निम्म्या गावाचा वाढदिवस १ जूनला असतो कारण लय भन्नाट आहे. वाचा सविस्तर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज सकाळी फेसबुक उघडलं तर ढीगभर लोकांचे हॅपी बर्थडे तुमच्या पण लिस्टमध्ये डझनभर तर वाढदिवस असतीलच. विशेष म्हणजे यात असतात फिफ्टी स्किट म्हणजे मम्मी पप्पा काका काकू मावशीच्या वगैरे वगैरे. पण असं का इतक्या लोकांचे वाढदिवस एक जूनला का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता मिळेल.

एक जूनला वाढदिवस असण्याचं कारण आम्हाला एका भिडुने सांगितलं की यामागे ग्रहांचा खेळ आहे. शनि कुठून कुठे घुसला. चंद्राची गती कशी वाढली वगैरे वगैरे आकडेमोड आम्हाला त्याने मांडून दाखवली. पण असल्या अंधश्रद्धांवर आमचा काही विश्वास नाही. 

मग आम्ही आमच्या मास्तरांना फोन केला त्यांना विचारले  तुमचा वाढदिवस एक जूनला कसा तेव्हा त्यांनी या तारखेचे क्रेडिट त्यांच्या मास्तरांना दिल. झाल अस की त्या काळात म्हणजेच इंग्रज देश सोडून गेले तेव्हा भारतात शिक्षण क्रांती म्हणतात ती झाली. स्वतंत्र भारताच्या सरकारने गावाकडच्या प्राथमिक शाळांपासून मोठ्या आय आय टी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत सगळ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या. 

गावाकडची पोर बाळ शिकू लागली. कोल्हापूरचे शाहू महाराज, महात्मा फुले यांनी लावलेली विद्या प्रसाराची रोप वाढून त्याचा वटवृक्ष बनला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे ज्ञानयोगी खेडोपाड्यात फिरून पोरांना उचलून आणून शाळेत बसवायचे.

जो शिकेल तो टिकेल अशा घोषणा फेमस झाल्या होत्या. गेल्या कित्येक पिढ्या साध्या अक्षराशी ओळख नसलेल्या बहुजन समाज सुद्धा पोरांना शिकवून साहेब करण्याची स्वप्न बघू लागला. साधारण जून महिन्यात शाळा सुरू होईल पावसाचे दिवस तोंडावर आले असतात आणि शेतात बरीच काम वाट बघत असतात. 

त्यातून वेळ काढून गल्लीत खेळण्यात रमलेल्या पोराच्या हातात पाटी-पेन्सिल देऊन शाळेत आणून सोडले जाई. शाळेत येताच मास्तर पहिल्यांदा तिथल्या पोरांना प्रश्न विचारी पोरांचे नाव खंड्या राम्या अन्या असे सांगितले की मास्तर त्याचे खंडेराव रामचंद्र अण्णासाहेब असे नाव सांगत असे. हे सांगितले की पुढचा प्रश्न आहे. जन्मतारीख आता हे कोणाला माहित आहे. 

खंडीभर पोरांचा तो काळ सगळ्यांच्या जन्मतारखा लक्षात ठेवण्यास कोणी वेळ वाया घालवणार. आणि तसंही इंग्लिश महिने कोणाला माहीत असणार. चैत्र वैशाख आखाड अशी गणना चालू असायची. हाताच्या बोटावर कॅलक्युलेटर चालू असायचं. मग जन्मनोंदणी वगैरे मॅटर त्यांच्यासाठी वॉन्टेड सिलेबस होते. 

अशावेळी नाव नोंदवून घेणारा शाळा मास्तर पोराची जन्मतारीख अंदाजे एक जून टाकायचा. अख्खा वर्गाची वर्ग १ जूनला जन्माला आलेला असायचा. म्हणजेच सगळ्या मुलांची जन्मतारीख आणि त्यांचे बारसे त्या काळच्या मास्तर लोकांनी घातलं होतं असे म्हटलं तर चुकीचं नाही. आणि म्हणूनच की काय आज भारतात वर्ल्ड रेकॉर्ड होईल अशांचा वाढदिवस आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर सू प्रसिद्ध नर्गिस दत्त, समाजसेवक बाबा आढाव, शेतकरी नेते राजू शेट्टी, मैत्री दिलीप कांबळे, अभिनेता आर माधवन, बीपी आमदार दत्ता भरणे, यांच्या जोडीला हॉलीवूडची स्वप्नसुंदरी मरलीन मन रे ही अमिताभ बच्चन फ्रीमन यांचाही आजच वाढदिवस असतो. आम्ही म्हणत नाही की या सगळ्यांचा वाढदिवस मास्तर लोकांनी ठरवलाय पण ती ही शक्यता नाकारता येत नाही.

यापेक्षा अजून महत्त्वाचं म्हणजे आजच्याच दिवशी अख्या महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणून ओळखले जाणारी लाल परी एसटी सुद्धा १९४८ साली पहिल्यांदा धावली होती. याशिवाय मुंबई पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची जीवन वाहिनी दख्खनची राणी दक्षिण एक्सप्रेस हीसुद्धा आजच ९२ वर्षांची झाली आहे.

तर अस आहे आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणूनच १ जूनला सरकारी हजारो वाढदिवस असतात. असो आपल्याला काय केक खान्याशी मतलब. तुमच्यापैकी आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत ते आम्हाला सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.