Skip to content

तुळशीची माळ घालण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहे का? मिळेल लाभच लाभ..!

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुळशीचे रोप आणि तुळशीची माळ या दोन्हींना हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरात तुळशीचे रोप असतेच आणि तुमची जर उपाशी नियमित पूजा केली जाते. शास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती मानली जाते.

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तुळशीची माळ घालण्याला ही आहे. यासोबतच त्यामुळे जप केल्यास ते खूप फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीची माळ घालण्याचे फायदे कोणते आहेत.

मित्रांनो जे लोक भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचे उपासक आहेत. ते त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नक्कीच घालतात. गळ्यात तुळशीची माळ घातल्याने मनाची शांती आणि अध्यात्मिक शुद्धता राहते आशि श्रद्धा आहे. याशिवाय ज्योतिषशास्त्रातही तुळशीच्या माळेचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहेत.

तुळशीची माळ घालण्याचे नियम आपण जाणून घेऊयात-
१) जरी तुळशी ही नेहमीच शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते .तरी ती घालण्याआधी ती गंगाजल आणि शुद्ध करून आपल्या गळ्यात घालावी. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने कुंडलीतील बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

२) तुळशीच्या माळ्यामुळे भगवान विष्णू लक्ष्मी देवी आणि कृष्णाचा सतत आपल्यावर आशीर्वाद राहतो. ३)जे तुळशीची माळ घालतात त्यांनी नेहमीच सात्विक भोजन करावे.
४) गळ्यात तुळशीची माळ घालणाऱ्यांनी ती कधीही काढू नये आणि जरी काढायची झाली तरी ती सल्ल्यानुसार आणि विधिवत काढावी.

तुळशीच्या माळेवर जप करण्याचे नियम आपण जाणून घेऊयात- १) गळ्यात घालणारी आणि जपाची दोन्हीही तुळशीच्या माळा या वेगवेगळ्या असतात. गळ्यात घालणारी आणि जपाची दोन्ही माळा वेगवेगळ्या ठेवाव्या. २) जप केल्यानंतर तुळशीची माळ एका कपड्यात गुंडाळून ठेवावी.

३) एकाच माळेने जप करावा आणि त्या माळेने दुसरा कोणीही जप करू नये. ४) तुळशीच्या माळ्यात कमीत कमी २७ आणि जास्तीत जास्त १०८ मनी असावेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *