Skip to content

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हा एक उपाय… नक्कीच माता लक्ष्मी होईल प्रसन्न…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो सर्वानाच वाटते की आपल्याजवळ धनसंपत्ती अफाट असावी,सर्व गोष्टी भरभरून असाव्या. त्यासाठी अनेकजण खूप कष्ट करतात,पैसे कमवतात. पण काही वेळा खूप कष्ट करून देखील आपल्या जवळ पैसे येत नसतात, शिवाय ते आले तरीही आपल्या हातात टिकत नाहीत. 

ते पैसे वायफळ खर्च होऊन जातात,त्याचा सत्कर्मासाठी उपयोग होत नाही. पैसे हे अनेक गोष्टी आपणाला मिळवून देतात,त्यामुळे त्यांचे महत्व देखील आपल्या जीवनात जास्त आहे. त्यासाठी आपण खूपसे उपाय देखील करत असतो. त्यातीलच एक उपाय जो माता लक्ष्मीला प्रसन्न करतो त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

हा उपाय करतेवेळी आपणाला कापराच्या वड्यांची गरज लागणार आहे, कापूर हा फार पूर्वी पासून देवघरात ठेवण्यात येत असलेली वस्तु आहे. त्याचे महत्व अनन्यसाधारण असून, एक सकारात्मक व उत्साही वातावरण निर्माण करण्यात कपूर नेहमीच यशस्वी ठरतो. 

आजचा हा उपाय खूप सोपा आहे, तसेच याचे फायदे मात्र भरपूर आहेत. हा उपाय जी व्यक्ती करते त्या व्यक्तीला नेहमीच ऊर्जा प्राप्त होत राहते. हा उपाय जर दररोज आपण केला तर आपल्या घरात कोणत्याच प्रकारची कमतरता भासत नाही. घरात नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते, समाधान पसरते.

हा उपाय करतेवेळी गायीच्या शेणाची गौरी घ्यावी, जर ती नाही मिळाली तर चमचा मध्ये कापूर तसाच जाळला तरी चालेल. पण जर गौरी असेल तर अतिउत्तम होईल, जर गायीच्या शेणाची गौरी मिळाली तर त्या गौरीला गॅस वर पेटवावी व लाल अग्नी तयार करावा.

त्यानंतर ती गौरी एखाद्या ताटात घ्यावी, व त्यावर दोन तीन कापराच्या वड्या ठेवाव्या आणि त्या जाळाव्या. जाळताना त्यावर एक लवंग व एक हिरवा वेलदोडा टाकून हे ताट संपूर्ण घरभर फिरवावे. त्यामुळे घरातील वातावरण सुखमय होईल. जर हा उपाय दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा शुक्रवारी करावा.

त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्तींचा वास होऊ लागतो. तसेच शुक्रवारी सकाळी स्नान करून गूळ पोळीचा मलिदा बनवावा. दहा,पंधरा जणांना वाटता येईल इतका तो असावा, त्यानंतर देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूची पूजा करावी.

 त्यावेळी कापूर जाळून आरती करावी, आरती करतेवेळी पांढरे तीळ व थोडासा प्रसाद दिव्यात टाकावा. त्यानंतर प्रसाद सर्वाना वाटून आपण घरात देखील घ्यायचा आहे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी सह श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच मित्रहो जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, वारंवार जाग येत असेल. कशाची तरी भीती वाटत असेल. 

तर रात्री झोपताना एका काचेच्या ग्लासात एक लवंग व एका कापराची वडी टाकून ठेवावी.यामुळे आपल्या आसपास असणारी वाईट शक्ती दूर होते,व आपणाला शांती मिळते. कापूर खूप फायदेशीर असतो.

 त्याच्या सुगंधाने तन, मन प्रसन्न होते. तसेच घरातील अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी, वास्तुदोष असेल तर त्याचा खास उपयोग होतो. रात्रीच्या वेळी चांदीच्या वाटीत दोन ,तीन कापूर व लवंग ठेवून पेटवावे. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण नष्ट बसुन शुभ वातावरण राहते. 

जर कोणत्याच कामत यश मिळत नसेल तर प्रत्येक शनिवारी कापराच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून अंघोळ करावी. तसेच आपल्या बाबतीत दुर्घटना होऊ नये, किंवा ती टाळण्यासाठी रोज रात्री कापूर जाळून समोर बसून हनुमान चाळीसा वाचावी. यामुळे नैसर्गिक व मानवी अशा दोन्ही प्रकारच्या दुर्घटने पासून आपले सरंक्षण होते. 

तसेच जर घरात नेहमी वादविवाद होत असतील,अशांती राहत असेल तर दोन कापराच्या वड्या गायीच्या शुद्ध तुपात भिजवून सकाळी व संध्याकाळी लावाव्या. तसेच जर कोणाचे लग्न लवकर जुळत नसेल त्यांनी सहाकापराच्या वड्या घेऊन त्यामध्ये छत्तीस लवंगा व त्यात थोडेसे तांदूळ आणि हळद मिक्स करावी व या मिश्रणाची देवीला आहुती द्यावी. 

मित्रहो हे होते कापराचे उपयोग व उपाय. तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *