Skip to content

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी लावा या झाडाचा चीक, लगेचच फरक दिसेल….!

  • by

नमस्कार.

मित्रहो अनेक लोकांना निरनिराळे त्रास असतात, अनेकांच्या टाचा खुप दुखतात. तसेच टाचेला भेगा देखील पडतात. मित्रहो पावसाळ्यात तर अनेक शेतकरी चिखलात काम करतात, तसेच अनेक लोक रस्त्यावर चालत जातात. त्यामुळे सतत आपले पाय ओले होतात पायाचा पाण्याशी, चिखलाशी सतत संबंध येतो व त्यामुळे आपले पाय ओले राहून त्यांना भेगा पडतात. 

भात लावण्यासाठी अनेक लोक शेतात जातात, अशा व्यक्तींना तर चिखलात सतत काम करावे लागते व त्यांना या चिखल्यांचा खूप त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला छान उपाय सांगणार आहोत. मित्रहो हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला या उपायाची पूर्ण माहिती मिळेल. 

मित्रहो जेव्हा आपण चिखलातून येऊ किंवा, पावसातून रस्त्यावरून चालत येऊ तेव्हा सर्वप्रथम घरात आल्यावर आपण आपले पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे. याच दिवसात आपल्या पायांची काळजी घेणे गरजेचे असते. कोणताही उपाय करण्याआधी पाय स्वच्छ धुवून पायावरची डेड स्किन काढणे गरजेचे असते व त्यानंतरच आपण उपाय करावा. 

चिखल्या झाल्यावर खूप जास्त वेदना होतात, या वेदना कधी कधी असह्य होऊन जातात. त्यामुळे याच्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते. या चिखल्यामुळे व्यवस्थित चालता येत नाही आणि काम देखील करता येत नाही. हा त्रास कमी करण्यासाठी आपणाला एका आयुर्वेदिक झाडाचा खूप फायदा होणार आहे, हे झाड आहे वडाचे. 

वड नेहमीच अनेक आजारांवर गुणकारी ठरला आहे. याचे महत्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे याची पूजा देखील केली जाते. मित्रहो या वडाच्या झाडाचा जो कोंब असणार आहे तो तोडायचा आहे व तो तोडल्यानंतर त्यातून एक पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर पडणार आहे. हा चीक खूप गुणकारी असतो, हा चीक पायाला ज्या चिखल्या पडलेल्या आहेत त्यावर लावायचा आहे.

मित्रहो हा चीक रात्री झोपताना पायाला लावायचा आहे. रात्रभर हा चीक आपले काम चोखपणे पार पाडेल व सकाळी उठल्यावर तुम्ही पाहू शकता की तुमचे पाय अत्यंत मऊ झालेले असतील व ज्या त्रास देणाऱ्या चिखल्या आहेत त्या गळून पडलेल्या असतील. मित्रहो यावर आणखी एक उपाय म्हणजे घरामध्ये किंवा घराबाहेर आपण चूल पेटवतो.

त्यामध्ये जो कोळसा असतो तो थोडा काढून घ्यायचा आहे व त्यावर घरातील काही तांदळाचे दाणे टाकायचे आहेत. त्यातून थोड्यावेळाने काहीसा धूर निघेल. हा निघणारा धूर देखील आपल्या पायांसाठी खुप फायदेशीर ठरतो, त्यामुळे सर्व चिखल्या कमी होऊन पाय व्यवस्थित होतो. 

मित्रहो रोज संध्याकाळी हा उपाय तुम्ही केल्याने पायांना झालेल्या चिखल्या पूर्णपणे जातील व पाय ठीक होईल. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून अनेकांना या समस्येपासून मुक्ती मिळेल.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *