Skip to content

कामाख्या देवीचे मंदिर ४ दिवस असते बंद? जाणून घ्या, यामागील रहस्य.

नमस्कार मित्रांनो.

भारतातील रहस्यमय मंदिरामध्ये ज्याचा पहिला क्रमांक लागतो. ते मंदिर म्हणजे आसामच्या गुहाटीमध्ये असणारे कामाख्या देवी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये होणारा रहस्यमय उत्सव अंबुबाची उत्सव तुम्हाला माहित आहे का कामाख्या देवी मंदिरामध्ये योनीची पूजा होते आणि प्रसाद म्हणून लाल कापड दिले जातात. या आणि अशा अनेक कथा कामाख्या देवी मंदिराशी संबंधित आहेत.

पण नक्की या मागचे रहस्य काय मला जाणून घेऊया. मित्रांनो कामाख्या देवी मंदिरा मधला रहस्यमय प्रसिद्ध अंबुभाजी उत्सव नुकताच २२ जून ते २६ जून दरम्यान पार पडला. पण हा उत्सव असतो तरी काय आसाममधला गुहाटीमध्ये असलेल मंदिर ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे. कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची मोठी गर्दी असते.

कामाख्या मंदिर हे सर्व शक्तीपीठाचे मानल जात. या मंदिरा संबंधित अनेक रहस्य आहेत. माता सतीने आपला देह सोडला तेव्हा भगवान विष्णूंनी माता सतीश ही भगवान शिवाची असक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे ५१ भाग केले हे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले. तिथे शक्ती पीठ तयार झाले आणि त्यातच असा मधल्या गुवाहाटीमध्ये जिथे कामाख्या देवी मंदिर आहे.

तिथे मातीचा योनी भाग पडल्याच सांगितल जात आणि म्हणून हे शक्तिपीठ महापीठ आहे. धार्मिक मान्यतेनुसार देवीचा योनी भाग इथे असल्यामुळे देवी रजस्वला होते.कामाख्य शक्ती पीठ चमत्कारिक आणि रोचक भरलेला आहे. या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. इथे देवीच्या योनी भागाची पूजा होते. त्याच मंदिरात एक कुड सुद्धा आहे. ते नेहमी फुलांनी झाकून ठेवलेला आहे.

कामाख्या देवी मंदिर तीन भागात बनवला आहे. पहिला भाग सर्वात मोठा आहे. आणि प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात मातीचे दर्शन आहे. ते दगडातून सतत पाणी येत असत. अस मानल जाते की, वर्षातून एकदा माता रजस्वल होते आणि तेव्हा मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येत. तीन दिवसानंतर पुन्हा धुमधडाक्यात पुन्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात.

यात उत्सवाला अंबुभाजी उत्सव म्हणतात. तो आता २२ जूनच्या दरम्यान पार पडला. या मंदिराच आणखीन एक गोष्ट म्हणजे खास प्रकारचा प्रसाद मिळतो. प्रसाद म्हणून भक्तांना उत्सवा दरम्यान ओले कापड दिले जाते. याच कापडाला अंबुभाची कापड म्हणतात. असे म्हणतात की जेव्हा देवीला मासिक धर्म येतो.

तेव्हा तिच्या भोवती पांढरे वस्त्र पसरवले जाते आणि तीन दिवसांनी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा हे कापड लाल रंगाने भिजलेले असते. नंतर हे कापड प्रसाद म्हणून भाविकांना वाटले जाते. वर्षातून एकदाच येणाऱ्या अंबुवाची उत्सवालाच सर्व तांत्रिक मंत्री यांच्यासाठी हा उत्सव एक वरदान मानला जातो.

अंबुवाची पर्व भगवती सतीचे रजस्वल पर्व असते. पौराणिक मान्यतेनुसार ते पर्व सोळा वर्षातून एकदा यायच द्वापार युगात बारा वर्षातून एकदाच यायच. त्रेता योगात सात वर्षातून एकदा तर कलियुगात प्रत्येक वर्षात येत. तंत्र साधनेसाठी कामाख्या देवी मंदिर आणि हा अंबुवाची उत्सव अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *