Skip to content

गणपती समोर ठेवा ही एक वस्तू वर्षभर घरात कसलीच कमी राहणार नाही.

  • by

नमस्कार मित्रांनो.

तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो गणपती समोर ठेवा ही एक वस्तू वर्षभर घरात कसलीच कमी राहणार नाही. मित्रांनो अनंत चतुर्दशी पर्यंत दहा-अकरा दिवस गणपतीचे हे सण असतात. गणपती सगळ्यांच्या घरी मंडळांमध्ये विराजमान होत असतात.

 तुमच्या घरी देखील गणपती आले असतील किंवा आले नसतील तुम्ही गणपती बसवत असाल किंवा बसवत नसाल तरी तुम्ही हा उपाय करू शकतात. जर तुम्ही गणपती बसवला असेल तर ही वस्तू तुम्हाला त्या गणपतीच्या मूर्ती समोर ठेवायची आहे. 

आणि जर तुम्ही गणपतीची मूर्ती बसवली नसेल तर आपल्या देवघरात छोटीशी तांब्याची पितळाची किंवा चांदीची गणपतीची मूर्ती तर असतेच. मग आपण त्या गणपतीच्या मूर्ती समोर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. 

गणपती बाप्पा जाता जाता आपल्याला भरभराट देतील भरभरून देतील. आणि मग सर्व काही आपल्या घरात असेल सुख समृद्धी असेल आनंद असेल सुख असेल शांतता असेल आरोग्य असेल. आता ही वस्तू कोणती? तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी एक रुपयाच्या सिक्का घ्यायचा आहे. 

एक रुपयाच्या शिक्का घेतल्यानंतर तुम्हाला एक पूजेची सुपारी घ्यायची आहे. पूजेची सुपारी ही कोरी पाहिजे म्हणजे ती कुठेही कधीही न पूजलेली पाहिजे  अशी सुपारी पूजेची घ्यायची आहे आणि एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे. आता गणपती बसलेले आहेत कोणत्याही दिवशी अनंत चतुर्दशी येईपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्हाला एक रुपयाचा शिक्का गणपती समोर ठेवायचा आहे.

त्यावर ती सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर त्या सुपारीचे अंत्य एक रुपयाच्या सिक्क्याचे हळदीकुंकू अक्षत फुल वाहून पूजा करायची आहे. अगरबत्ती दिवा लावून ओवाळणी करायची आहे. आणि हात जोडून सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी कोणत्याही गोष्टीची कमी नको अशा सगळ्यांसाठी प्रार्थना करायची आहे. 

अनंत चतुर्दशी पर्यंत तो एक रुपयाचा शिक्कांती सुपारी तिथेच गणपती समोर एक तर देवघरात किंवा गणपतीची मूर्ती विराजमान असेल तर त्या मूर्ती समोर तुम्हाला ते राहू द्यायचे आहे. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर तुम्ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी तो एक रुपयाच्या सिक्कांती सुपारी तिथून उचलायची आहे. 

एखादी सफेद रंगाच्या कापडमध्ये तो एक रुपयाच्या शिक्का आणि ती सुपारी बांधून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. 

दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवायची आहे. आता प्रश्न पडतो की जर तुमच्या गणपती पाच दिवसाचा असेल सात दिवसाच्या असेल तर मग तरी तुम्ही ती सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का तुमच्या देवघरात ठेवायचा आहे. 

गणपती तुमचे विसर्जन झाले तरी ती सुपारी आणि पैसा तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकतात. आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतरच तुम्हाला ते कापडामध्ये बांधून तिजोरीत ठेवायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *