Skip to content

मान, पाठ, कंबर, टाच, गुडघेदुखी वाढतेय…? तर करा हा एक सोपा व्यायाम, लगेच होतील नसा मोकळ्या….!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास असतो तसेच काहींची मान दुखते, पाठ, कंबर, गुडघेदुखी तर अधिकच असते. त्यात ऑफिसमध्ये बसून काम असेल किंवा बाहेर हमाली करणाऱ्यांचे काम असेल, प्रत्येक कामाला कष्ट हे लागतेच पण कष्ट करताना अवयवाची कधीकधी झीज होत असते. अवयव निकामी होत असतात आणि ते दुखायला देखील लागतात पण यावरती आपण भरपूर उपचार करतो. 

महागडी औषधे वापरतो मात्र तरी त्याचा काही परिणाम होत नाही आणि हे दुखणं वाढतच राहते. मात्र व्यायाम केल्याने हे कमी होते पण या दुखण्यासाठी योग्य व्यायाम कोणता आहे हे जाणून घेणेदेखील गरजेच असत. गुडघ्यामध्ये उडता बसता आवाज येत असेल, हाडांची झीज झालेली असेल, टिशू डॅमेज झालेले असतील सोबतच आपल्या गुडघ्यामध्ये सांध्यामध्ये जे वंगण असते.

ते वंगण जर कमी झालेले असेल आणि तुमच्या कमरेमध्ये वेदना होऊन मनका पाठ दुखीचा त्रास वाढत असेल, सोबतच बऱ्याच व्यक्तींना मान दुखी सह डोकेदुखीचा देखील त्रास होत असतो तसेच हाता पायांना मुंग्या येतात बधिरता निर्माण होते, पायाची हाताची आग जाणवते तसेच बऱ्याचश्या व्यक्तींच्या दबलेल्या नसा मोकळ्या होण्यासाठी देखील आजचा हा उपाय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा उपाय अतिशय सोपा साधा आहे आणि सर्वांना करता येईल असा आहे.

मित्र तुमच्या सर्व समस्या दूर होण्यासोबतच काही गोष्टी तुम्हाला माहितच नाही खूप गरजेचे आहे, तुम्ही जर पंख्याचा थेट वारा घेत असाल किंवा आईस्क्रीम वगैरे खात असाल, लोणचे पापड खूप खारट तसेच लस्सी बर्फ यांचे सेवन करत असाल. खूप आंबट पदार्थ थंड पदार्थ जर तुम्ही घेत असाल तर ते सर्वात आधी बंद करावा लागेल. 

झोपताना शक्यतो उबदार अंथरून गोधडी वापरावे, उशी गादी टाळावे. तसेच मित्रहो हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमच्या खूपशा गोळ्या देखील घेतल्या जातात मात्र तरी जर तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढत नसेल तर आपल्या जीवनातील साखरेचे पदार्थ गोड पदार्थ कमी केल्याने कॅल्शियम वाढते.

मित्र हे पदार्थ सेवन करून किंवा काही यातील पदार्थ टाळून आपण आपल्या आरोग्याची सुरुवात करायची आहे आणि आजचा व्यायाम जाणून घेण्यापूर्वी आपणाला हे पदार्थ सेवन करून सुरुवात करायची आहे, आपणाला हा व्यायाम करण्यासाठी कॉटनच्या कापडाचे काही तुकडे कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्या दोन्ही पायाच्या अंगठ्यांना एकत्र करून त्या तुकड्याने घट्ट बांधून घ्यायचे आहे.

तसेच आपल्या पायाचे गोटे आहेत त्यांना गट बांधायचे आहे. दोन्ही गोटे एकत्र यायला हवेत पण त्यामुळे कदाचित वेदना देखील होऊ शकतात आणि ह्या वेदना थांबवण्यासाठी दोन्ही गोट्यांमध्ये थोडासा मऊसर कपडा घालायचा आहे आणि मग ते बांधायचे आहेत त्यामुळे वेदना कमी होतील. तसेच पुढे आपल्याला पिंड्रीचा भाग देखील घट्ट बांधायचा आहे.

अशा पद्धतीने पाय बांधून झाल्यानंतर पोटावरती झोपायचे आहे पोटावर झोपताना गुडघ्याखाली आपणाला उशी किंवा काहीही मशाल वस्तू घ्यायची आहे आणि पोटावर झोपूनच आपले पाय खाली वर, खाली वर करायचे आहेत. असा हा व्यायाम आपणाला नियमित करावा लागेल. असे खाली वर पाय मित्रहो आपणाला जवळपास ५० वेळा करायचे आहे.

 हा उपाय करत असताना आपल्याला सहन होईल तितक्या वेळा आणि तसं करावा, असं नियमितपणे केल्याने हाडांची जी झीज होते ती भरून निघते. टिशू डॅमेज झालेला असतात ते देखील सुरळीत होतात, सोबतच गुडघ्यामध्ये असलेले वंगण देखील पूर्ववत होते. यानंतर पुन्हा आपणाला खुर्चीवर बसून तसेच पाय पुढेमागे करत राहायचे आहे.

ज्या लोकांच्या गुडघ्यांना सूज आहे. सांध्यांना सूज आहे. अशा लोकांसाठी हा व्यायाम उत्तम ठरतो, तसेच मित्रहो तव्यावरती वीट ठेवायची आहे आणि वीट गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक कॉटन चा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यात ती गरम वीट ठेवायची आहे. ही वीट कपड्यांमध्ये ठेवून सहन होईल अशा रीतीने गुडघ्यावरती ठेवून शेक द्यायचा आहे.

शेक दिल्यामुळे गुडघ्याला लगेचच आराम मिळेल तसेच पारिजातक, निर्गुंडी आणि शेवग्याचा पाला हे तिन्ही पदार्थ एकत्र करून त्याची पावडर तयार करावी. हे मिश्रण एक ग्रॅम घेऊन मधामध्ये मिक्स करून रोज सकाळी खायचे आहे या उपायामुळे मणक्यामधील वंगण पूर्ववत होते.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *