Skip to content

महालक्ष्मी स्वतः घरी येईल, दरवाजावर लावा ही वस्तू आणि अशी करा पूजा..!

नमस्कार मित्रांनो.

नवरात्रीचा काळ सुरु झाला आहे. आज घटस्थापना होणार आहे नवरात्रात नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन केले जाते. देवीच्या नऊ रूपाचे पूजन करून वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेद्य दाखवले जातात. घटस्थापनेच्या म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नानादी ते कर्मातून निवृत्त होऊन घराची स्वच्छता करावी.

ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे तेथे थोडेसे गंगेचे पाणी शिंपडावे. त्यानंतर घटाची स्थापना करावी घटस्थापना आपल्या रीतीने वाचानुसार कुळाचारानुसार करावी. प्रत्येकाची घटस्थापनेची पद्धत वेगवेगळी असते. कलश स्थापने शिवाय कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीचे पृथ्वीवर आगमन होते. याच दिवशी घटस्थापना केली जाते.

कलशाला समृद्धी व मंगलतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून नवरात्रीमध्ये देवीचे पूजन करताना देवीच्या प्रतिमेसमोर कलशाची स्थापना करावी. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या भक्तांवर असते. तसे तर देण्याची आपल्या भक्तांवर सदैव कृपा असते पण नवरात्रात देवीची विशेष कृपा आपल्या भक्तांवर असते.

विशेषतः आपल्याला धन लाभाची अपेक्षा असेल भरपूर पैसा मिळावा अशी अपेक्षा असेल तर आपण नवरात्रीत काही उपायांद्वारे देवी आईला प्रसन्न करू शकतो. वास्तुशास्त्रात घर व घराच्या मुख्य दाराचे फार महत्त्व आहे नवरात्रात आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी कितीतरी प्रयत्न करतो. परंतु जेथून देवीचे आगमन होते म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा यावर काय ठेवावे म्हणजे देवीचे विशेष कृपा आपल्यावर होते ते आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

नवरात्र देवीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य दाराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. वास्तुशास्त्राप्रमाणे या काही वस्तू मुख्यादारा जवळ ठेवल्यास देवीची विशेष कृपा आपल्यावर होतेआणि घरात धन संपत्तीत वाढ होते. घरातील अडीअडचणी दुःख त्रास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य चांगले राहते आपण निरोगी राहतो दारावर देवी लक्ष्मीची पावले लावणे खूप शुभ असते. हे पावले आपण विविध प्रकारांमध्ये विविध आकारांमध्ये घेऊ शकतो.

त्यातील कोणतीही आपल्याला जी आवडतील तशी दारात आणून लावावीत. ही पावले देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत आहेत अशीच लावावी. नवरात्रीमध्ये मुख्य दाराजवळ एक मोठ्या बाऊलमध्ये पाणी टाकून त्या पाण्यात फुले टाकून ठेवावेत. शक्य असेल तर त्यात दोन तीन थेंब अत्तरही टाकावे. म्हणजे याचा मंद सुगंध दरवळत राहील.

हा बाऊल दाराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. अशाप्रकारे हा पाण्याचा बाऊल दारात ठेवल्यास घरातल्या मुख्य सदस्याला याचा फायदा होतो. त्यांच्या उत्पन्नात वाढ होते पर्यायाने घरात पैशांचा ओघ वाढतो. दारावर सुंदर व रंगीत असे तोरण बांधावे तोरण जर आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानाचे असेल तर खूपच चांगले.

यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करीत नाही आणि घरात नेहमी सकारात्मक व प्रसन्न वातावरण राहते. घर अथवा दुकानाच्या मुख्य दारावर देवी लक्ष्मीचा फोटो लावावा.या फोटोमध्ये देवी कमळात बसलेली असावी. अशाप्रकारे मुख्य दारावर देवी लक्ष्मीचा फोटो लावल्यास आपल्याला शुभ फळांची प्राप्ती होते. देवी लक्ष्मीचा उभा फोटो असू नये नाहीतर देवी घरात थांबत नाही.

उभ्या उभ्या निघून जाते. दारावर स्वस्तिक असेल तर घरात आजारपण पसरत नाही. जर चांदीच्या स्वस्तिक लावणे शक्य नसेल तर कुंकू ओलेकरून दारावर स्वस्तिक काढावे. हेही खूप शुभ असते. परंतु हे पुसले गेले तर पुन्हा पुन्हा काढत राहावे. दारावर ओम किंवा शुभ लाभ लिहावे. यामुळे हे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात.

हे चिन्ह दाराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला काढावे. अशाप्रकारे नवरात्र जर आपण मुख्य दारावर हे उपाय केले तर देवीची कृपा आपल्याबरोबर होते आणि देवीच्या आशीर्वादामुळे आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी राहते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *