Skip to content

” माझी तुझी रेशीमगाठ” मधून काढता पाय घेणार ही दिग्गज अभिनेत्री…. जाणून घ्या कोण आहे ती…..!

  • by

नमस्कार मित्रानो.

 मित्रहो मालिका क्षेत्रात अनेक कथा नेहमीच आपल्या भेटीस येत असतात, त्यामुळे लोक दिवसेंदिवस  या मालिकेत चांगलेच रंगून जातात. झी मराठी वाहिनीवर अनेक मालिका रसिकांच्या नेहमीच भेटीस येत असतात. अशीच एक मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन ठेपली आहे, ती मालिका म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ”. 

या मालिकेने बघता बघता प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील सर्वच पात्रे अतरंगी तर आहेतच शिवाय खूपच रंजक आहेत. त्यामुळे ही मालिका सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. ” माझी तुझी रेशीमगाठ” मालिका नुकताच नव्याने चर्चेत येत आहे.

यामागे देखील एक खास कारण असून लवकरच या मालिकेतून एक दिग्गज अभिनेत्री काढता पाय घेणार असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष मालिकेतील सर्व पात्रांकडे आवर्जून जात आहे, कारण यातील प्रत्येक कलाकार स्वतःची भूमिका चोख पार पाडत आहेत. 

छोटी परी, नेहा आणि यश यांची केमिस्ट्री तर सर्वानाच स्तब्ध करते. यश आणि नेहाची जोडी अनेकांना फार आवडते, शिवाय आता तर त्यांच्या केमिस्ट्री ची पातळी आणखीनच गोड क्षणांना गाठत आहे. दरम्यान या मालिकेतून आता कोण अभिनेत्री बाहेर पडत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

शिवाय काहीसे नाराज देखील आहेत कारण प्रत्येक कलाकाराची खूप छान सवय झाली असल्याने सर्वांचे घट्ट बांध चाहत्यांना मालिकेकडे नेहमीच आकर्षित करतात. या मालिकेतील सिम्मी काकी चे पात्र सुद्धा फार कमी वेळात जास्त लोकप्रिय झाले असून हे पात्र खूप गाजले आहे. 

हे पात्र अभिनेत्री शीतल साकारत होत्या. त्यांच्या या भूमिकेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला असून ही भूमिका नेहमी मालिकेला निराळेच वळण देत होती. मात्र त्यांनी अचानकपणे या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्यांचे सर्व चाहते नाराज झाले असून त्यांनी अचानक मालिका सोडण्याचे कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शितल यांना एका मोठ्या नाटकात काम करण्याची ऑफर मिळाली आहे म्हणून त्यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येणाऱ्या काळात त्यांनी ही मालिका नक्की सोडली आहे की नाही हे स्पष्ट होईल. 

याआधी त्यांनी अनेक मालिकेत काम केले आहे, “आई कुठे काय करते” या मालिकेत त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. याशिवाय “का रे दुरावा”, “एक होती राजकन्या” या मालिकेत देखील काम केले आहे. त्यांच्या अनेक भूमिकांना रसिकांनी नेहमीच चांगली दादा दिली असून, त्यांच्या अभिनयाचा आदर राखला आहे. 

एक कलाकार या नात्याने रंगभूमीवर त्या नेहमीच प्रसिद्ध राहिल्या आहेत आणि इथून पुढे देखील त्यांना असेच यश मिळत राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा. 

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *