Skip to content

या ३ राशींचे लोक म्हणजे एकदम चुगलखोर. बघा तुमची किंवा तुमच्या मित्रांची रास आहे का यात.

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या आजूबाजूला चुगलखोर लोक आहेत का हो असणारच. चुगलखोर लोक म्हणजे कशी? तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं आणखीन तिखट मीठ लावून दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगणारच. अशा लोकांना गॉसिप फार आवडत आणि यांच्या पोटामध्ये कुठला ही रहस्य दडवून राहू शकत नाही. मग आपण बघू या की, अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगलखोर म्हणू शकतो.

प्रत्येक राशी मध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात. कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो. सर्वगुणसंपन्न अस कोणीही नसत. प्रत्येकामध्ये काहीना काही तरी चांगले आणि काहीना काहीतरी दोष असतातच आणि अशाच तीन राशी आहेत ज्यांच्या मध्ये चुगलखोरी करण्याचा दोष असतो. चुगल खोरी म्हणजे काय? तर इकडच तिकड सांगणे आणि त्या मध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

मिथुन रास- आता मिथुन राशीची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती आणि हजरजबाबी पणा यांना तोड नाही. मनोरंजक संवाद कौशल्याने ते लोकप्रिय होता हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले. पण हो ते गप्पिष्ट असतात त्यांना. खूप गप्पा मारायला आवडत आणि भीड भाड न ठेवता बोलतात.

पण बोलायच्या आत नादात ते इतरांची गुपितां सुद्धा उघड करतात. ज्याला आपण इकडचं तिकडे करण म्हणतो. आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही. पण बोलायच्या नादात त्यांच्याकडून बोलल जात हे खर. आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा.

कन्या रास- आता कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशोबी असतात. तसंच अती चिकित्सक सुद्धा असतात. कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाक सुद्धा तुम्ही करता. पण पण पण कन्या राशी च्या व्यक्तींना सुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितल तर ते किती काय त्यांच्या जवळ राहील याची गॅरंटी कोणी ही घेऊ शकणार नाही.

आता त्यांचा हेतू वाईट नसतो. पण ते इतरांना बद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात. इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वतः मात्र तर्क संगत करून सांगतात. त्यांच्या कृतीत काही ही चुकीचं दिसत नाही, पण शेवटी इकडचंतिकड सांगतात हे खर.

वृश्चिक राशी- ची लोक अतिशय चाणाक्ष चतुर असतात. पंख सुद्धा वृश्चिक राशी ची लोक मोजू शकतात इतके हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. पण हो स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीची गुप्तता पाळतात. म्हणजे स्वतः कुठल्याही गोष्टी बद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसराच्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलता रस असतो. दुसरा व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते.

परत जाणून घेतल्यानंतर त्या स्वतः पुरताच ठेवतील अस नाही तर त्या इतरांना सुद्धा मोकळ्या मनाने सांगतील म्हणजे स्वतः बद्दल फारस बोलणार नाही. पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो. तुमच्या आजूबाजूला जर एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती जवळ तुम्ही काही ही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी.

कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज येणार नाही तर मंडळी या होत् या तीन राशी ज्यांच्या पोटात काही राहत नाही. किंवा असं म्हणू या ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडे करण्याची सवय असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *