Skip to content

दिवाळीत या गोष्टी केल्याने होईल लक्ष्मीची कृपा. होईल अफाट धनलाभ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हे झाडू संबंधित काही गोष्टींची विशेष काळजी घेणे खूप फायदेशीर मानलं जात. झाडूचा संबंध लक्ष्मीची आहे असं म्हणतात. अशा संबंधित या गोष्टी केल्याने तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो. जाणून घेऊया या सविस्तर गोष्टी.

यंदा २४ ऑक्टोंबर ला दिवाळी आहे. दीपोत्सवाचा हा उत्सव पूर्ण पाच दिवस चालतो. दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि विघ्नांचा नाश करणाऱ्या गणेशाची शुभ मुहूर्तावर पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते असे म्हणतात.

ज्योतिष शास्त्रात दिवाळीच्या पूजे संबंधित काही नियमही सांगण्यात आले आहेत. यामध्ये झाडू संबंधित गोष्टींचे खूप काळजी घेणे विशेष मानले जाते. झाडू चा संबंध लक्ष्मीची आहे असे मानले जाते. अशा परिस्थितीत झाडूच्या संबंधित या गोष्टी केल्याने तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो.

१) आर्थिक अडचणी होतील दूर. दिवाळीच्या दिवशी जुना झाडू काढून टाका आणि नवीन झाडू घेऊन या. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी झाडू दान करणे देखील शुभ मानले जाते. जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल तर त्यावर मात करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी तीन झाडू खरेदी करा. आणि मंदिरात ठेवा.

असे म्हणले जाते की, असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. असे म्हणतात की दिवाळीच्या दिवशी घर नव्या झाडूने संपूर्ण स्वच्छ करावे. या साफसफाई नंतर हा झाडू कुठेतरी लपवून ठेवावा. जिथे तो कोणालाही दिसणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो.

२) या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते म्हणून तो कधीही जोरात फेकू नये किंवा जोरात आपटून फेकू नये. झाडू चा अनादर होता कामा नये. झाडूचा अनादर करणे म्हणजे माता लक्ष्मीचा अनादर केल्यासारखे असते. वापरल्यानंतर झाडू कधीही उभा ठेवू नका. झाडूला नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. झाडू दरवाज्याच्या मागे लपवून ठेवणे चांगले मानले जाते.

३) झाडूला चुकूनही पाय लागल्यास काय करावे. वास्तुशास्त्रामध्ये झाडू बाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अनेक वेळा जाणून-बुजून किंवा नकळत झाडूवर पाय पडतो. परंतु अशा परिस्थितीत लागलीस झाडूच्या पाया पडा. 

झाडू वर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान आहे. यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या सोबतही असे कधी घडले असेल तर झाडूला स्पर्श करून नमस्कार करावा. आणि या चुकीसाठी लक्ष्मी मातेची माफी मागावी.

४) झाडूशी संबंधित काही नियम. घरात कधीही तुटलेला झाडू वापरू नका. जर झाडू तुटला किंवा खराब झालेला असेल तो त्वरित बदलावा. शुक्रवारी आणि गुरुवारी झाडू बाहेर टाकू नये हे लक्षात ठेवा. असे केल्यास आर्थिक समस्यांना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते.

 झाडू दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण दिशेला ठेवल्यास कधीही जीवनात धनाची हानी होत नाही. आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. वास्तू नुसार कधी झाडू कधीही कपाटाच्या मागे किंवा तिजोरीच्या खाली ठेवू नये. असे केल्याने धनहानी होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *