Skip to content

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा १ स्वस्तिकचा हा शक्तिशाली उपाय. लक्ष्मी माता प्रसन्न होईल, सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होतील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो स्वस्तिक हे शुभ संकेत देणारे असते. शुभ घटनांना आमंत्रण देणारे असते. अशुभता स्वस्तिक पासून दूर जाते. आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करायचे असेल तर स्वस्तिक खूप महत्त्वाचे असते‌. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी माता भ्रमण करते घरोघरी येते. आणि जर लक्ष्मीला ज्या व्यक्तीने प्रसन्न केले त्याच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. 

लक्ष्मीची कृपा होते. तर मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा हा एक शक्तिशाली उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात संध्याकाळी करू शकतात. कोणत्याही एका वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात. तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये संध्याकाळी किंवा सकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक पाठ ठेवायचा आहे.

पाठ असेल तर पाठ ठेवा किंवा देवघरात जागा असेल तर देवघरातच तुम्हाला लाल कुंकूने एक स्वस्तिक काढायचे आहे. छोटेसे स्वस्तिक तुम्ही काढायचे आहे. कुंकूला थोड   पाणी टाकून ओल करायचे आहे. एक मिश्रण तयार करायचे आणि आपल्या बोटाच्या साह्याने तुम्ही ते स्वस्तिक पाटावर किंवा देवघरात काढायचा आहे. त्या स्वस्तिकचे तुम्ही हळदी कुंकू अक्षद टाकून पूजन करायचे आहे.

 हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ म्हणजे अक्षद घेतल्यानंतर तुम्ही एक एक अक्षद म्हणजेच तांदूळ त्या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. अस तुम्हाला १०१ तांदुळाचे दाणे त्या स्वस्तिक वर ठेवायचे आहेत. आणि एक एक वेळेस तुम्ही तांदूळ ठेवताना तुम्हाला एक एक वेळेस लक्ष्मी मातेचा एक शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. 

हा‌ मंत्र काही असा आहे. ओम ह्रिम श्री महालक्ष्मी नमः श्री ह्रीम महालक्ष्मी नमः. मित्रांनो स्वस्तिक काढल्यानंतर आपल्या हातामध्ये एक तांदुळाचा दाणा घ्यायचा आणि मंत्र बोलायचा ओम हेम श्री महालक्ष्मी नमः आणि तांदूळ स्वस्तिकावर ठेवायचा. पुन्हा एक तांदुळाचा दाणा उचलायचा पुन्हा मंत्र बोलायचा पुन्हा ते तांदूळ स्वस्तिकवर  ठेवायच.

अस करत करत १०१ वेळेस तुम्हाला १०१ तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. आणि १०१ वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हे सगळ झाल्यानंतर तुम्ही सगळ मंत्र जप झाल्यानंतर १०१ दाणे ठेवल्यानंतर हात जोडून लक्ष्मी मातेला बरकतीसाठी सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर ते जे पण १०१ तांदुळाचे दाणे तुम्ही टाकले होते.

ते तुम्हाला एका सफेद कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधायचे आहेत. ते बांधल्यानंतर तुम्हाला ते तांदुळाचे दाणे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा दुकानाच्या गल्ल्यांमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा कपाटामध्ये जिथे पैसा दाग दागिने कागदपत्र तुम्ही ठेवता तिथे ठेवायचे आहेत. हा लक्ष्मीचा आशीर्वाद लक्ष्मीची कृपा म्हणून तुम्हाला ठेवायचा आहे. 

आणि ते स्वस्तिक त्या दिवसभर रात्रभर तसंच राहू द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल देवांना स्नान घालाल तेव्हा ते स्वस्तिक तुम्ही पुसून टाकू शकतात. अशा रीतीने हा शक्तिशाली उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *