Skip to content

लग्नासाठी २०२३ मध्ये ५९ शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या कोणते. या शुभमुहूर्तावर करा लग्न, नक्कीच आयुष्यात यशस्वी व्हाल.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू विवाह तारीख निश्चित करताना लग्नाचा मुहूर्त पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. आणि ते लग्नात महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर असं मानलं जातं की अशुभ विवाह काळात केलेले विवाह अनेकदा जोडप्यांवर नकारात्मक परिणाम करतात. शुभ मुहूर्तावर लग्न करणे शुभ मानले जाते. आणि ही परंपरा आपल्या हिंदू पद्धतीमध्ये खूपच शुभ असते.

तुम्हा सर्वांना माहिती असेलच की लग्नापूर्वी वधू-वरांच्या कुंडली पाहिल्या जातात. यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार वर्षभरात एकूण ४ अजूब मुहूर्त असतात. यामध्ये आखा तीज, देव उठणी एकादशी, वसंत पंचमी, भादमी नवमी, यांचा समावेश होतो. म्हणजे या चार प्रसंगी मुहूर्त नसला तरी लग्न वगैरे शुभ कार्य करता येते.

मात्र ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारख्या शुभकार्यासाठी शुक्राचा उदय आवश्यक आहे. खरंतर २०२२ मध्ये लग्नासाठी फक्त नऊ शुभ मुहूर्त शिल्लक आहेत. डिसेंबर महिन्यात नऊ शुभ मुहूर्त आहेत. आता पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊयात.

मित्रांनो २०२३ मध्ये ५९ शुभ मुहूर्त लग्नासाठी आहेत. पंचांग नुसार २०२३ मध्ये५९ शुभ मुहूर्त आहेत. यामध्ये जानेवारीमध्ये ९ फेब्रुवारीमध्ये १३ मे मध्ये १४ जूनमध्ये ११ नोव्हेंबर मध्ये ५ आणि डिसेंबर मध्ये ७ विवाहाचे शुभमुहूर्त आहेत. २०२३ मध्ये लग्नासाठी शुभ तारका कोणत्याही हे जाणून घेऊयात.

१) जानेवारी २०२३ मध्ये. १५ , १६, १८ ,१९, २५ ,२६, २७ ,३० ,३१.

२) फेब्रुवारी २०२३ मध्ये.
६,७,८,९,१०,१२,१३,१४,१५,१७,२२,२३,२८. हे शुभ तारखा आहेत.

३) मे २०२३ मध्ये शुभ तारखा.
४,६,८,९,१०,११,१५,१६,२०,२१,२२,२७,२९,३०.

४) जून २०२३मध्ये शुभ तारखा.
१,३,५,६,७,११,१२,२३,२४,२६,२७.

५) नोव्हेंबर २०२३मध्ये शुभ तारखा.
२३,२४,२७,२८,२९.

६) डिसेंबर २०२३ मध्ये शुभ तारखा.
५,६,७,८,९,११,१५.

मंडळी मार्च २०२३ मध्ये होलाष्टक आणि एप्रिल मध्ये धनु महिन्यामुळे कोणतेही शुभ कार्य होणार नाही. या सहज जून महिन्यापासून चातुर्मास सुरू होईल. त्यानंतर कोणतेही लग्न वगैरे शुभ कार्य चार महिन्यां नंतरच सुरू होतील.

२०२२ मध्ये लग्नाचे शुभ मुहूर्त डिसेंबर मध्ये नऊ शुभ मुहूर्त आहेत. त्यांच्या तारखा २,३,४,७,८,९,१३,१४,१५ डिसेंबर. १६ डिसेंबर पासून धनु मास सुरू झाल्यामुळे लग्नासारख्या शुभ कार्यांवर बंदी येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *