Skip to content

मकर संक्रातीला करू नका हे ५ काम, होईल नुकसान. आयुष्यभर पश्चाताप करत बसाव लागेल..

नमस्कार मित्रांनो.

मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामे असे आहेत ती तुम्ही चुकूनही करू नका नाहीतर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम भोगायला लागतील. पण कोणत्या आहेत ते काम आणि का करू नये. चला जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सूर्यनारायणाची पूजा उपासना केली जाते. सूर्यनारायणाची उपासना केल्यामुळे आपल्याला पद प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळेल.

पण मकर संक्रांतीच्या दिवशी ही काम मात्र टाळायलाच हवी रोजच्याप्रमाणे काही लोक मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर चहा आणि नाश्ता करायला सुरुवात करतात पण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय जेवण करू नये. काळे तीळ आणि गंगाजल मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी.

आंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करावा. सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. अर्थात सूर्याला जल अर्पण कराव. त्यानंतर देवपूजा करूनच तुम्ही चहा नाश्ता घ्यायचा आहे. आता मकर संक्रांतीच्या दिवशी जी मुख्य काम तुम्हाला करायची नाहीयेत.

१)त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा आणि लसणाचे सेवन करायचे नाही. त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही. मकर संक्रातीच्या दिवशी सात्विक आणि सहकारी भोजन केले पाहिजे. या दिवशी गुळाचा आणि तिळाचा समावेश असलेले भोजन कराव.

२) त्याचबरोबर मकर संक्रात हा निसर्गाचा उत्सव आहे. हिरवाळीचा उत्सव आहे. त्यामुळे या दिवशी पिकांची काढणी करू नये. वृक्ष गवत तोडू सुद्धा नयेत.

३) मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या वाणीवर संयम ठेवावा. अर्थात कठोर बोलू नये. रागवू नये. कोणाशीही वाईट बोलू नये. तिळगुळ खावेत आणि सगळ्यांशीच गोड बोलावे. ४) त्याचबरोबर मकर संक्राती दिवशी मध्याचा सेवन करू नये.
५) मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशीची धार काढू नये.

तर ही होती ती पाच काम जी मकर संक्रांतीच्या दिवशी करू नयेत. पण मग मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की काय कराव. जर मकर संक्रातीच्या दिवशी कोणी साधू, एखादी वृद्ध व्यक्ती किंवा दारात कोणी काही मागायला आलं तर तुमच्या क्षमतेनुसार त्याला दान नक्की करा. मकर संक्राती दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करा.

या दिवशी नामस्मरण आवर्जून करावे. तुमच्या गुरूंचे नाव असेल किंवा तुमच्या इष्ट देवतेचे नाव असेल त्या नावाचा जप तुम्ही नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी करावा. त्याचबरोबर या दिवशी तीळ मुग डाळ यांची खिचडी याचही सेवन करावं. खरं तर मकर संक्रात दानधर्म यासाठी ओळखली जाते. या दिवशी तुम्हाला जमेल तसा दानधर्म तुम्ही करायचा आहे. या दिवशी तुम्ही भांडे दान करू शकता. अन्नदान करू शकता.

किंवा तुम्ही उबदार कपड्यांचा सुद्धा दान करू शकता. गरजू व्यक्तींना दान द्या आणि त्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या वरती राहील. कारण शनिदेव दान धर्माने प्रसन्न होतात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्याला महत्त्व आहे. खास करून तुम्हाला शनीची साडेसाती,ढिय्या, पनोती असे काही चालू असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टीच दान नक्कीच करा.नक्कीच तुम्हाला याचा लाभ होऊल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *