Skip to content

रविवारी करा हे सोपे ५ उपाय, काही दिवसातच चमकेल नशीब.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी प्रत्येक जण आयुष्यात सुख शांती येण्यासाठी प्रयत्न करत असतो. आठवड्यातला प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेशी आणि ग्रहाची जोडले गेलेला आहे. असाच रविवार हा सूर्य देवाला अर्पित आहे. त्यानुसार ज्योतिष शास्त्रात रविवारी काही सूर्य उपासना केल्यास आपल्या आयुष्यात शुभ गोष्टी घडतील.

रविवारी काही सोपे उपाय सुचवण्यात आलेले आहेत. या उपायाने काही दिवसातच तुमचे नशीब चमकू शकेल. मला तर मग जाणून घेऊयात रविवारी कोणती उपाय केले पाहिजेत.
मित्रांनो हिंदू धर्मात रविवार हा भगवान सूर्य देवाचा दिवस मानला गेलेला आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव फार शुभ मानला जातो. त्यामुळे रविवारी काही उपाय केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी निघून जातात.

१) सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. रविवारी सकाळी आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे फार शुभ मानले जाते. तुम्ही अर्घ्य सुद्धा देऊ शकता. हे वर्ग देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा. त्यासोबत लाल फुल, अक्षदा आणि खडीसाखर आधी अर्पण करा आणि त्यानंतर अर्घ्य द्या.

२) रविवारी झाडू खरेदी करणे फार शुभ मानले जाते‌ कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. बाजारातून रविवारी तीन झाडू खरेदी करा आणि सोमवारी ते झाडू मंदिरामध्ये दान करा. यामुळे तुमच्यावर भगवान नारायणाची कृपा बरसेल आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.

३) प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या तुटलेल्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय तुम्हाला रविवारी करायचा आहे. रविवारी हा उपाय केल्याने तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल.

४) आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली रविवारी दिवा लावा. यासाठी रविवारी कणकेचा चौमुखी दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली ठेव. यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल.

५) रविवारी बाभळीच्या झाडाला दुध अर्पण करून धन आणि वैभव परत मिळू शकता. त्यासाठी रविवारी रात्री झोपण्याआधी एक ग्लास घेऊन तुमच्या उशाशी ठेवा सकाळी उठल्यानंतर दूध बाभळीच्या झाडाला मुळाशी घाला.

रविवारी या गोष्टी करणे टाळा:-

१) रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे शुभ मानले जात नाही. जर काही आवश्यक काम असेल आणि पश्चिमेला प्रवास करायचा असेल तर रविवारी सुपारी किंवा दलिया खाऊन घरातून बाहेर पडण्यापूर्वी पूर्व दिशेला पाच पावले चालावी आणि त्यानंतर प्रवासाला निघावे.

२) काळे कपडे घालू नका ज्योतिषांच्या मते रविवारी काळ्या व निळ्या गडद रंगाची कपडे घालने. हे अशुभ मानले जाते.
३) तांबे सूर्य देवांशी संबंधित कोणतीही वस्तू रेदी किंवा विकणे हे निश्चिद् मानले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *