Skip to content

या एका कारणामुळे रावणाने चक्क शनि देवाचा पाय मोडला होता. वाचा सविस्तर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनी असं उच्चारलं तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये भीती दाटून येते. शनि म्हटलं की लोकांना साडेसाती आठवते. शनीची महादशा आठवते आणि त्या काळामध्ये आपले काय काय हाल होणार असा विचार त्यांच्या मनामध्ये येतो. कुठलीतरी अनामिक भीती आपल्या मनाचा ताबा घेते.

 इतकी भीती आपल्याला शनि देवांची वाटते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की यात शनि देवांना रावणाने बंदी बनवलं होतं. पण हे कसं शक्य आहे. शनि देवांनी तर देवांना सुद्धा सोडलं नाही. मग रावणाला कसं बरं सोडलं. चला या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मंडळी रावण हा दृष्ट होता हे मान्य आहे. पण तो ज्योतिष शास्त्राचा असंखोल अभ्यास करणार होता. तो शिवभक्त होता.तपस्वी सुद्धा होता आणि महापराक्रमी योद्धा सुद्धा होता. ज्योतिष शास्त्राचा सखोल आणि गाढा अभ्यास त्याचा असल्यामुळे त्याला ग्रह तारे कसे चालतात कसे परिणाम देतात या सगळ्याच ज्ञान होत.

ग्रहताऱ्यांना स्वतःच्या आधीन कसं करून घ्यायचं यामध्ये सुद्धा रावण हुशार होता. म्हणूनच रावण कोणाला सुद्धा घाबरत नव्हता. आणि पौराणिक कथेनुसार याच गोष्टीचा गंभीर परिणाम शनिदेवांना सुद्धा भोगावा लागला होता. आता तुम्हाला माहितीये की शनि देव हा सगळ्यात संत गतीने चालणारा ग्रह आहे. 

अर्थात शनिदेव एका राशीमध्ये अडीच वर्षे असतात. आणि त्यामुळे त्यांना एक फेरी पूर्ण करायला तीस वर्षे लागतात म्हणजे त्याच राशी मध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांना तीस वर्षाचा कालावधी लागतो.सगळ्यात मंद चाल ही शनि देवांची आहे. इतर ग्रहांना कोणाला एक महिना कोणाला ४१ दिवस कोणाला एक दिवस असे दिवस लागतात.

 पण शनिदेवांना मात्र अडीच वर्षे लागतात. तर याचं कारण काय आहे. तर याचा संबंध रावणाशी जोडला जातो. याच्याशी संबंधित पौराणिक कथा अनेक आहेत आणि वेगवेगळ्याआहेत. पण त्यातल्याच एका पोरांनी कधी बद्दल आपण येथे सांगणार आहोत. अस म्हणतात की रावणाने शनि देवांचा पाय मोडला होता. आणि म्हणूनच शनि देवांची चाल हळूहळू झाली आणि तिरकी झाली. 

आता प्रश्न येतो की रावणाने शनिदेवांचा पाय का मोडला. तर त्या मागची कथा अशी आहे की रावणाची बायको गंधोदरी जेव्हा गर्भवती होती तेव्हा रावणाला असं वाटत होतं की आपला होणारा मुलगा शूरवीर पराक्रमी जगत देता आणि दीर्घायुषी व्हावा. त्याच्या आयुष्यात वाईट काळ असूच नाही त्यासाठी त्यांनी सगळ्या देवांना आज्ञा दिली होती की जेव्हा माझ्या बाळाच्या जन्माच्या वेळी तुम्ही सगळे सुवास्थानी बसा.

सगळ्या ग्रहांना जनू त्याने बंदी केलं होतं. या सर्व ग्रहाने त्यांचे आज्ञा पाळली पण शनिदेव कुठे ऐकणार होते. आणि हे रावणाला सुद्धा चांगलं माहीत होतं. म्हणून रावणाने आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी शनि देवांना जबरदस्तीने साखळदंडाने बांधल होत. आणि आपल्याला हव्या त्या स्थानी बसवलं होत. पण शनिदेव सुद्धा काही कमी नव्हते. 

रावणाने सांगितलेल्या ठिकाणी ते थांबले पण रावणाचा मुलगा मेघदेव याच्या जन्माच्या वेळी शनि देवांनी आपली दृष्टी फिरवली. आणि वक्र केली.याचा परिणाम असा झाला की रावणाचा मुलगा मेघदूत हा अल्पायुषी ठरला. मग हे जेव्हा रावणाच्या लक्षात आल रावणाने रागात येऊन शनीच्या पायावर आपल्या गधेने प्रहार केला. 

ज्यामध्ये शनि देवांचा पाय मोडला गेला. अशी ही पौराणिक कथा आहे. आणि तेव्हापासून शनि देवांची चाल हळूहळू झाली असं म्हटलं जातं. त्यामुळे ते मध्ये दीर्घकाळ राहतात. इतकच नाही पौराणिक कथेमध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की रावणाने फक्त शनि देवांनाच नाही तर सगळ्याच ग्रहांना बंदी बनवून ठेवलं होत. जेव्हा हनुमान लंकेमध्ये दाखल झाले. तेव्हा त्यांनी सगळ्या ग्रहांची सुटका केली.

आणि तेव्हा शनि देवांची सुद्धा सुटका झाली. आणि शनिदेवांनी जाता जाता रावणावर वक्रदृष्टी टाकली. आणि त्यानंतर रावणाच्या लंकेचे जे काही झालं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण सगळ्यांना घाबरवणारे असे शनिदेव हनुमानाला घाबरतात हे तुम्हाला माहित आहे का. पण त्याचं काय कारण आहे हनुमान तर नितीन रामाभक्त होते. तसेच हनुमान हे शक्तिशाली आणि बलाढ्य होते. 

तर शनि देवांनी सुद्धा हनुमानालाआपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हनुमानावर त्यांचा काहीही प्रभाव पडला नाही. उलट हनुमानाने त्यांच्यावर इतका प्रभाव टाकला की शनिदेव हनुमानाला शरण आले. आणि असं कबूल केलं तुम्हालाच काय पण तुमच्या भक्तांना सुद्धा माझ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही. 

म्हणून तर अस म्हणतात की साडेसाती असेल किंवा शनी महादशा असेल किंवा कुंडलीमध्ये शनी चांगल्या स्थितीत नसेल तर तुम्ही हनुमानाची उपासना करावी त्यामध्ये तुमचं हनुमान रक्षण करेल. तस तर खरं म्हणजे शनिदेव हे कर्मफलाचे दाता आहेत. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. 

मग जर व्यक्तीची कर्म चांगली असतील तर चांगले फळ मिळणार. कर्म वाईट असतील तर वाईट फळ मिळणार. दृष्ट्यांना शिक्षा करणं आणि चांगल्या लोकांचे रक्षण करणे हेच त्यांचे काम आहे. म्हणूनच शनि देवांच्या कुठल्याही दृष्टी पासून रक्षण करायचं असेल तर आपण नेहमीच चांगलं कर्म केलं पाहिजे. 

नेहमी चांगल वागण्यावर शनिदेव प्रसन्न असतात. आता चांगल वागायच म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये सात्विकता ठेवायची. गोरगरिबांची मदत करायची. अपंगांची सेवा करायची. कुणाची ही चेष्टा मस्करी थट्टा विनाकारण करायची नाही. त्याचबरोबर आई-वडिलांचा अपमान करायचा नाही. 

आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाहीत. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जी आपली वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी लहानपणापासूनच शिकवत आलेले आहेत. त्याच गोष्टीच पालन आपण केलं तर शनि देवांची कृपा आपल्यावर होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *