Skip to content

मार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मार्गशीर्ष महिना सुरू आहे. आणि मार्गशीर्ष गुरुवार हे खूप महत्त्वाचे मानले जाते. मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीला खूप मान दिला जातो. लक्ष्मीच्या कृपेसाठी खूप लोक प्रयत्न करतात. बरेच लोक दानधर्म करतात आणि जे लोक आर्थिक व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात.

माता लक्ष्मीला तीच लोक खूप प्रिय असतात. मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत की ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल जाणून घेऊयात. मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. गुरुवारी सुवासिनी महिला मनोभावे व्रत करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोडधोड नैवेद्य देवीला अर्पण करून.

बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदीकुंकू लावून वाण दिले जाते. पण मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. कारण चांगले केलेले कर्म हे आपल्याच पदरात पडतात. दानधर्म करणे ही पुण्याची गोष्ट आहे. म्हणून आपण अशा प्रकारे गुरुवारी या गोष्टी केल्याच पाहिजेत.

१) धार्मिक ठिकाणी दान करावे. धर्मकार्यात आर्थिक मदत करावी. कारण तिथे केलेला पैसा कोणाच्याही वैयक्तिक उन्नतीसाठी नसून अनेक गरजू लोकांच्या साठी असतो. एरवी आपण कुणा एखादा मदत करण्यासाठी पूरक पडू असे नाही. धर्मकार्यात आपण उचललेला खारीचा वाटा आपल्याला अनेकांचे शुभाशीर्वाद मिळवून देऊ शकतो. म्हणून तुम्ही गुरुवारी धार्मिक ठिकाणी दान अवश्य केले पाहिजे. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल.

२) आजारी लोकांना मदत करा- कोणत्याही व्यक्तीला मदतीची सर्वात जास्त गरज असते. की त्याच्या आजारपणात एखाद्याला गरज असेल तर यथाशक्ती त्याला मदत जरूर करा. असं केल्याने व्यक्तीला आणि त्याच्या रुग्णाला दिलासा मिळतो. आणि नवजीवन मिळते.

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणे हे परोपकाराचे सर्वात मोठे कार्य मानले जाते. आणि असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला आजारपणात मदत केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडते.

३) गरिबांना मदत करा- गरीब आणि गरजू यातील फरक आधी ओळखा. काही लोक परिस्थितीने गरीब असतात तर काही लोक गरीब असल्याचं ढोंग करतात. काही लोक काही न करताच सगळं फुकट मिळाल्याने ते लोक गरिबीत राहणे पसंत करतात.

अशा लोकांना केलेली मदत काही उपयोगाची नाही. याउलट खऱ्या गरजवंताला केलेली मदत त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या सदिच्छा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात राहतात. गरिबी व्यक्तींना दानधर्म केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते.

४) सामाजिक कार्यात दान करावे- दान करण्याची इच्छा अनेकांना असते. जे सतपात्री व्हावे असे वाटते काही लोक सामाजिक संस्थांना दान करून मोकळे होतात. परंतु त्या पैशांचे योग्य प्रकारे नियोजन होत आहे की नाही या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नुसते दान करून उपयोग नाही. तर त्याचा पाठपुरावा देखील करायला पाहिजे.

सामाजिक संस्थांना मदत जरूर करावी पण त्यांचे कार्य तपासून पहावे आणि आपणही शक्य तेव्हा तिथे उपस्थित राहावे. या गोष्टी केवळ दुसऱ्यांना सहाय्यक ठरतात असे नाही तर तुमचे व्यक्तिमत्व ही खुलवतात. आपोआप पैसा प्रसिद्धी यश प्राप्त होते. म्हणून आपले पैसे योग्य ठिकाणी वापरावे. दुसऱ्यांबरोबर स्वतःचाही उत्कर्ष करून घ्यावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *