Skip to content

मारुतीरायाला शेंदूर का लावतात. सीतेमातेच्या सिंदुराशी आहे संबंध. जाणून घ्या सविसर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी कोणत्याही गावात जा कोणत्याही पारावर जा तिथे भेटणाऱ्या मारुतीरायाचे पाया पडल्याशिवाय कोणताच काम केल जात नाही. अगदी सहज जरी लोक गावाच्या वेशी जवळ गेले तरी तिथे असलेल्या मारुतीरायाला नतमस्तक झाल्याशिवाय कोणी पुढे जातच नाही. गाव बदलल मंदिरे मोठी झाली वेशी नाहीशा झाल्या तरी सर्वत्र एक गोष्ट मात्र सारखीच आहे ती म्हणजे भगव्या रंगात रंगवलेला मारुतीराया.

मारुतीच्या देवळात कोचीतच तो इतर रंगात दिसत असे. पण मारुतीरायाचे आणि भगव्या रंगाची काय नाते आहे याबद्दल फारशी लोकांना माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊयात मारुतीरायाला शेंदूर का लावतात. मंडळी हनुमान किती मोठे प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत हे तर तुम्हाला माहिती आहेतच त्यांच्यानुसार दुसरा रामभक्त होणे नाहीत हीच राम भक्ती सिद्ध करण्याच्या नादात एकदा मारुतीरायांनी संपूर्ण अंगाला भगवा शेंदूर फासला होता.

यामागे एक कथा आहे ती कोणती ती पाहूयात. १४ वर्षांचा वनवास आणि लंकेतील रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीराम अयोध्याकडे परतले त्यावेळी हनुमानही आपल्या प्रभू सोबत अयोध्येत आले. एके दिवशी सीतामाई आवरत होत्या सीतामाई त्यांचा शृंगार करत होत्या. शृंगार पूर्ण झाल्यावर शेवटी त्यांनी भांगेत कुंकू भरल. त्यावेळी उत्सुकतेने शेंदूर म्हणजेच कुंकू लावण्याचे कारण मारुतीरायांनी सीतेला विचारले. त्यावेळी कोणतीही पत्नी तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असे करते तिच्या भांगेत कुंकू भरते.

जितका लांब सिंदूर लावतात तेवढे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. असे मातेने हनुमानाला सांगितले. त्यावर प्रभूचे आयुष्य वाढणार असेल तर मीही त्यांच्या नावे कुंकू लावतो. असा विचार करत मारुतीरायांनी संपूर्ण अंगाला शेंदूर लावण्यास सुरुवात केली. संपूर्ण अंगाला शेंदूर पासून हनुमान श्रीरामाच्या दरबारात आले. हरभरा सगळे गन मंत्री उपस्थित होते.

त्यांनी मारुतीरायांचा अवतार पाहिला आणि सगळेच हसायला भक्ताची काळजी ती देवालाच मारुतीरायांवर सर्वजण हसत होते पण प्रभू राम त्यांच्या या भक्तीवर खुश झाले. त्यांनी हनुमानाला वरदान दिले मंगळवारी आणि शनिवारी जो कोणी तू आणि शेंदूर अर्पण करून हनुमानाची पूजा करेल त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील असे सांगितले.

तेव्हापासूनच मारुतीरायांच्या दर्शनाला जाताना भगव्या रंगाचा शेंदूर लिहिला जातो व तो देवाला अर्पण करून स्वतः लावला जातो त्यामुळे शेंदूर लावल्याने प्रभू श्रीरामाचे आयुष्य वाढेल आणि म्हणूनच मारुतीरायाला शेंदूर लावले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *