Skip to content

मनुष्य जन्माआधी आत्मा कुठे असतो? जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

सनातन धर्माच्या अनेक पुस्तकांमध्ये ८४ लक्ष योनींच उल्लेख आहे असे म्हणतात की ८४ लाख जन्मांचा टप्पा ओलांडल्यानंतर न सत्कर्माच्या जोरावर मनुष्य देह मिळतो. आणि आत्मा मनुष्य रुपात जन्माला येतो. पण या ८४लाख योनी नेमक्या कशा आहेत यामध्ये पद्मपुराणांमध्ये तक्षलवाद वर्णन केलेले आहे. काय आहे ते वर्णन चला जाणून घेऊयात.

मित्रांनो पद्मपुराणानुसार ८४ लाख योनीचा अर्थ ब्रह्मांडात आढळणारे विविध प्रकारचे प्राणी याच सजीवांना योनिज आणि संन्यावती या दोन भागात विभागले आहे त्याचबरोबर प्राण्यांच्या शरीर थलचर, नभचर, आणि जलचर असे तीन भागात वर्गीकरण करण्यात आलेला आहे. पुरानात नऊ लाख जलचर वीस लाख झाडे वनस्पती अकरा लाख कीटक दहा लाख पक्षी तीस लाख प्राणी आणि चार लाख देवता , दानव आणि मानव असल्याचे सांगितले आहे.

या सर्वांच्या मिळूनच एकूण ८४ लाख योनी तयार होतात. नरदेहाला अर्थात मनुष्य देहाला मुक्तीचे द्वार म्हटले जाते. कारण मानवी देहात ज्ञानेन्द्रिय धर्मेंद्रिय मेंदू आणि विचार करण्यासाठी मन दिला आहे. त्यामुळे बऱ्या वाईट आपला फरक मानव ओळखू शकतो पुण्य कर्म करावे आणि या चक्रातून मुक्ती मिळावी अशीच ईश्वराची रचना आहे. तसे झाले नाही तर आत्म्याचा प्रवास पुन्हा सुरू होतो.

सुखदुःखाचे सोहळे पीडा सगळ्या गोष्टी ८४ लाख योनीच्या प्रवासात पुन्हा सहन कराव्या लागतात. म्हणून हा देह सत्कारणी लावा असे संत सुद्धा कानी कपाळी ओरडून सांगत असतात. याच गोष्टीला पद्मपुराणाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. पद्म पुरणात असे म्हटले गेलेले आहे की जेव्हा आत्मा विहित ८४ लाख योनीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्याचे कर्म देखील चांगले असते. तेव्हा त्याला देह किंवा पितृ योनी प्राप्त होते.

अर्थात ती व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठ धामाला जाते. दृष्ट कर्म करणारा आत्मा पुन्हा ८४ लाख जन्मात जन्म घेण्यासाठी पाठवला जातो. वेद आणि पुराणांमध्ये यालाच दुर्गती म्हटलं गेलेला आहे. म्हणजे आत्मा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. ही परिस्थिती आदर्श मानली जात नाही त्यामुळे स्वर्गात जायचं की नरकात हे आपले भाग्य नाही तर कर्म ठरवते हे लक्षात ठेवा आणि नेहमी प्रामाणिकपणे आपले काम करत रहा.

कारण आपल्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते बर का आणि ते काम नीट केलं नाही तर पुन्हा आपल्या आत्म्याला ८४ लाख योनीचा प्रवास करावा लागणार हे निश्चित मग मंडळी आता विचार करा मनुष्याचा जन्म किती दुर्लभ आहे. आणि जर तो मिळाला तर आपण तो सत्काकरमच घालवावा.

उगाच नको त्या गोष्टींमध्ये वाया का घालवा इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करणे याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलणे नको त्या भानगडी करणे असे करत बसलो तर वेळ हातातून निघून जाईल हो की नाही म्हणून सत्कर्मांची कास धरा मनी नामस्मरण करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *