नमस्कार मित्रांनो.
बुध ग्रह ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा राशी परिवर्तन करणार आहे. रविवारी २१ ऑगस्टला सकाळी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी बुध ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. अर्थात कन्या राशि प्रवेश करेल. गुरु पासून सातव्या घरात बुध असल्यामुळे गुरु आणि बुद्ध यांच्यामध्ये सन सप्तक योग हा तयार होईल.
उच्च शिक्षणासाठी प्रदेशात जाण्यासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना या योगाचा फायदा होणार आहे. एकीकडे हे संक्रमण काही लोकांच्या जीवनात आनंद आनेल. तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र या संक्रमणादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. मग कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना त्रास होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.
मेष रास- या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल. मुलांच मन अभ्यासातून थोड भरकटू शकत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
तुळ रास- तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तुम्ही अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च करू शकता. त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता आहे. तब्येतीत चढउतार होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
कुंभ रास- या काळात तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्या.आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. बाहेरच खाण टाळा. मंडळी बुध हा ग्रह बुद्धिमत्तेचा कारक आहे त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचा ग्रह मजबूत करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही गणपतीची आराधना करायला हवी. हा काळ तुमच्यासाठी कठीण आहे तर तुम्ही गणपतीची उपासना करा.
कारण बुध ग्रहाचे शुभ परिणाम गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला मिळू शकतील. त्यासाठी तुम्ही रोज अथर्व शीर्षाचा पाठ करा. तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही कमीत कमी ते ऐका. ते तुम्ही नक्की ऐकू शकता. त्याचबरोबर अगदी काहीच नाही जमल तर ओम नमो गणपते नमः या मंत्राचा गणपती बाप्पाचा जप करा.
गणपती स्तोत्र म्हणा. ते अगदी मराठीत म्हटल तरीसुद्धा चालेल. या छोट्या छोट्या उपायांनी नक्कीच तुम्हाला धीर येईल बळ येईल. लक्षात ठेवा ग्रहांच्या ही वरती देवता असते. त्या देवतेची कृपा आपल्यावर झाली तर कोणताही ग्रह आपल काहीही करू शकत नाही. म्हणून आपली उपासना चालू ठेवा. गणपती बाप्पाच्या कृपेने नक्की तुमची सगळी संकट आणि विघ्न दूर होतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.