Skip to content

दिवाळीत घरी आणा हे लकी प्लांट, तुमच्यासाठी ठरेल यशाची गुरुकिल्ली.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी यावेळी दिवाळीमध्ये घरी काही लकी प्लांट लावता येतील अशी काही लकी प्लांट आहेत की जी सहजपणे लावता येतात. आणि त्यांना कोणत्याही विशेष काळजीची आवश्यकता नसते. लकी प्लांट घरासाठी शुभ ठरतात. काही अशी झाडे आहेत जी घरातील वाईट आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यात मदत करतात.

वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत. जी घरातील वास्तुदोष दूर करतात. आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते. आर्थिक स्थिती सुधारते. आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते. चला तर मग जाणून घेऊयात कोणते लकी प्लांट आपण घरामध्ये लावले पाहिजेत.

१) तुळस वास्तु शास्त्रानुसार तुळशीची वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नशीब चमकवण्यासाठी ही सर्वात शक्तिशाली वनस्पती मानली जाते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. 

त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. तुळशीमुळे डास ही घरात येत नाहीत. तुळशीचे रोप बागेत किंवा बाल्कनीत किंवा खिडकीत लावता येते. त्याला सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे घरात एक तरी तुळशीचे रोप असावे. 

२) झेड प्लांट- लहान गोल पानांचा झेड प्लांटही लकी प्लांट मानला जातो. फॅन्च्यू नुसार झेड प्लांट हे नशिब आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हे लकी प्लांट ऑफिस किंवा घरामध्ये ठेवावे. 

हे फेन्च्यू शास्त्रानुसार झेड प्लांट हे नशीब बदलण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे म्हणून घरामध्ये किंवा कार्यालय मध्ये ठेवता येते. झेड प्लांट हे प्रगती आणि वाढीचे प्रतीक आहे. झेड प्लांट बाथरूम मध्ये कधीही ठेवू नये. यश आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी झेड वनस्पती खूप प्रभावी मानली जाते.

३) बांबू प्लांट- वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्हीमध्ये नशीब आणि उत्तम आरोग्य याचे प्रतीक मानले जाते. पाच भांड्यांची वनस्पती संपत्तीसाठी चांगली आहे. सौभाग्य साठी सहा देट आरोग्यासाठी साथ देट आणि उत्तम आरोग्यासाठी आणि संपत्तीसाठी २१ देट असलेला बांबू प्लांट उत्तम मानला जातो. बांबू वनस्पती हवा शुद्ध करण्याचे काम करत असते. ज्यामुळे सभोवतालचे प्रदूषण कमी होते. 

बांबूचे रोप घरातील पूर्व कोपऱ्यात ठेवावे. त्याला रोज पाण्याची गरज नाही. ४) चौथी मनी प्लांट- घरामध्ये संपत्ती आणि सौभाग्य आणण्यात मनी प्लांट महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच ही वनस्पती प्रत्येक घरात सहज दिसून येते. मनी प्लांट मुळे आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होते. 

मनी प्लांट नैसर्गिक हवा शुद्ध करणारी प्लांट म्हणूनही कार्य करते. कारण ती हवेतील विषारी कणांना फिट करते. त्याला थोडीशी देखभाल आवश्यक आहे. घरी मनी प्लांट लावल्याने. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे यश मिळते.

५) रबर प्लांट- रबर प्लांट घरासाठी खूप लकी मानला जातो. फेनशूइ मध्ये हे संपत्ती आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. अंड्या सारखे गोल पान संपत्तीत बसवतात. घरामध्ये रबर प्लांट लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. रबर प्लांट मुळे घरातील हवा सुधारते. कारण ते नैसर्गिक हवा शुद्ध करणारे म्हणून काम करते.

६) स्नेक प्लांट- घरासाठी शुभ मानला जाणारा भाग्यवान वनस्पती पैकी एक म्हणजे स्नेक प्लांट . ही भाग्यवान वनस्पती हवेतील विषारी एलर्जी शोषण पर्यावरण शुद्ध करण्याचे काम करते. ही वनस्पती वेगवेगळ्या परिस्थितीत चांगली वाढते. ही वनस्पती दिवस आणि रात्री शुद्ध ऑक्सिजन तयार करते. यामुळे मन हलके होते. सकारात्मक ऊर्जा वाढते. आरोग्य चांगले राहते. त्याला जास्त सूर्यप्रकाश लागतही नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *