Skip to content

तुम्हाला पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल. जाणून घ्या, विष्णू पुराण काय सांगते.

  • by

नमस्कार मंडळी.

मंडळी मृत्यू हा आत्म्याचा प्रवासाचा एक टप्पा मानला जातो. कारण शेवट शरीराचा असतो आत्म्याचा नाही. अस म्हणतात की आत्म्याचा प्रवास हा एका शरीरापर्यंत नसतो. त्याला अनेक देहातून जावे लागते आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण असते. हे विष्णुपुराण गीता आणि इतर शास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही तर त्याला परत्व प्राप्त करणे म्हणजे मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे.

जेव्हा आत्मा परमात्म्याची एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो. आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी नसतो विविध शरीर प्राप्त करतो. परंतु एकच इच्छाच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात जावे लागते. पण प्रत्येकाला प्रश्न असतो व्यक्तीचा खरच पुनर्जन्म होतो का? पुढच्या जन्मी त्याला कोणता जन्म मिळेल हेही त्याला ठाऊक नसते. चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो जडभरताची एक कथा सांगितली जाते. तो एक महान संत राजा होता. तो धार्मिक होता आणि लोकांची काळजी ही घेत असे. पण एके दिवशी असे झाले की नदी तो अंघोळ करत असताना एका हरिनीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली. पण तिला नदी पार करता आली नाही. हरिण गर्भवती होती. आणि तिने पाण्यातच तिच्या बाळांना जन्म दिला. पण तिथेच त्या हरणीचा मृत्यू झाला.

ते मुल पाहून राजाला दया आली आणि त्यांनी त्या हरणीच्या बाळाला आपल्या महालात नेहले. जडभरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरू केले. हरीनही राजावर खूप प्रेम करू लागले आणि राजासमोर खेळू लागले. जे पाहून जड भरत राजाला आनंद व्हायचा. राजाचे हरणी बद्दलचे प्रेम आकर्षण वाढतच गेले आणि हळूहळू तो राजा म्हातारा होऊन मेला.

पण मृत्यू समय त्याच्या त्या हरणी बद्दलचा मोह संपला नाही. तो तिचाच विचार करत राहिला. त्याचा परिणाम असा झाला मी त्याला मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनित जावे लागले आणि तो स्वतः त्या हरणीच्या गर्भात आला. त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला. अशाप्रकारे या कथेत सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्या भावनेने पुढील जन्म मिळतो.

गीतेमध्ये असेही म्हटले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु हे फार कठीण आहे.कारण ज्या भावनेचे मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावर प्रभुत्व असते. तुम्ही हे पाहिले असेल घरात कोणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादे मूल जन्माला आले तर लोक म्हणतात घरातील तो सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परतला आहे.

वास्तविक हे की त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंब प्रति प्रेम असलेले आणि मोह दर्शवते. कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही. गरुड पुरानात कर्माचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाला पुढील जन्माचे कारण मानले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *