठी उच्च अधिकार पदावर काम करायला या सिंह राशीच्या मंडळींना मनापासून आवडत.
त्यासाठी उच्च शिक्षण घेण्याकडे त्यांचा नेहमीच केला असतो. त्यामध्ये या व्यक्ती बऱ्यापैकी यशस्वी होतात. मात्र यांची काम करण्याची पद्धत ही थोडी राजेशाही पद्धतीची असते. म्हणजे स्वतःच्या विचाराने आणि गतीने आपल्या वेळेने ही मंडळी काम करतात. यांना आपल्या कामांमध्ये इतरांनी लुडबुड केलेली बिलकुल आवडत नाही. सल्ला दिला तर त्यावर मात्र अवश्य लक्ष देतात. प्रत्येक राशी मध्ये चांगले आणि वाईट हे गुणधर्म असतातच.
सिंह राशीच्या बाबतीत सांगायच झाल जर यांच्या पत्रिकेमध्ये रवी ग्रह यांच्या राशीचा स्वामी आहे हा जर अशुभ अवस्थेत असेल तर या राशींच्या जातकांना चारचौघांमध्ये पोकळ ढोंगीपणा, दिखाव पणा, अहमपणा, करायचे हाऊस असते. सिंह राशीची नकारात्मक बाजू त्यामुळे कधी कधी कर्ज काढून मोठेपणा दाखवण्यासाठी सुद्धा खर्च करतात आणि कर्जबाजारीपणा वाढवतात.
काही वेळेला ही राशी अधिकार मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतात हापापलेले असतात. मात्र हे सर्व अनुभव यांच्या कुंडली मध्ये रवी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तेव्हा राशीमध्ये बघायला मिळते. मात्र हे सर्व जरी असले ना तरी क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखी चपळ राशी दुसरी कोणतीही नाही. अत्यंत मनमोकळी, उदार आणि दिलदार स्वभावाची ही सिंह राशी आहे.
सिंह राशीच्या करिअरच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाल्यास उच्च सरकारी अधिकारी म्हणून ही मंडळी काम करतात. तर इंजीनियरिंग, शेती, परिवहन, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये एखादा प्रशिक्षक किंवा एखाद्या क्रीडा विषयांमध्ये पारंगत असतात. बांधकाम क्षेत्र यांच्यासाठी जास्त अनुकूल राहत. यांचा पिंड रवीच्या अंमलाखाली येत असल्यामुळे संरक्षण खात, मिलेट्री, पोलीस अधिकारी अशा सरकारी क्षेत्रात संरक्षण विभागामध्ये सुद्धा यांना चांगल यश करिअरमध्ये मिळवता येत.
तसेच गुड विषयामध्ये सुद्धा यांना चांगला रस असल्यामुळे वास्तु, ज्योतिष या विषयात सुद्धा सिंह राशीची मंडळी करिअर करताना दिसतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये यांनी मनात आणल तर चांगल बसतान बसवतात. वकिली डावपे यांना व्यवस्थित समजणारी ही सिंह राशी आहे. म्हणूनच बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी नियोजन दार म्हणून ही मंडळी काम करताना दिसतात. सिंह राशीसाठी आरोग्याचा विचार केला असता हृदय विकार, पोट दुखी, पाठीचे दुखणे, तसेच डोळ्यांचे आजार दृष्टी दोष मात्र फार सांभाळावे लागतात.
त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर, पित्त यांच्या आजारांपासून सुद्धा नेहमीच सावधान राहाव लागत. आधीच अग्नी तत्वाची राशी असल्यामुळे यांनी उष्णता वाढवणारे, पित्त वाढवणारे पदार्थ सेवन करण यांच्यासाठी कधीही उत्तम राहत. आणि या राशीसाठी सर्वात सुंदर उपासना ती म्हणजे रवी महाराजांचा मंत्र नेहमी पटनामध्ये ठेवा. सूर्यनमस्कार यांसारखे विषय नेहमी हाताळल्याले उत्तम राहत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.