नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे वर्षभराच्या भर भराटीसाठी अवश्य बघा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नवीन वर्षाचे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे. नवीन वर्षामध्ये सगळ्यांच्याच घरी नवीन कॅलेंडर येत असते. वर्षभर दर तुम्हाला घरांमध्ये भरभराट हवी असेल. तर वर्षभराच्या भरभराटीसाठी तुम्हीसुद्धा या दिशेला लावावे तुमच्या घरातले नवीन कॅलेंडर. 

मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक वस्तूची एक दिशा असते एक स्थान असते. त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. घर बनवताना सगळ्यांच्याच प्रयत्न असतो की आपले घर वास्तुशास्त्राप्रमाणे असावे. तसेच कॅलेंडरची सुद्धा एक दिशा असते. आता नवीन वर्षाचे कॅलेंडर सगळ्यांच्याच घरी आले असते. 

बरेच लोक एक चूक मात्र करत असतात. नवीन कॅलेंडर आले तरी ते जुने कॅलेंडर आपल्या घरातच राहू देता. जुन्या कॅलेंडर वर नवीन कॅलेंडर लावत असतात. तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. की नवीन वर्ष आले तर आपली जुने कॅलेंडर काढून कुठेतरी ठेवून द्यावे. माहिती आहे की ती काही ना काही कामाला लागत असते. 

तारखा बघायला  काहीतरी बघण्यासाठी लागत असते. पण तुम्ही त्या भिंतीवरून काढून घ्या. त्याला कुठेतरी ठेवुन द्या. पण जुन्या कॅलेंडर भिंतीवर लावून ठेऊ नका. मित्रांनो आता प्रश्न येतो की नवीन कॅलेंडर कुठे लावावे. 

तर मित्रांनो नवीन कॅलेंडर घरातल्या उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवरच तुम्ही लावायला पाहिजे. पूर्व पश्चिम आणि उत्तर तीनच दिशेला तुम्ही कॅलेंडर लावावे. दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकून सुद्धा लावू नये. 

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. आणि यमाच्या दिशेमध्ये कोणतेही काम करत नाही. कोणतीही वस्तू ठेवत नाही. आणि कॅलेंडर आपल्या वर्षभराचे गणित ज्यामध्ये असते. ती गोष्ट तुम्ही लावायलाच नको पाहिजे. खास करून लोक पूर्व पश्चिम उत्तर दिशेला कॅलेंडर लावता. 

हीच मान्यता सुद्धा आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातले नवीन कॅलेंडर उत्तर दिशा पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशेला लावू शकतात.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.