Skip to content

नक्की करा हे ५ उपाय…भाग्य उजळेल…धनसंपत्ती लाभून जीवन सुखमय बनेल….!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आज आपण या लेखातून काहीशी खास बाब जाणून घेणार आहोत, यातून आपल्याला असे काही उपाय कळणार आहेत ज्यामुळे आपले भाग्य उजळण्यास खूप मदत होणार आहे. हे उपाय खूप छोटे छोटे आहेत पण अत्यंत प्रभावशाली आहेत. त्यांच्या मुळे जीवनातील अडचणी, संकटे दूर होतील. 

पण हे उपाय भक्ती पूर्वक करायचे आहेत. मनोभावे यांना आत्मसात करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात खुप सकारात्मक परिणाम जाणवतील. मित्रहो हे उपाय आपणाला अनेक संकटातून मुक्त करतील, शिवाय आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यास खूप जास्त मदत होईल.

जर तुम्हाला नेहमी कशाचीही खूप भीती वाटत असेल तर हनुमानांना दररोज पाच लाल फुले अर्पण करावी. तसेच जर महादेवाचे आशीर्वाद सुद्धा हवे असतील दररोज सकाळी बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते पान महादेवांना अर्पण करावे व आपली भीती नाहीशी होण्याची प्रार्थना करावी.

त्यामुळे तुमची भीती नक्कीच नाहीशी होईल. तसेच देवघरात तुपाचा दिवा जरूर लावावा, व कापूर आणि अष्टगंधाचा सुगंध घरात पसरवावा. प्रत्येक गुरुवारी व रविवारी शुद्ध तूप आणि गुळ कोळशाचे निखारे करून त्यावर टाकावे. त्यामुळे घरातील वातावरण अगदी सुगंधी होईल.

तसेच मित्रानो रोज रात्री शुद्ध तुपात बुडवलेल्या दोन कापराच्या वड्या घरात लावाव्या. त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन शांत झोप लागते. या सुगंधाचा संबंध थेट आपल्या भावनांशी भिडत असतो, म्हणून घरातील वातावरण जर शुद्ध व सुगंधित असेल तर आपले मन शांत आणि प्रसन्न राहते. तसेच नेहमी आपले डोके देखील शांत राहते.

 कोणत्याही शुक्रवारी एका कुलुपच्या दुकानात जाऊन लोखंडी किंवा स्टीलचे कुलूप विकत आणावे. त्याला उघडून पाहू नये, तसेच सील केलेले पॅक घरी आणावे आणि ते खोके तसेच आपल्या बिछान्याजवळ रात्रभर ठेवून द्यावे व शनिवारी सकाळी कोणत्याही मंदिरात जाऊन ते कुलूप तिथे ठेवून द्यावे.

जेव्हा कोणी येऊन ते कुलूप उघडेल तेव्हा आपल्या भाग्याचे द्वारे देखील आपोआप उघडले जाईल.त्यामुळे आपल्या सर्वप्रकारच्या अडचणी व संकटे दूर होतील. तसेच दररोज हनुमान चालीसा वाचावी, मंगळवारी व शनिवार हनुमानजी ना वस्त्र अर्पण करावी. 

तसेच बनारसी पानाचा विडा देखील अर्पण करावा,  हनुमान चालीसा दररोज वाचल्याने पितृदोष दूर होतात. तसेच आपली अडलेली कामे मार्गी लागतात, घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. दररोज गायीला, पक्षांना, कुत्र्यांना खाऊ घालावे. 

असे केल्याने आपली अडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होते. गायीला भोजन दिल्यास घरात शांती राहते, कुत्र्याला भोजन दिल्यास आपल्याला भय राहत नाही. तसेच कावळ्याला भोजन दिल्यास पितृदोष आणि कालसर्प दोष दूर होतात.

शनी देवांना प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला भोजन जरूर द्यावे. घरातील भिंतींवर आनंदी परिवाराचा फोटो लावावा, किंवा नैसर्गिक फोटो लावावा ज्याकडे पाहून आनंदी वाटेल. जर तुमच्या मागे सारखी संकटे येत असतील तर एखाद्या प्रेत यात्रेमागून जाऊन येताना काही सुट्टे पैसे वरून मागे टाकत टाकत घरी यावे. 

घरी आल्यावर अंघोळ जरून, हनुमानाच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची माफी मागावी. कास्याच्या वाटीत तेल घेऊन त्यात आपले तोंड पाहावे,व ते तेल कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवुन द्यावे. पाच प्रकारची फळे घेऊन एखाद्या मंदिरात ठेऊन द्यावे.

एखाद्या महत्वाच्या कामानिमित्त जर घरातून बाहेर जात असाल तर श्री गणेशाय नमः म्हणून चार पावले मागे यावे व नंतर घराबाहेर पडावे. घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन त्यावर पाणी प्यावे व मग घराबाहेर पडावे त्यामुळे आपल्या कामात आपणाला सफलता मिळेल. 

तसेच काळी मिरीचे काही दाणे घराबाहेर टाकून, त्यावर पाय ठेवून बाहेर निघावे व मागे वळून पाहू नये. आपल्या कामात काही अडचणी असतील तर त्या लगेचच दूर होऊन सफलता मिळेल. खूप प्रयत्न करूनही एखादे काम पूर्ण होत नसेल तर एकोणिसाव्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यामध्ये ११ उडदाचे दाणे टाकावेत.

तसेच दररोज संध्याकाळी तुपाचा एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. पण या झाडाला फक्त शनिवारी स्पर्श करावा, इतर कोणत्याही दिवशी त्याला स्पर्श करू नये. जर घरात आर्थिक अडचणी येत असतील.

तर घरातील मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, दागिने हे घराच्या उत्तर दिशेला ठेवावी. ही दिशा कुबेर देवांची आहे असे मानले जाते आणि कुबेर महाराज हे धानाचे देवता आहेत. त्यामुळे आपणाला धनाची कमतरता अजिबात भासणार नाही. 

मित्रहो हे उपाय नक्की करून पहा, जीवन सोप्पे सुखमय बनेल. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.