Skip to content

लवकरच हा अभिनेता देखील अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर व्हायरल झाले काही फोटो…!

  • by

नमस्कार,

मित्रहो मनोरंजन क्षेत्रात हल्ली अनेक कलाकार नात्याच्या टप्प्यात पाऊल टाकत प्रेमाचे बांध बांधत आहेत. काहीजण प्रेमात पडत आहेत ते काहीजण साखरपुडा करत आहेत तर काहीजण लग्नच उरकून टाकत आहेत. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो चाहत्यांना सुखद धक्के देत आहेत. 

३ मे रोजी विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगुळे यांनी विवाह केला, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत होती आणि अखेर त्या दोघांनी लग्न केले आहे. त्यांचे छान छान फोटो पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत. 

हा आनंद सहन करत असतानाच आणखी एक सुखद धक्का “तुझ्यात जीव रंगला” फेम राणा अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी दिला आहे, त्या दोघांनी अचानकपणे साखरपुडा केला असून त्यांचे आकर्षक फोटो व्हायरल झाले आहेत.

त्यामुळे सोशल मीडियावर सध्या खूपच छान वातावरण निर्माण झाले आहे, शिवाय यामध्ये आणखी एका अभिनेत्याच्या लग्नाची गोड बातमी नुकताच येऊन ठेपली आहे. “लकी” चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन येत्या काही दिवसात लग्न करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगात आली आहे.

नुकतेच अभयचे केळवण साजरे करण्यात आले आहे, त्याच्या काही जवळच्या मित्रांनी त्याचे केळवण साजरे केले आहे. अभय हा एक उत्तम अभिनेता आहे, त्याला बालपणापासून अभिनयाची प्रचंड आवड होती. बी ए एमसीसी या कॉलेजमधून त्याने पदवी मिळवली आहे.

पुण्यातील नाटक कंपनी संस्थेशी तो जोडला गेला. अभय हा अभिनय तर छान करतोच शिवाय त्याने भरत नाट्यमचे देखील प्रशिक्षण घेतले आहे. संजय जाधव यांच्या “लकी” या चित्रपटात त्याला मुख्य नायकाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली होती.

“खमोश अदालत जारी है” या नाटकात देखील तो झळकला होता, त्याने अनेक भूमिका निभावल्या असल्याने त्याची लोकप्रियता भरपूर आहे. “शांतीत क्रांती ” वेबसिरीज, “अवांचीत” यांसारख्या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर झळकला आहे. 

प्रत्येक वेळी त्याला नवीन भूमिकेत पाहताना त्याचे सर्व चाहते खूप खुश होतात. शिवाय तो नेहमीच काहीतरी नवीन रसिकांच्या भेटीस घेऊन येत असतो. “माझ्याकडे बघताय खुदकन हसताय” हे गाणे मध्यंतरी खुप गाजले होते, हे गाणे अभयवर चित्रित झालं होतं. 

गेल्या वर्षी अभयने दिया नायडू हिच्याशी साखरपुडा केला होता, त्यावेळी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. दिया ही एक कोरियोग्राफर आहे, ती दिसायला देखील खूप सुंदर आहे. 

लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अभय आणि दिया लग्नाच्या तयारीत चांगलेच गुंतले आहेत, शिवाय त्यांचे मित्र मंडळी सुद्धा त्यांच्या मदतीला आहेतच. 

तर मित्रहो त्यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा, आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *