Skip to content

गरिबीचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे दैवत मानले जातात. ते कर्मफलाचे दाता मानले जातात. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रधान करत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये भगवान शनि देवाला विशेष स्थान प्राप्त आहे. पण बरेच लोक शनिदेवाला फार घाबरतात. मित्रांनो शनिदेव हे वाईट देवता नाहीत. ते फक्त कर्मफलाचे दाता आहेत. 

जीवनामध्ये ज्यांची कर्म चांगले असतात त्या लोकांना शनीला घाबरण्याचे कारण नसते. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनि चा सकारात्मक प्रभाव असतो अशा लोकांच्या जीवनात राजयोग येण्यास वेळ लागत नाही. पण कधी कधी जेव्हा शनीची अशुभदृष्टी व्यक्तीच्या जीवनावर पडते अशावेळी त्या व्यक्तीला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागतो. 

अनेक नकारात्मक घडामोडी अशा व्यक्तीच्या जीवनात घडून येत असतात. अनेक अडचणी निर्माण होत असतात. शनि जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतात. पण याही काळात व्यक्तीने आपली कर्म जर चांगली ठेवली तर त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. 

कारण ज्यांची कर्म चांगली असतात त्यांच्यावर शनीची शुभदृष्टि शनीची कृपा नेहमी बरसत असते. मित्रांनो शनि हे एकमात्र असे ग्रह आहेत किंवा देवता आहेत जे राजाला रंग बनवू शकतात किंवा रंकाला राजा बनवू शकतात. म्हणून ज्यांना शनीची कृपा हवी असेल त्यांनी जीवनात आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

शनीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनाला नवी कलाटणी देण्यासाठी पुरेसा असतो. आजच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढ कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक २३ जुलै रोज शनिवार लागत आहे. 

शनिवार हा भगवान शनि देवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशींच्या जीवनात शाळेची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. आता यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनातील दुःख आणि साडेसातीचा काळ आता समाप्त होणार आहे. 

जीवनात अनेक घडामोडी सुंदर घडामोडी घडून येण्याची शक्यता आहेत. आपल्या जीवनात अतिशय सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय सुंदर परिवर्तन घडवून आणण्यास सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. 

आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ न घालवता पाहूया. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून मेष.

मेष राशी- राशीवर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात जो काही नकारात्मक काय चालू आहे किंवा आपल्या जीवनात ज्या काही नकारात्मक घडामोडी घडत आहेत त्या आता समाप्त होणार आहेत. शनिचा आशीर्वाद आपल्या जीवनावर सदैव बरसत राहणार आहे. 

आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. आता उद्योग व्यापारात देखील निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. व्यवसायातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या सुद्धा समाप्त होणार आहेत. कोर्ट कचेऱ्यात चालू असणारी कामे आता मार्गी लागणार आहेत. न्यायालयीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक शनिवारी शनि देवाला काळे तीळ किंवा काळे उडीद अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर शनीची शुभ दृष्टी असणार आहे. जीवनातील नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होईल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. 

उद्योग व्यवसाय भरभराटीस येण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखात आलेली कमतरता आता भरून निघणार आहे‌. जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. आनंदाचे वातावरण आपल्या जीवनात निर्माण होणार आहे.

हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे आणि फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात केलेले सर्व प्रयत्न सफल होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

कर्क राशि- कर्क राशि वर शनी महाराजांची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखाबद्दल हा काळ अनुकूल ठरणार आहे. बरोबर व्यवसायात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. एखाद्या मोठ्या बिमारीतून सुद्धा मुक्त होऊ शकता. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यवसायानिमित्त अनेक प्रवास घडण्याची शक्यता आहे.

या काळात केलेले प्रवास यशदायक ठरणार आहेत. नवीन कामाची केलेली सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. नवीन व्यवसाय भरभराटीस येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्न यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

आपल्या योजना सफल ठरतील. आपल्या प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन रुईची फुलं अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून आपल्या आत्मविश्वासात आलेली कमतरता आता भरून निघणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

मागील काळात घडलेल्या वाईट घटना आता समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. प्रेम जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. आता जीवनात आपले प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे.

प्रेमी मुलांसाठी काळ अनुकूल ठरू शकतो. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनू शकते. या काळात उद्योग व्यापारात देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामात देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. जीवनातील नकारात्मक ग्रहदशा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आता आपला विजय होणार आहे. संसारिक जीवनात आनंदाची बाहेर येण्याचे संकेत आहेत. 

आता इथून पुढे भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे.त्यामुळे आपले प्रत्येक प्रयत्न सफल ठरतील. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचे आपले स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे. तेव्हा राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची जी इच्छा आपण बाळगली आहे ती पुढे चालून अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. 

राजकारणात मोठे यश आपल्या पदरी पडू शकते त्यामुळे येणारा काळ आपला काळ असणार आहे. या काळात करिअरच्या दृष्टीने देखील मोठी प्रगती घडून येणार आहे. प्रत्येक शनिवारी शनी महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते किंवा शनि चालीशेचा पाठ सुद्धा करू शकता.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर शनीची शुभदृष्टि पडण्याचे संकेत आहेत. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत.या काळात संसारिक जीवनामध्ये निर्माण झालेला ताण तणाव आता दूर होणार आहे. या काळात परिवारातील लोकांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. परिवारातील लोक आपली चांगली मदत करणार आहेत. 

मानसिक ताणतणाव सुद्धा दूर होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडून येणार आहेत. एकेकाळी अशक्य वाटणारी कामे या काळात शक्य करून दाखवणार आहात. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर शनीची शुभदृष्टि बरसण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. 

मनोकामनापूर्तीचे योग बनत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय शुभकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे.

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *