Skip to content

वर्ष २०२३ केतू प्रभावित, फक्त ही ७ कामे करा अखंड लाभ मिळावा..

नमस्कार मित्रांनो.

२०२३ हे वर्ष ज्योतिष शास्त्रानुसार हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच जर तुम्ही सात कामं केलीत, तर तुम्हाला अखंड लाभ मिळणार आहे. धनलाभ होणार आहे, माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार आहे. पण कोणती आहेत ती सात काम चला जाणून घेऊया.

२०२३ मध्ये अधिक महिना आलेला आहे. तसेच ज्योतिषशास्त्र दृष्टीने विचार केल्यास अनेक महत्त्वाचे ग्रह या वर्षात राशी परिवर्तन करत आहेत. त्यापैकी शनि, गुरु,राहू, केतू यांचे राशी परिवर्तन विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. तसंच यंदाचे हे वर्ष केतू ग्रहाचे वर्ष आहे. केतू ग्रह हा मुलांक सातचा स्वामी आहे. कसा कारण या वर्षाची बेरीज सात येते. २+०+२+३=७.

म्हणून या वर्षावर केतू ग्रहाचा वर्चस्व आहे. ज्योतिष शास्त्राची शाखा असलेल्या अंकशास्त्राचा विचार केल्यास सात मुलांक स्वामी केतू आहे. त्यामुळे या पूर्ण वर्षावर केतू ग्रहाचा प्रभाव असेल. येतो हा मायावी, क्रूर आणि छायाग्रह मानला जातो. मात्र एखाद्याच्या कुंडलीत केतू ग्रह शुभ स्थानी असेल, तर त्या व्यक्तीला अतिशय सर्वोत्तम फळ सुद्धा मिळतात. अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

केतू ग्रह कायम वक्रिचरणाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. आत्ताच्या घडीला केतू ग्रह तूळ राशीत विराजमान आहे. या वर्षाच्या आक्टोबर महिन्यात केतू ग्रह वक्रिचलनाने कन्या राशीत प्रवेश करेल. केतू ग्रहाच्या प्रभावामुळे वर्षात विचित्र घटना घडू शकतील. ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल. केतू हा विषाणूजन्य आजाराचे संबंधित मानला जातो.

नविन वर्ष २०२३ मध्ये रोगामुळे जागतिक स्तरावर लोक आणि संपत्तीचे जागतिक स्तरावर नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वर्ष २०२३ शुभ जाण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सर्व राशींसाठी काही ना काही उपाय सांगण्यात आला आहे. या उपायामुळे जीवनात सुख समृद्धी तरह येथेच शिवाय केतूच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती ही मिळू शकते.

१) त्यातलाच पहिला उपाय म्हणजे २०२३ हे वर्ष शुभ जाण्यासाठी रोज कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं दर्शन घ्यावं. शक्य असल्यास अशा प्रतिमेचे पूजनही करावे. आणि यावेळी”ओम नमः भगवते वासुदेव नमः”या मंत्राचा यत्ता शक्ती जप करावा. तसंच बीज मंत्राचा ही जप करावा. असं केल्याने त्याची शुभ फळ मिळू शकतात.

२) त्याचबरोबर आणखीन एक उपाय म्हणजे २०२३ हे वर्ष लाभदायक होण्यासाठी आणि केतूचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी भगवान कालभैरवाची पूजा करावी, केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा, श्री भैरव चालीसा पटन करावं, त्याचबरोबर पिपळांच्या झाडाचे ही पूजन करावे असं केल्याने सुद्धा केतू लाभदायक ठरू शकतो. जीवनात सुख-समृद्धी आणतो असं म्हटलं जातं.

३) नवीन वर्षात पिंपळाच पूजन करावे, तसेच शक्य असल्यास रोज श्री गणेशाची पूजा करावी, गणपती बाप्पाला २१ दुर्वा अर्पण कराव्यात. पूजा नंतर गणेश द्वादश नामक स्तोत्रच पठण करावं. असं केल्याने सुद्धा केतू ग्रहाचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतात.

४) चौथा उपाय म्हणजे गोमातेला अन्नदान करावे, गरजूंना वस्त्रदान आणि भोजन द्यावं, प्राणी मात्राना त्रास होईल अशा गोष्टी टाळावे, असं केल्याने सुद्धा केतूचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो. तसेच घरातील सदस्यांचे नातेसंबंध दृढ होऊ शकतात.

५) त्यानंतरचा उपाय म्हणजे दानधर्म या वर्षांमध्ये दानधर्म करण्याला अतिशय महत्त्व आहे. घरातील ज्येष्ठांची सुद्धा सेवा करायची आहे. आणि ध्यान धरणा करायचे आहे. या उपायाने सुद्धा केतूचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते.

६) तसेच आणखीन एक उपाय म्हणजे पैशाचे झाड मानले गेलेल्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या अश्वगंधाचे रोपट घरामध्ये लावा, तिळाचे दान करा, शक्य असल्यास मंदिराच्या कळसावर ध्वज लावा, असं केल्याने सुद्धा भाग्याचे भरभक्कम साथ वर्षभर तुम्हाला मिळू शकेल.

तसेच करिअरमध्ये यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. राहू आणि केतू हे ग्रह नेहमीच एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. आत्ताच्या घडीला राहू मेष राशी मध्ये असून, ऑक्टोंबर मध्ये मीन राशि मध्ये तो विराजमान होणार आहे. तर मंडळी या काही उपायाने हे वर्ष लाभदायी करून घेऊ शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *