Skip to content

महाशिवरात्रीच्या आधी या ३ राशींना महादेव देणार धनलाभ. आता महादेवांच्या आशिर्वादाने आपले भाग्य उजळेल.

  • by

नमस्कार मित्रांनो..

मंडळी हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री असते. यांना २०३३ मध्ये १८ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा योग आहे. अस म्हणतात हि महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जो भक्त भगवान शंकर व माता-पार्वती आराधना करतो त्यास शुभ लाभ होतो अशी मान्यता आहे.

पण यंदा ग्रहांच्या स्थितीनुसार महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीपासूनच काही राशींना धनलाभ होण्याचे मोठे योग असल्याचे समजत आहे.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत प्रवेश घेणार आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीत अगोदरच शनी देव स्थित असल्याने शनी सूर्य युती सुद्धा तयार होत आहे. सूर्याच्या प्रवेशानंतर महाशिवरात्रीच्या आधी नेमकं कोणत्या राशींना श्रीमंतीचे योग आहेत ते आपण जाणून घेऊया.

१) मेष रास- शनीच्या कुंभ राशीतून सूर्य व शनीची युती होताच मेष राशींच्या मंडळींना आपार धन लाभाचे योग आहेत. सूर्य आपल्या राशीच्या अकराव्या स्थानी स्थिर होणार आहे. सूर्याच्या प्रभावाने गोचर काळात मेष राशीला भाग्योदयाचे योग तयार होत आहेत.

तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे लागेल. पण यातून आपण वरिष्ठांच्या नजरेत येऊन येत्या काळात प्रमोशनची संधी सुद्धा मिळू शकते. सूर्य व शनीची युती आपल्याला आत्मविश्वास मिळवून देऊ शकतो.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या मंडळींसाठी शनि सूर्य युती लाभदायक ठरू शकते. सूर्य आपल्या राशीच्या चौथ्या स्थानाचा स्वामी आहे. येत्या काळात सूर्य आपल्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानात स्थिर होणार आहे. सूर्याचे गोचर होताच आपली प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या नव्या दिशा नक्कीच विचारात घेऊ शकता. आर्थिक स्थितीत मोठा व सकारात्मक बदल होऊ शकतो.

३) मकर रास- सूर्य गोचर कालावधी हा मकर राशींसाठी शुभ ठरू शकतो. सूर्य गोचर आपल्या राशींच्या दुसऱ्या स्थानी होत आहे. या काळात आपली आर्थिक सुधारण्याचे योग आहेत. आयुष्यात अनेक हवेहवेसे बदल घडवून येतील. गुंतवणुकीतून दोन लाभाची प्रचंड मोठी संधी आहे. नव्या नोकरीची संधी सुद्धा लाभू शकते. येत्या काळात आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *