Skip to content

मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत विवाहित महिलांनी आपल्या आईची ओटी नक्की भरावी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आता ही ओटी का भरावी? तर मित्रांनो महिलांना माहीतच असेल की, मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतात. पण यासोबतच काही महिला हे विवाहित महिलांच्या ओठ्या सुद्धा भरतात.

त्यासोबतच अशी परंपरा अशी मान्यता आहे की, या महिन्यात म्हणजे १४ तारखे पासून ते १९ फेब्रुवारी पर्यंत जर विवाहित महिलेने आपल्या आईची ओटी भरली. तर सुख, सौभाग्याची प्राप्ती होते आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. आईचे प्रेम आणि मुलीचे प्रेम कायम राहते.

कोणतीही अडचण त्यांच्यावर येत नाही. लक्ष्मीची कृपा त्यांच्या वर नेहमी राहते. म्हणून तर हळदी कुंकू चा कार्यक्रम केला जातो आणि ओटी सुद्धा भरली जाते. या महिन्यात म्हणजेच मकर संक्रांती पासून रथ सप्तमीपर्यंत तुम्ही तुमच्या आईची ओटी नक्की भरा.

भरपूर महिला अशा आहेत की, त्यांच्या आई नाहीये. आई वा-रली आहे. तर अशा वेळेस आई नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची घरीच ओटी भरू शकतात किंवा कुलदेवी नसेल तर घरात जीही देवी असेल ज्याही देवीची मूर्ती किंवा फोटो असेल, लक्ष्मी असेल, सरस्वती असेल तर कोणतीही देवी असेल तर त्या देवीची ओटी तुम्ही भरू शकतात.

ओटी भरण्याची सोपी पद्धत आहे. ओटीसाठी तुम्ही नवीन साडी आणू शकता किंवा एखादी ब्लाउज पीस चालू शकतो. साडी देऊनही ओटी भरता येते, ब्लाउज पीस देऊनही ओटी भरता येते. त्या ओटीसाठी एक नारळ सुद्धा लागतो. त्यासोबत ११, २१ रुपये दक्षिणा सुद्धा लागतात.

त्यानंतर गहू किंवा तांदूळ देऊन तुम्ही ओटी भरू शकता. आणि ओटीतील सामान जर देवीची ओटी तुम्ही भरत असाल तर ते सामान जे आहे. नारळ, ब्लाउज, पीस किंवा गहू, तांदूळ ते सगळ ज्या महिलेने ओटी भरली असेल तिने ठेवाव.

तांदूळ आणि गहू आपल्या धान्यामध्ये मिक्स कराव. बरकत म्हणून आणि आईला दिलेली ओटी आईने ठेवावी. तर या प्रकारे मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही आईची ओटी नक्की भरा. आई नसेल तर देवीची ओटी नक्की भरा कारण देवीच आपली आई असते.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *