Skip to content

भाग्य बदलायच असेल तर गुरुवारी करा हे ५ उपाय..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भाग्य बदलायचे असेल तर गुरुवारी करा हे ५ उपाय. मित्रांनो जर तुमच्या पत्रिकेत गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पतीशी निगडीत कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते. 

बृहस्पति देवांचे पण गुरू आहेत गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचे कारक ग्रह आहे. येथे आम्ही तुम्हाला गुरु ग्रहाच्या पूजेचे पाच उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या वरचे सगळे दोष दूर होते. त्यातला पहिला उपाय गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत कराव.

म्हणजे गुरुवारी उपवास करावा. त्यात तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करावे. व बिना मीठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगाचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू आंबे केळी इत्यादी सामील करावे. 

दुसरा उपाय बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजमान करावे. यानंतर पंचोपचार पूजा करावी. पूजेत केसरी चंदन पिवळे तांदूळ पिवळे फुल व प्रसारासाठी पिवळे पकवान किंवा फळ अर्पित करावीत. आणि आरती करावी. बृहस्पती यांची प्रतिमा ऑनलाइन सुद्धा मिळते. 

तिसरा उपाय गुरु मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम बृहस्पती नमः ओम गुरु बृहस्पति नमः मंत्र जपाची संख्या कमीत कमी १०८ म्हणजे संपूर्ण एक माळ असायला पाहिजे. 

चौथा उपाय गुरु ग्रहाची निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे हळद चण्याची डाळ आंबा आणि अन्य. मित्रांनो पाचवा उपाय महादेवाला बेसनाचे लाडूचा प्रसाद गुरुवारच्या दिवशी अर्पण करावा. 

तर पाच उपाय होते हे उपाय केल्याने धनसंपत्ती विवाह आणि भाग्य संबंधित सर्व अडचणी दूर होतात. आणि तुम्हाला सगळे उपाय करणे शक्य नसेल तर एक-दोन उपाय सोपे आहेत. 

जे तुम्हाला जमतील ते तुम्ही करू शकत असाल ते नक्की करावे. गुरु ग्रह आपल्या पत्रिकेत प्रसन्न राहतात. आणि आपल्यावर कोणतीही अडचण येत नाही आणि आपले भाग्य नक्की बदलते.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.