Skip to content

जीवनात शांती हवी असेल तर अशा ठिकाणी थांबू नये, वाचा सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

आचार्य चाणक्य एक महान नीतीकार होते त्यांनी आपल्या चाणक्य नीति या नीती ग्रंथात आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी जगण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आपण जर जीवनात चाणक्यांनी दिलेल्या मार्गावरून वाटचाल केली. तर आपण अनेक संकटांपासून दूर राहू शकतो. सर्वांनाच वाटते की आपली प्रगती व्हावी आपण सुखी संपन्न आणि समृद्ध व्हावे. आणि त्यासाठी सर्वांची धडपड चाललेली असते.

आपण कितीही मोठ्या सुंदर व सर्व सोयींनी युक्त अशा जागी जाऊन महिनाभर जरी राहिलो तरीही आपल्या स्वतःच्या घरी येऊन जे सुख समाधान व शांतता आपल्या मनाला मिळते.ती तर कोठेही मिळत नाही. आणि हे सुख समाधान व शांतता नभावे यासाठी प्रत्येकाची इच्छा असते की आपले छोटेसे का होईना परंतु टुमदार एक घर असावे.

परंतु कधीकधी काय होते की घर बांधताना किंवा विकत घेताना आपण काही अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपण खूप मोठे व आलिशान घर जरी बांधले तरी आपल्या मनाला शांतता व समाधान लाभत नाही. म्हणून घर बांधताना किंवा कोणतेही घर घेताना या गोष्टीची काळजी घ्यावी जर जीवनात शांतता व समाधान हवे असेल तर अशा ठिकाणी अजिबात निवास करू नये.

घर घेताना अशा ठिकाणी घ्यावे जेथे आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्थित सोय होईल. आपल्याला तेथे काहीतरी काम धंदा करून चार पैसे मिळवता येतील आणि आपले व आपल्या कुटुंबाचे भरण पोषण व्यवस्थित रित्या होईल. जिथे आपल्याला उत्पन्नाची साधने नाहीत कोणत्याही प्रकारे पैसा मिळण्याचे मार्ग नाहीत अशा ठिकाणी कधीही राहू नये. कारण यामुळे आपले जीवन अडचणींनी व संकटांनी भरून जाते आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविकास सहज चालेल अशा ठिकाणी राहणे कधीही चांगले.

तसेच घर अशाच ठिकाणी घ्यावे जेथे आसपासच्या लोकांच्या आपल्यावर नजर असतील. जेथे सामाजिक भावना व मूल्ये जपली जातात अशाच ठिकाणी घर घ्यावे. कारण जर इतरांची भीती वाटत असेल मनात इतरांविषयी आदर असेल लोक लज्जा वाटत असेल. तर आपल्या हातून कोणतेही वाईट व नको ते कृत्य होणार नाही आणि आपण सुरक्षित राहो. म्हणजेच सामाजिक प्रतिष्ठेला समाजात स्थान असावे तसेच अशाच ठिकाणी राहावे.

जेथे परोपकारी व त्यागी वृत्तीचे लोक राहतात. वाईट कार्य करणारे गुन्हेगार असतील अशा ठिकाणी कधीही राहू नये. कारण आपण ज्या व्यक्ती सोबत राहतो किंवा जे व्यक्ती आपल्या आसपास राहतात त्यांचे चांगले व वाईट सर्व गुण आपल्याला आपोआप येऊन मिळतात. त्याशिवाय जे व्यक्ती धार्मिक आहेत दानधर्म करतात पाप पुण्य भगवंत यांच्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा व्यक्ती सोबत जरूर राहावे.

कारण यामुळे आपण सुरक्षित राहतोच त्याशिवाय आपल्याला ही शांततेची अनुभूती येते. अशा व्यक्ती सोबत राहिल्यास आपले मन आनंदी उत्साही आणि शांत असते म्हणून अशा व्यक्तींमध्ये राहणेही खूप शुभ असते. तसेच जमीन खरेदी केल्यानंतर तेथे कोणतेही प्रकारचे काम सुरू असताना जमिनीतून अचानक साप बाहेर पडल्यास तो एखादी दुर्घटना किंवा अपघाताचा संकेत असू शकतो.

त्या ठिकाणी सुरू असलेले काम लगेचच थांबवावे. सर्वप्रथम तेथे सर्व शांती यज्ञ करून घ्यावा आणि मग पुढील कामाला सुरुवात करावी असे म्हटले जाते की त्या जमिनीवर सापाचा वावर असल्यास ते शुभ मानले जाते. कारण त्या ठिकाणी देवी लक्ष्मीची कृपा आहे. अशी जमीन पैसे आणि धनसंपत्ती यासाठी उत्तम असल्याचे मानले जाते. म्हणून घराचे बांधकाम करत असताना तेथून जर साप निघाला तर ते दुर्घटनेचे संकेत समजला जातो.

परंतु ज्या जमिनीवर सापांचा वावर असेल ती जागा खूप शुभ असते आणि अशा जागेवर घर बांधल्यास आपल्याला धनसंपत्ती आणि पैसा मिळत राहतो. एखाद्या घर बांधण्याचा विचार सुरू असताना काही जागांची पाहणी केल्यावर एखादी जमीन आपल्याला आवडली मात्र ती अधिक खडकाळ असेल तर ती जागा घर बांधण्यासाठी योग्य नसते. जमीन प्रमाणापेक्षा खडकाळ असणे चांगले मानले जात नाही.

अशा जमिनीवर बांधलेल्या घरात वारंवार किंवा नियमितपणे कोणते ना कोणते संकट येत राहते. घरातील व्यक्तींचे कष्ट आणि समस्या वाढू शकतात. त्यामुळे शक्यतो अधिक खडकाल जमिनीवर घर बांधू नये असे सांगितले जाते. एखाद्या जमिनीवर आपले बचत ओतून एकदम छान टुमदार घर बांधले तरी त्यानंतर आपल्या आयुष्यात या घरात कसे जाईल. वास्तूमध्ये वास्तव्यास गेल्यानंतर भविष्य कसे असेल.

या गोष्टी बहुतेक वेळा भूखंडाच्या आकारावर देखील अवलंबून असतात सामान्यपणे जमिनीचा किंवा जागेचा आकार आयताकार असावा अशी मान्यता आहे. मात्र भूखंड ओबडधोबड तिरकस किंवा त्रिकोणाचा असेल तर ते फायदेशीर ठरत नाही. घरातील सदस्यांना वारंवार अडचणी समस्या यांना सामोरे जावे लागते. काही केल्या समस्यांचा डोंगर संपत नाही केलेली मेहनत केलेले परिश्रम यश देत नाहीत. म्हणून शक्यतो आयताकार जागेवरच घर बांधावे.

वाकड्यातिकड्या त्रिकोणी षटकोनी तिरकस अशा जागेवर कधीही घर बांधू नये. उत्तम जमिनीत जमीन खरेदी केल्यानंतर घर बांधताना काही गोष्टींचे भान ठेवावे. घर बांधताना ते उत्तर पूर्व दिशेला खुले असावे. या दिशेला दारे खिडक्या किंवा मोकळा भाग असावा. उत्तर पूर्व दिशा हे देवतांचे स्थान मानले जाते. यामुळे ते स्थान मोकळेच असावे. त्या ठिकाणी बालकणी असावी रोपटे लावावी असा सल्ला दिला जातो.

त्याशिवाय घराची स्वच्छता नीटनेटकेपणा कायम ठेवावा. वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मध्यभागी कोणत्याही स्वरूपाचा खड्डा असू नये. घराचा मध्य हा खालीवर असू नये तो एकदम सपाट सारखा असावा. घराच्या मध्यभागी कोणतेही अवजड सामानही ठेवू नये. असे असल्यास घरातील प्रमुखांना सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तसेच आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते. प्रगती खुंटू शकते. घराचे प्रवेशद्वार हे अतिउंच नसावे किंवा एकदम छोटेही नसावे. मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलेच असेल की कोणत्या ठिकाणी घर बांधू नये आणि कोणत्या ठिकाणी आपण वास्तव्य करू नये आणि कोणत्या ठिकाणी करावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *