Skip to content

श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने भरा १ कलश पैसा, सुख- समृद्धी मिळेल.

नमस्कार मित्रांनो 

मित्रांनो श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटल जात. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा किंवा व्रत करण्याची हिंदू धर्माची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त आहे. 

मित्रांनो या श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने भरा एक कलश तुम्हाला पैसा सुख सर्व काही मिळेल. मित्रांनो उद्यापासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर आपणाला हा कलश श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भरायचा आहे. तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कलश असेल तरीसुद्धा तुम्ही हा वेगळा कलश महादेवाच्या नावाने ठेवू शकता. 

यासाठी आपल्याला जे साहित्य लागत ते म्हणजे तांब्याचा एक तांब्या एक नारळ त्यामध्ये आंब्याची पान, एक सुपारी, एक रुपया बस एवढंच लागणार आहे. सर्वात आधी तुम्हाला कलश धुवून स्वच्छ घ्यायचा आहे त्यानंतर त्या तांब्यावर स्वस्तिक काढायच आहे.

त्यानंतर त्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात सुपारी पैसा हळदीकुंकू अक्षता आणि फुलं टाकायचे आहेत. त्यानंतर त्यावर विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावायची आहेत. आणि नंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे. हा नारळ आपल्याला सोलायचा नाही. तो तसाच कलशावर ठेवून द्यायचा आहे.

असा हा कलश तयार करायचा आहे. त्यानंतर तो कलश घरात कोणत्याही जागेवर तुम्हाला ठेवायचा आहे तिथे तुमच्या घरात जिथे सोयीस्कर जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. किंवा देवघराच्या साईटला जरी ठेवला तरी चालेल. हा कलर ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावून त्या कलशाला अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा टाकून कलशाचे पूजन करायच आहे. 

आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे प्रभू महादेव आमच्या घरावरून सर्व विपदा सर्व संकट सर्व अडचणी दूर करा. आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नका. आमच सर्व चांगल कर. आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे. पैसा टिकून यशाची प्राप्ती आम्हाला होऊ दे. आमच्या सर्वांच आरोग्य चांगल राहू दे. अशी प्रार्थना तुम्हाला त्या कलशासमोर करायची आहे. 

आपल्याला तो कलश तसाच तीस दिवसापर्यंत म्हणजे संपूर्ण श्रावण महिनाभर तिथेच ठेवायचा आहे. फक्त त्याच पूजन करायचा आहे. आणि श्रावण महिना संपला की त्याच्यानंतर तुम्ही तो कलश नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करा. आणि त्याच्यात जे सामान आहे सुपारी टाकली आहे पैसा टाकला आहे ती सुपारी आणि पैसा तुम्ही तिजोरीत ठेवायचा आहे. 

पान वाहत्या पाण्यात विसर्जन करायची आहेत. तांब्याचे पाणी असेल ते थोड पाणी आपल्या घरात शिंपडायच आहे आणि बाकी पाणी घराच्या बाहेर शिंपडून द्यायच आहे. अशा रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर ओम नमः शिवाय म्हणायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *