Skip to content

नवरात्रीत लग्न लवकर जमण्यासाठी करा हे सोपे उपाय. माता लक्ष्मी होईल प्रसन्न.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या गरजा थोड्याफार प्रमाणात का होईना बदलत चालल्या आहेत. याचा परिणाम आपल्या आयुष्यावर कळत न कळत होताना दिसतो. स्वप्नांच्या मागे धावताना गरजा अपेक्षा पूर्ण करताना लग्नासारखी आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट सुद्धा मागे पडते. अर्थात कारण कोणतीही असतील.

 पण लग्न जमण्यासाठी येणारे अडथळे मग ते प्रत्यक्षात असू देत किंवा अप्रत्यक्षत असो ते कसे दूर करावे यासाठी आज मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे. अगदी सोपे आहे पण महिन्यात तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम हा दिसून येईल हे मात्र नक्की फक्त मनात श्रद्धा ठेवा. 

मित्रांनो हे उपाय कोणते हे आता मी तुम्हाला म्हटलं तसं घरगुती आहे. फार तुम्हाला त्याच्यासाठी बाहेरून सामग्री आणायची नाहीये. पण मनातली श्रद्धा मात्र तुम्हालाच निर्माण करायची आहे. बऱ्याचदा लग्न ठरतं आणि मध्येच होकार असताना अचानक अडथळे येतात. होकाराचा परिवर्तन नकारात होत. किंवा प्रेम असतं पण घरच्यांचा पाठिंबा नसतो आणि मग तो मिळवायचा कस हा प्रश्न असतो. 

कधी वय उलटून गेलेला असत. कारण अनेक असतात पण हा उपाय मात्र जालीम आहे. आता मी म्हटलं तसं घरगुती आहे. त्यासाठी आपल्याला पाणी असलेला छान नारळ आणि लाल कपडा लागेल या दोन वस्तूंचा वापर करून प्रश्न आपण सोडवू शकतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

पण हे खरं आहे हा उपाय कोणत्याही मंगळवारी करावा. सकाळी लवकर उठून आठ वाजायच्या आत स्नान करून देवपूजा करून आणि नंतर लाल कापड हे देवासमोर ठेवायच त्यावर नारळ ठेवायचा. नंतर आपल्या दोन्ही हात त्या नारळावर ठेवायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र १०८ वेळा म्हणजेच एका माळेत जेवढे मणी असतात तेवढ्या वेळा हा मंत्र म्हणायचा.

मंडळी हे करत असतानाच आपल्या मनात मात्र आशा असायला पाहिजे अपेक्षा असली पाहिजे. भक्ती भावाने जे करतो ते होणारच ही मान्यता असावी. हे करत असताना आपण जे विचार करतो त्याच्यामध्ये आपल्या लग्न झालं आहे मनासारखा आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे. 

लग्नानंतर आपण आनंदी आहोत असं इमॅजिनेशन ठेवायच. याचा नक्की फायदा होताना तुम्हाला दिसेल. नंतर मंत्र पूर्ण झाला की मग नारळाला आपलं नाव गोत्र वय लग्नासंबंधी जी समस्या असेल ती सांगावी. त्यानंतर प्रार्थना करावी नारायाला नमस्कार करावा त्यानंतर गुलाल तेलामध्ये मिसळून किंवा मग शेंदूर चमेलीच्या तेलामध्ये मिसळून नारळावर श्रीराम असं लिहाव. 

त्यानंतर ते नारळ लाल कपड्यामध्ये बांधून घराच्या अशा ठिकाणी ठेवावं जिथे सहज सहजी कुणाचा हात पोहोचणार नाही. म्हणजेच त्या नारळाला स्पर्श सहजासहजी न होणे हे अपेक्षित आहे. हा साधा आणि सरळ उपाय करून बघा आणि एका महिन्यानंतर तुम्हाला याचे परिणाम सुद्धा दिसतील. 

तेही बघा याबरोबरच प्रत्येक गुरुवारी लग्न इच्छुक व्यक्तीने हळदीचा टिळा लावावा. आणि पिवळे कपडे परिधान करावे. जेणेकरून आपला गुरु ग्रह हा प्रभावित होतो. आणि हा ग्रह वैवाहिक जीवनासाठी प्रबळ असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. तसंच लग्न जमत नसेल किंवा जुळत नसेल त्या मुला मुलींनी आपल्या खिशामध्ये एक हळकुंड ठेवायच.

अगदी रात्री झोपताना तेच हळकुंड हे आपल्या उशाखाली ठेवायच. मित्रांनो हे छोटे छोटे पण प्रभावी उपाय आहे. जर मनोभावे केले तर याचा नक्की फायदा होईल. तेव्हा मित्रांनो हे करून बघा. हे असे उपाय आहेत ज्याने कुणाचं नुकसान तरी होणार नाही झाला तर फायदाच होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *